लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली: प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ अंतर्गत जिल्ह्यात ३६ हजार ७० घरकुले मंजूर झाली आहेत. यापैकी १६ हजार लाभार्थ्यांच्या खात्यात पहिल्या हप्त्याची प्रत्येकी १५ हजार रुपये प्रमाणे एकूण २५ कोटी रुपये एवढी रक्कम २२ फेब्रुवारीला जमा केली जाणार आहे. एकाचवेळी ३६ हजारांवर घरकुले मंजूर करुन गडचिरोलीने राज्यात पहिल्या पाच जिल्ह्यांत स्थान मिळवले आहे. जि.प. सीईओ सुहास गाडे यांनी २१ फेब्रुवारीला पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. यावेळी ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजेंद्र भुयार उपस्थित होते. पहिल्या टप्प्यात ३१ हजार घरकुले बांधण्यात आली आहेत.
२४ कोटीरुपये एवढे अनुदान पहिल्या टप्प्यात जिन्द्यातील १६ हजार लाभार्थ्यांच्या बैंक खात्यात २२ फेब्रुवारी रोजी डीबीटी प्रणालीद्वारे जमा होईल, उर्वरित लाभार्थ्यांनाही लवकरच अनुदान मिळेल. बांधकामाच्या प्रगतीनुसार टप्प्याटप्याने उर्वरित अनुदान मिळेल.
यांना मिळतो लाभआर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) ३ लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले कुटुंब, कमी उत्पन्न गटात ३ ते६ लाख रुपयापर्यंत उत्पन्न असलेले कुटुंब या योजनेंतर्गत घरकुलाचा लाभ घेऊ शकते. पती- पत्नीपैकी एकाच जणास लाभ मिळेल. जागा स्वमालकीची हवी
दीड लाख रुपयांपर्यंत लाभयोजनेत चार टप्प्यांत १ लाख २० हुआर रुपये अनुदान हमखास मिळते नरेगांतर्गत कुटुंबातील सदस्य बांधकामावर राबल्यास मजुरीच्या स्वरुपात तसेच शौचालयाचे १२ हजार रुपये अनुदानही मिळते.
गावोगाव थेट प्रक्षेपण
- महाआवास अभियान २०२४-२५ अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण टप्पा २ मधील लाभार्थ्यांना घरकुलाचे मंजुरी पत्र आणि प्रथम हप्त्याच्चा राज्यस्तरीय वितरण सोहळा २२ फेब्रुवारी पुण्यातील बालेवाडी येथे होणार आहे.
- गडचिरोलीत स त्याच दिवशी दुपारी ३ वाजता नियोजन भवनात जिल्हास्तरीय कार्यक्रम पार पडेल, यासोबतच जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर मुख्य कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.
तालुकानिहाय मंजूर घरकुलेअहेरी - ४४६५आरमोरी - २४०८भामरागड - ४९९चामोर्शी - ६१३३धानोरा - १५४१देसाईगंज - ३८२४एटापल्ली - २४५७गडचिरोली - ३६२६कोरची - १६२४कुरखेडा - ४९१५मुलचेरा - १३५७सिरोंचा - ३२२१
"पात्र घरकुल लाभार्थ्यांनी अनुदानासाठी कोणालाही पैसे देऊ नयेत, कोणी तशी मागणी केली तर तक्रार करावी. घरकुल बांधकाम चार महिन्यांच्या आत पूर्ण करावे."- सुहास गाहे, सीईओ जि.प.