शहरं
Join us  
Trending Stories
1
Bengaluru stampede: "चेंगराचेंगरीला RCBच जबाबदार"; लवादाचा निर्णय, म्हणाले- "पोलिसांकडे जादूचा दिवा नाही..."
2
मोठी बातमी! दोन वर्षांत ३.५ कोटी नोकऱ्या देणाऱ्या योजनेला केंद्राची मंजुरी; १ ऑगस्टपासून ELI लागू होणार
3
'२०-२५ वर्षे तरी दिल्लीत जागा नाही', योगी आदित्यनाथ यांच्याबद्दल भाजप खासदाराचे मोठे विधान
4
उत्तराखंडात पावसाचे थैमान, मराठी पर्यटक अडकले; DCM शिंदे मदतीस सरसावले, फोनवरुन साधला संवाद
5
"...तर मस्क यांना दुकान बंद करावे लागले असते!"; ईव्ही सब्सिडीसंदर्भात ट्रम्प यांची मस्क यांना थेट धमकी
6
“CM देवेंद्र फडणवीस विकासकामे करणारी व्यक्ती”; भाजपात प्रवेश करताच कुणाल पाटलांनी केले कौतुक
7
Raja Raghuwanshi : १६ लाखांचे दागिने, सिलोम, सोनमचा कट; राजा रघुवंशी हत्याप्रकरणाच्या तपासाची बदलली दिशा
8
Paetongtarn Shinawatra: कोण आहे 'ती' व्यक्ती; जिच्याशी फोन कॉल 'लीक' झाल्याने गेलं शिनावात्रा यांचं पंतप्रधानपद
9
“नाना पटोलेंना चर्चेत येण्यासाठी PM मोदी यांच्या नावाचा आधार लागतोय”; एकनाथ शिंदेंचा टोला
10
५०-१०० नव्हे, पाकिस्तानच्या तुरुंगात तब्बल 'इतके' भारतीय कैद! पहिल्यांदाच झाला मोठा खुलासा
11
"हार्डवेअर चांगलं होतं पण सॉफ्टवेअर खराब...", शेफाली जरीवालाच्या मृत्यूबाबत रामदेव बाबांचं वक्तव्य
12
धक्कादायक! प्रेमी युगुलाने ऑटोत घेतला गळफास; तरुणीचे लग्न ठरल्याने उचलले टोकाचे पाऊल
13
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
14
मंडीमध्ये ढगफुटीमुळे प्रचंड नुकसान; घरं, रस्ते, पूल गेले वाहून, ४ जणांचा मृत्यू, १६ बेपत्ता
15
Viral Video: इंदूरचा सुवर्ण महाल!! वॉश बेसिन ते इलेक्ट्रिक स्विच... सारं काही २४ कॅरेट सोन्यानं मढवलेलं...
16
बाजारात शांतता! गुंतवणूकदारांची 'वेट अँड वॉच'ची भूमिका; रिलायन्स-एचडीएफसीसह 'हे' शेअर्स वधारले
17
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
18
ठरलं! 'या' दिवशी जाहीर होणार सीए २०२५ परीक्षेचा अंतिम निकाल; कधी आणि कुठे पाहायचा?
19
"शेतकऱ्यांसाठी खासदारकीचा राजीनामा तोंडावर फेकला तर निलंबनाचे काय, शेतकऱ्यांसाठी...’’, निलंबनानंतर नाना पटोले आक्रमक 
20
सावत्र बापच बनला हैवान! आईला जीवे मारण्याची धमकी देऊन मुलीवर करत होता बलात्कार; मुलगी गर्भवती होताच...

जिल्ह्यात ३४५ नव्या गावांचा होणार उदय

By admin | Updated: July 5, 2014 23:33 IST

जिल्ह्यातील अनेक वस्त्या पेसा, अनुसूचित विस्तार कार्यक्रम कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वस्त्या, वाड्या व टोल्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश राज्याच्या ग्राम विकास

पेसा कायदा : वाड्या, वस्त्या व टोल्यांना मिळणार स्वतंत्र ओळखदिलीप दहेलकर -गडचिरोलीजिल्ह्यातील अनेक वस्त्या पेसा, अनुसूचित विस्तार कार्यक्रम कार्यक्षेत्राच्या वसाहतीत येतात. या वस्त्या, वाड्या व टोल्यांना स्वतंत्र गावाचा दर्जा देण्याचे आदेश राज्याच्या ग्राम विकास विभागाने दिले आहे. यानुसार जिल्हा परिषद प्रशासनाने या कार्यक्रमाची अंमलबजावणी सुरू केली आहे. त्यानुसार जिल्ह्यामध्ये एकूण ३४५ नव्या गावांचा उदय होणार असून या गावांना स्वतंत्र ओळखही मिळणार आहे. ४ मार्च २०१४ च्या शासनाच्या अधिसूचनेनुसार जि.प.च्या पंचायत विभागाने या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महिनाभरापूर्वी जिल्हा परिषदेत बैठक बोलाविली. तसेच ग्रामसभेचे प्रस्तावही मागितले. सद्य:स्थितीत जिल्हा परिषदेकडे ११ तालुक्यातील ३४५ पैकी एकूण २९२ प्रस्ताव प्राप्त झाले आहे. यात गडचिरोली ३, आरमोरी १५, कुरखेडा ४३, धानोरा ४९, चामोर्शी १५, अहेरी ०, एटापल्ली ११२, कोरची २५ व मुलचेरा तालुक्यातील १२, भामरागड १२, सिरोंचा तालुक्यातील ६ ग्रामसभेच्या प्रस्तावांचा समावेश आहे. ग्रामसभेची मंजुरी एकूण मतदाराच्या ५० टक्के उपस्थितीत वाड्या, वस्त्या व टोल्यांना गावांचा दर्जा देण्यासाठी पेसा कायद्यांतर्गत आवश्यक आहे. जि.प.ने सदर प्रस्ताव संवर्ग विकास अधिकाऱ्यांमार्फत उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविले. या प्रस्तावाला अंतिम मंजुरी जिल्हाधिकारी देतात. जिल्हाधिकाऱ्यांच्या मंजुरीनंतर वाड्या व वस्त्यांना स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. विशेष म्हणजे, जिल्ह्यातील ३४५ वस्त्या, वाड्या व टोल्यांना गावाचा दर्जा मिळण्यासाठी जि.प.च्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला आहे. उर्वरित ५३ ग्रामसभेचे प्रस्ताव तत्काळ सादर करण्याचे निर्देश सीईओंनी दिले.गावांची संख्या वाढणारजिल्ह्यात एकूण ४६७ ग्रामपंचायती आहे. या ग्रामपंचायतींतर्गत एकूण १ हजार ६८१ गावे आहेत. आता ३४५ वाड्या, वस्त्या व टोल्यांना पेसा कायद्यांतर्गत स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. यामुळे जिल्ह्यातील गावांची एकूण संख्या २ हजार २६ पर्यंत पोहोचणार आहे. पेसा कायद्याने आदिवासी वसाहतींना विशेष अधिकार दिले आहे. यामुळे जिल्ह्यात नव्या गावांची निर्मिती होणार आहे. पेसा कायद्यांतर्गत सर्वाधिक एटापल्ली तालुक्यात ११२ वाड्या, वस्त्या, टोल्यांना स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. या कामी जिल्हा परिषद प्रशासन झपाट्याने लागले आहे.नव्या गावांचा विकास होणारपेसा कायद्यांतर्गत जिल्ह्यात एकूण ३४५ वाड्या, वस्त्या व टोल्यांना स्वतंत्र गावांचा दर्जा मिळणार आहे. या वाड्या, वस्त्या व टोल्यातील नागरिकांना राज्य घटनेनुसार मतदानाचा अधिकार मिळाला आहे. मात्र गावांचा दर्जा मिळाला नसल्याने संबंधित ग्रामपंचायत या वाड्या, वस्त्या व टोल्यांचा विकास करण्याकडे दुर्लक्ष करते. त्यामुळे या वाड्या, वस्त्या व टोल्यांमध्ये अद्यापही अनेक मुलभूत समस्या कायम आहेत. सदर वस्त्या मुलभूत सोयीसुविधांपासून वंचित आहे. या वस्त्यांना पेसा कायद्यांतर्गत गावांचा दर्जा मिळाल्यानंतर शासनाचा निधी प्राप्त होऊन विकास होणार आहे.