शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

३६ जणांनी केले रक्तदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 30, 2018 01:30 IST

१ जुलै रोजी डॉक्टर डे निमित्त डॉक्टर संघटनांतर्फे गडचिरोली शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. डॉक्टर डेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली असोसिएशन आॅफ मेडिकल प्रॅक्टिश्नर (गॅम) व महाराष्ट्र स्टेट मेडिसिन रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने ....

ठळक मुद्दे‘डॉक्टर्स डे’निमित्त शिबिर : मेडिकल प्रॅक्टिश्नर असोसिएशनचा पुढाकार

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : १ जुलै रोजी डॉक्टर डे निमित्त डॉक्टर संघटनांतर्फे गडचिरोली शहरासह जिल्हाभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. डॉक्टर डेच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली असोसिएशन आॅफ मेडिकल प्रॅक्टिश्नर (गॅम) व महाराष्ट्र स्टेट मेडिसिन रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने शुक्रवारी येथील चामोर्शी मार्गावरील मार्र्कंडेय हॉस्पिटलमध्ये रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात डॉक्टर, औषधविक्रेत्यांसह जवळपास ३६ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला.रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाप्रसंगी प्रामुख्याने गॅम संघटनेचे अध्यक्ष डॉ.आर.डी.मुनघाटे, सचिव डॉ.अद्वय अप्पलवार, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, मेडिकलचे संचालक तथा नगरसेवक सतीश विधाते, डॉ.चेतन कोवे, डॉ.प्रांजली आर्इंचवार आदी उपस्थित होते. सदर आरोग्य शिबिरात जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके यांच्यासह बालरोगतज्ज्ञ डॉ.प्रशांत चलाख, डॉ.किशोर वैद्य, नेत्ररोगतज्ज्ञ डॉ.लालाजी वट्टी, महेश येरोजवार, अरूण पगडपल्लीवार, महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.जयंत पर्वते, डॉ.पंकज सकिनलावार, अतुल हाडगे, तुषार चन्नावार, डॉ.उमेश समर्थ, वैभव कोपुलवार, सचिन पाटील, प्रज्वल मल्लेलवार, राहुल मंगर, राकेश वाटेकर, छोटू यादव, डॉ.वैशाली चलाख, अविनाश धाईत, आशिष बुरे, राजकुमार गोलदार, शांतीभूषण दुधे, डॉ.उनाडकाट, डॉ.तुषार डहाके, डॉ.बोदेले आदींसह ३६ जणांनी रक्तदान केले.सदर रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या जिल्हा रक्त संक्रमण अधिकारी डॉ.शैलेजा मैंदमवार यांच्या मार्गदर्शनाखाली सतीश तडकलावार यांच्यासह रक्ततंत्रज्ञ, कर्मचारी तसेच मार्र्कंडेय हॉस्पिटलच्या महिला कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.गडचिरोली असोसिएशन आॅफ मेडिकल प्रॉक्टिश्नर (गॅम) व महाराष्टÑ स्टेट मेडिसिन रिप्रेझेंटेटिव्ह असोसिएशन गडचिरोलीच्या वतीने डॉक्टर डे निमित्त दरवर्षी रक्तदान शिबिर, आरोग्य शिबिर व इतर लोकोपयोगी उपक्रम राबविले जातात. यंदा २६ जून रोजी सदर संघटनेच्या वतीने चामोर्शी तालुक्याच्या पावीमुरांडा परिसरातील मुतनूर येथे मोफत आरोग्य शिबिर घेण्यात आले.आज आरोग्यावर जनजागृती सायकल रॅलीडॉक्टरांच्या गॅम संघटनेतर्फे डॉक्टर डे निमित्त २९ जून ते १ जुलै या तीन दिवसांच्या कालावधीत विविध कार्यक्रमांचे आयोजन गडचिरोली शहरात करण्यात आले आहे. पहिल्या दिवशी शुक्रवारला रक्तदान शिबिर पार पडले. शनिवारी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. तसेच गडचिरोली शहरात सायकल रॅली काढून डॉक्टर नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जनजागृती करणार आहेत.१ जुलै रोजी रविवारला सकाळी डॉक्टरांच्या दोन संघामध्ये जिल्हा स्टेडियमवर फुटबॉलचा सामना होणार आहे. त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम व डॉक्टर डे चा समारोपीय कार्यक्रम पार पडणार आहे. या कार्यक्रमाला डॉक्टर, औषधविक्रेते, एमआर व नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आहे.

टॅग्स :doctorडॉक्टरBlood Bankरक्तपेढी