शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

३५ वर्षानंतर मिळाला न्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2018 11:22 PM

दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर गडचिरोलीच्या आदेशानुसार आष्टीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील अहेरी रोडलगतच्या ५ हजार ३०० चौरस फूट जागेवरील दुकानगाळ्यांचे अतिक्रमण हटवून या जागेचा ताबा मुरलीधर पोनलवार व गजानन पोनलवार यांना देण्यात आला.

ठळक मुद्देअतिक्रमण हटवून जागेवर घेतला ताबा : आष्टीत दिवाणी न्यायालयाची मोठी कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर गडचिरोलीच्या आदेशानुसार आष्टीच्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील अहेरी रोडलगतच्या ५ हजार ३०० चौरस फूट जागेवरील दुकानगाळ्यांचे अतिक्रमण हटवून या जागेचा ताबा मुरलीधर पोनलवार व गजानन पोनलवार यांना देण्यात आला. दिवाणी न्यायालयाच्या वतीने ही मोठी कारवाई चोख पोलीस बंदोबस्तात २२ जूनला करण्यात आली.सन १९६४ मध्ये सदर ५ हजार ३०० चौ.फूट जागा मुरलीधर पोनलवार व गजानन पोनलवार रा. अनखोडा यांनी घोटच्या अध्येंकीवार यांच्याकडून खरेदी केली. या दोघांचेही नावे ९९/२, १७६, १७७ क्रमांकाच्या सातबाऱ्यावर नमूद आहे. सदर जागा कृष्णाजी खुटेमाटे (मय्यत) व पंढरीनाथ खुटेमाटे यांना हॉटेल चालविण्यासाठी व वापरण्यासाठी देण्यात आले. त्यांनी या ठिकाणी हॉटेलचा व्यवसाय सुरू केला व त्याच ठिकाणी त्यांचे वास्तव्य होते. खुटेमाटे यांनी गाळे बांधकाम करून भाड्याने दिले. अनेक वर्ष वास्तव्य असल्याने ही जागा खुटेमाटे यांनी आपल्या ताब्यात घेतली होती. पोनलवार यांना सदर जागेचा ताबा देण्यास खुटेमाटे यांनी नकार दिला. त्यानंतर पोनलवार यांनी हे प्रकरण कोर्टात न्यायप्रविष्ट केले.२०१५ मध्ये खुटेमाटे यांची याचिका हायकोर्टाने फेटाळून लावली. त्यानंतर २१ जानेवारी २०१७ ला दुसºयांदा त्यांचे अपील कोर्टाने फेटाळली. त्यानंतर खुटेमाटे यांनी सुप्रिम कोर्टात अपील केली. येथेही अपील फेटाळण्यात आले. यापूर्वी सदर जागेचा ताबा घेण्याचा आदेश कोर्टाने दोनदा काढला होता. परंतु घराला कुलूप असल्याने व महावितरणची परवानगी नसल्याने या जमिनीचा ताबा मूळ मालकाला देण्यात आला नाही. गडचिरोलीचे मुख्य न्यायदंडाधिकारी बी.एम.पाटील यांनी कब्जा वॉरन्टचा आदेश पारित केला. २१ व २२ जूनला कब्जा वॉरन्ट देण्यात आला. बेलीफ राजेश रणशूर यांचेवर अतिक्रमण हटवून जागेचा कब्जा देण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. घर, हॉटेल व दुकानाचे गाळे पाडून सदर जागेचा ताबा मुरलीधर पोनलवार व गजानन पोनलवार यांना देण्यात आला. विद्युत पुरवठा बंद करण्याचे आदेश महावितरणला न्यायालयामार्फत देण्यात आले आहे.

टॅग्स :Enchroachmentअतिक्रमणCourtन्यायालय