सध्या ४१२ क्रियाशील कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण १०९ जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. यामुळे जिल्ह्यातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.०१ टक्के, क्रियाशील रुग्णांचे प्रमाण ३.९५ टक्के, तर मृत्यूदर १.०४ टक्का झाला.
नवीन ३७ बाधितांमध्ये गडचिरोलीतील १६, अहेरी तालुक्यातील ६, आरमोरी तालुक्यातील ४, भामरागड तालुक्यातील १, चामोर्शी तालुक्यातील १, धानोरा तालुक्यातील १, एटापल्ली तालुक्यातील २, कोरची तालुक्यातील २, सिरोंचा १, तर वडसा तालुक्यातील ३ जणांचा समावेश आहे. आज कोरोनामुक्त झालेल्या ५१ रुग्णांमध्ये गडचिरोलीमधील २२, अहेरी ५, आरमोरी ३, भामरागड १, चामोर्शी ५, कोरची २, कुरखेडा १, तर वडसामधील १२ जणांचा समावेश आहे.
गडचिरोली तालुक्यातील नवीन बाधितांमध्ये सोनापूर कॉम्प्लेक्स १, सोनापूर वाॅर्ड कलेक्टर कॉलनी १, पोलीस कॉलनी एमआयडीसी रोड १, होमगार्ड ऑफिसजवळ १, गोकुलनगर १, डिस्टी ऑफिस १, चामोर्शी रोड १, साईनगर १, सीआरपीएफ १, कन्नमवार वाॅर्ड १, गांधी वाॅर्ड १, स्थानिक १, आयटीआय चौक १, अहेरी तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक २, फॉरेस्ट कॉलनी १, आलापल्ली २, नागेपल्ली १, आरमोरी तालुक्यातील बाधितांमध्ये पिसेवडधा १, स्थानिक २, उदापूर १, धानोरा तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक १, एटापल्ली तालुक्यातील बाधितांमध्ये स्थानिक २, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये गुरनोली १, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक १, तर वडसा तालुक्यातील बाधितामध्ये विसोरा १, मधुवन कॉलनी १, कुरूड १, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये एकाचा समावेश आहे.