शहरं
Join us  
Trending Stories
1
अजित पवार आले, पुष्पगुच्छ दिला अन हात जोडले; छगन भुजबळ अखेर मंत्री झाले, शपथ घेतली 
2
“वाह फडणवीस वाह, एका भ्रष्ट मंत्र्याच्या जागी दुसरा भ्रष्ट मंत्री, जनता अशीच भरडली जाणार”
3
'आकाशाशी नातं जडलेला' तारा निखळला; ज्येष्ठ खगोलशास्त्रज्ञ जयंत नारळीकर यांचे निधन
4
'ऑपरेशन सिंदूर' सिनेमावरून अक्षय कुमार आणि विकी कौशलमध्ये भांडणं?
5
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक
6
शेख हसीना यांच्याविरूद्ध बांगलादेश सरकारची नवी खेळी! आधी पक्षावर बंदी, त्यातच आता...
7
कोरोना पुन्हा डोकं वर काढतोय! महाराष्ट्र दुसऱ्या स्थानावर, देशांत सर्वाधिक रुग्णसंख्या कुठे?
8
संपूर्ण पाकिस्तान आमच्या रेंजमध्ये, लपायलाही जागा उरणार नाही; भारतीय सैन्याने दिला इशारा
9
लग्नानंतर ६ महिन्यांतील फक्त २१ दिवस एकत्र होते विरुष्का, अनुष्काचा खुलासा, म्हणाली...
10
OMG! रोहित शर्माने त्याची लँबॉर्गिनी उरुस ड्रीम ११ विजेत्याला गिफ्ट देऊन टाकली; रिक्षाने परतला घरी...
11
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानी दूतावासात केक घेऊन जाणारा 'तो' डिलिव्हरी बॉय ज्योती मल्होत्रासोबतही दिसला!
12
ज्योती मल्होत्रासोबत जोडलं पुरीच्या युट्यूबरचं नाव; ओडिशाचे मंत्री म्हणतात, "कठोर कारवाई..."
13
शेअर बाजारात संथ सुरुवात! आयटी आणि मेटलमध्ये तेजी, तर ऑटो आणि बँकिंगमध्ये घसरण
14
“...तर विजय शाह यांची पक्षातून कायमची हकालपट्टी केली असती”; मित्रपक्षाचा भाजपाला घरचा अहेर
15
सात दिवसांपूर्वीच भुजबळांना कळविण्यात आलं होतं; पडद्यामागे नेमकं काय काय घडलं? या तीन नेत्यांनी घेतला निर्णय
16
'रेडिएशन'मधील त्रुटींमुळे अमेरिकेने भारताचे ५ कोटी रुपयांचे आंबे केले नष्ट; काय असते प्रक्रिया?
17
केवळ योगायोग, की...? दोन लागोपाठ अपयशांनी इस्रोने चिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज
18
फ्रान्सचा बांगलादेशला झटका; मॅक्रो यांनी युनूस यांच्यासोबत द्विपक्षीय बैठकीस दिला नकार
19
ठाकरेंचे ५० टक्के माजी नगरसेवक शिंदेसेनेत; बैठकाच नाही, नाराजांची नाराजी कळणार कधी अन् कशी?
20
“सरकारचे POKवर स्पष्ट धोरण नाही, युद्धकाळात पारदर्शकता राखायला हवी होती”: पृथ्वीराज चव्हाण

३४ हजार शौचालय होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 29, 2016 01:22 IST

स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात बांधावयाच्या वैयक्तिक शौचालयाच्या जिल्हा परिषदेच्या वार्षिक

वार्षिक कृती आराखडा मंजूर : बांधकामाचे उद्दिष्ट दुपटीने वाढले; गोदरीमुक्तीवर जि. प. सीईओंचा भरदिलीप दहेलकर गडचिरोलीस्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात बांधावयाच्या वैयक्तिक शौचालयाच्या जिल्हा परिषदेच्या वार्षिक कृती आराखड्याला राज्य शासनाने मंजुरी प्रदान केली आहे. या आराखड्यानुसार जिल्ह्यात १५८ ग्रामपंचायतीच्या गावांत एकूण ३४ हजार २४९ वैयक्तिक शौचालय होणार आहेत. विशेष म्हणजे शासनाने यंदा वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट दुपटीने वाढविले आहे. भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात स्वच्छतेचा संदेश देऊन गाव पातळीवर वैयक्तिक शौचालय उभारण्याचा जम्बो कार्यक्रम हाती घेतला. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) अंतर्गत वैयक्तिक शौचालय उभारणीवर राज्य सरकारनेही कठोर पावले उचलली आहेत. स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधणाऱ्या लाभार्थ्यांना शासनाकडून १२ हजार रूपयांचे अनुदान दिले जाते. यामध्ये ६० टक्के रक्कम केंद्र व ४० टक्के रक्कम राज्य शासनाकडून मिळते. या कार्यक्रमांतर्गत गडचिरोली जिल्ह्यात गतवर्षी सन २०१५-१६ मध्ये बाराही तालुक्यात एकूण ११ हजार ९४९ वैयक्तिक शौचालय बांधण्यात आले.देसाईगंज तालुक्याला वगळलेस्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत गतवर्षी सन २०१५-१६ मध्ये देसाईगंज तालुक्याला एकूण २ हजार ५२५ वैयक्तिक शौचालयाचे उद्दिष्ट देऊन तेवढेच शौचालय मंजूर करण्यात आले. मात्र यंदा सन २०१६-१७ वर्षात देसाईगंज तालुक्यातील एकाही ग्रामपंचायतीचा शौचालय बांधकामाच्या वार्षिक कृती आराखड्यात समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे यंदा या तालुक्यात वैयक्तिक शौचालयाचे काम होणार नाही. एक कोटींचा निधी उपलब्धस्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत सन २०१६-१७ या वर्षात गडचिरोली जिल्ह्यात वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी लाभार्थ्यांना अनुदान देण्याकरिता गडचिरोली जिल्हा परिषदेला १ कोटींचा निधी शासनाकडून उपलब्ध झाला आहे. या निधीतून राज्य शासनाच्या पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाने मंजूर केलेल्या वार्षिक कृती आराखड्यातील उद्दिष्टानुसार १५८ ग्रामपंचायतीत एकूण ३४ हजार २४९ वैयक्तिक शौचालय उभारण्यात येणार आहे.बांधकाम न करणाऱ्या ग्रामसेवकावर होणार कारवाईजिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकामासंदर्भात अलिकडेच अधिकाऱ्यांची बैठक घेतली. कृती आराखड्यातील उद्दिष्टानुसार मंजूर शौचालयाचे बांधकाम न करणाऱ्या संबंधित ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांवर कठोर कारवाई करणार, असा इशारा त्यांनी बैठकीत दिला. नुकताच त्यांनी शौचालय बांधकामासंदर्भात सिरोंचा, अहेरी, धानोरा तालुक्याच्या ग्रामीण भागात दौरा केला. ९० शौचालयाचे काम सुरूस्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत १५८ ग्रामपंचायतीमध्ये होणाऱ्या वैयक्तिक शौचालयाच्या वार्षिक कृती आराखड्याला शासनाने मे महिन्यात मंजुरी प्रदान केली. सद्य:स्थितीत गाव पातळीवर ९० शौचालयाचे काम सुरू असल्याची माहिती जि. प. च्या सूत्रांकडून मिळाली आहे. धान पिकाची रोवणी आटोपल्यानंतर शौचालयाच्या बांधकामाला जिल्ह्यात गती मिळणार आहे.