शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
5
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
6
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
7
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
8
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
9
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
10
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
11
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
13
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
14
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
15
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
16
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
17
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
18
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
19
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
20
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
Daily Top 2Weekly Top 5

सिकलसेलचे 34 हजार 805 रुग्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2020 05:00 IST

सिकलसेल आजाराच्या समूळ उच्चाटणासाठी उपचार उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळाेवेळी उपचार घ्यावा लागताे. शरीरातील हिमाेग्लाेबिनचे प्रमाण कमी हाेताच  व्यक्ती अनेक आजाराला बळी पडून मृत्यूमुखी पडताे. सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्या वेळी जेनेटीक बदलामुळे हाेताे.  तसेच रक्तदाेषामुळे उद्भवणारा दुर्धर आजार असून जन्मापासून मनुष्याच्या अंतापर्यंत साेबत राहताे. रक्तात लाल व पांढऱ्या अशा दाेन प्रकारच्या पेशी असतात. 

ठळक मुद्देजिल्ह्यातील स्थिती : वाहक व ग्रस्तांचा समावेश, आजपासून जनजागृती सप्ताह

  लाेकमत न्यूज नेटवर्ककुरखेडा : अत्यंत दुर्धर व अनुवांशिक आजार म्हणून ओळख असलेल्या सिकलसेलग्रस्त रुग्णांना नियमित रक्ताची आवश्यकता भासते. त्यांना वेळाेवेळी रक्त द्यावे लागते. रक्ताचे प्रमाण कमी राहत असल्याने ग्रस्त रुग्ण वारंवार आजारी पडताे. या गंभीर आजाराचे जिल्ह्यात ३४ हजार ८०५ रुग्ण आहेत. ते वेळाेवेळी औषधाेपचार घेत आहेत. ११ ते १७ डिसेंबर या कालावधीत सिकलसेल जनजागृती सप्ताह पाळला जाणार आहे. सिकलसेल आजाराच्या समूळ उच्चाटणासाठी उपचार उपलब्ध नसल्याने रुग्णांना वेळाेवेळी उपचार घ्यावा लागताे. शरीरातील हिमाेग्लाेबिनचे प्रमाण कमी हाेताच  व्यक्ती अनेक आजाराला बळी पडून मृत्यूमुखी पडताे. सिकलसेल हा आजार गर्भधारणेच्या वेळी जेनेटीक बदलामुळे हाेताे.  तसेच रक्तदाेषामुळे उद्भवणारा दुर्धर आजार असून जन्मापासून मनुष्याच्या अंतापर्यंत साेबत राहताे. रक्तात लाल व पांढऱ्या अशा दाेन प्रकारच्या पेशी असतात. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरात लाल रक्तपेशींचा आकार गाेल असताे. परंतु सिकलसेल रुग्णात पेशीचा आकार ऑक्सिजन पुरवठ्याअभावी विळ्यासारखा हाेताे.  आई आणि वडील दाेघेही सिकलसेलग्रस्त किंवा  वाहक असल्यास त्यांच्या आपत्यांना हा आजार हाेताे. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक-ग्रस्त व्यक्तीने आपापसात विवाह टाळावे. सिकलसेल वाहक-पीडित व्यक्तीने एकमेकांशी विवाह करू नये. गडचिराेली जिल्ह्यात अनुसूचित जाती, जमाती, इतर मागासवर्गीय व अन्य समाजातील एकूण ३२  हजार २९४ सिकलसेल वाहक तर याच समाजातील २ हजार ५११ सिकलसेल ग्रस्त असे एकूण ३४ हजार ८०५ सिकलसेल रुग्ण आहेत.  या रूग्णांना वेळाेवेळी औषधाेपचारासह शासकीय याेजनांचा लाभ मिळणे गरजेचे आहे.

विदर्भात दीड लाखांवर रुग्णराज्यातील ३६  जिल्ह्यांपैकी २१ जिल्ह्यात अडीच लाखांवर सिकलसेल रुग्ण आहेत. विदर्भातील ११ जिल्हे सिकलसेलने अधिक प्रभावित आहेत. दीड लाखांवर अधिक रुग्ण विदर्भात आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात  ३४ हजार ४६५, गाेदिंया जिल्ह्यात १२ हजार ५४०, भंडारा जिल्ह्यात  १३ हजार २००, नागपूर जिल्ह्यात २६ हजार ७६२, वर्धा जिल्ह्यात १४ हजार ८२ रुग्ण सिकलसेल ग्रस्त आहेत. याशिवाय अन्य जिल्ह्यांमध्ये आदिवासी दलित व मागासवर्गीय समाजात सिकलसेल रुग्णांचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येते. 

प्रत्येक सिकलसेल रुग्णांवर दरवर्षी १० ते ३० हजार रुपयांचा खर्च शासनातर्फे केला जाताे. परंतु ग्रामीण व दुर्गम भागातील गरीब रुग्ण शासनाच्या लाभापासून वंचित राहतात. काेणताही सिकलसेल रुग्ण वंचित राहणार नाही, यासाठी शासनाने सिकलसेल जनजागृतीची व्याप्ती वाढविण्याची गरज आहे. - डाॅ.रमेश कटरे, अध्यक्ष, आराेग्यधाम संस्था, कुरखेडा

टॅग्स :Healthआरोग्य