शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

मेळाव्यात ३२ मुस्लीम जोडपी विवाहबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 21:53 IST

तमाम मुस्लीम जमाअत देसाईगंजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा २६ डिसेंबर रोजी बुधवारला स्थानिक कमलानगर स्थित मदिना मस्जिदच्या प्रशस्त आवारात सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मुस्लीम समाजातील ३२ जोडप्यांचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून देण्यात आला.

ठळक मुद्देदेसाईगंजात सोहळा : तमाम मुस्लिम जमाअतचा पुढाकार; आठ वर्षांपासून उपक्रम कायम

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : तमाम मुस्लीम जमाअत देसाईगंजच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदा २६ डिसेंबर रोजी बुधवारला स्थानिक कमलानगर स्थित मदिना मस्जिदच्या प्रशस्त आवारात सामूहिक विवाह सोहळा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात मुस्लीम समाजातील ३२ जोडप्यांचा रितीरिवाजाप्रमाणे विवाह लावून देण्यात आला.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून आ.कृष्णा गजबे, देसाईगंजच्या नगराध्यक्ष शालू दंडवते, उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा, किसन नागदेवे, बशीर पटेल, सामाजिक कार्यकर्ते संतोष श्याम दासानी, नरेश विठ्ठलानी, देसाईगंजचे माजी नगराध्यक्ष जेसा मोटवानी, आरिफ खानानी, नगरसेवक हरीष मोटवानी, लच्चू रामानी, माजी नगराध्यक्ष डॉ.महेश पापडकर, ईश्वर कुमरे, मदिना मस्जिदचे इमाम कपील अहेमद नुरी, ख्वाजा गरीब नवाब मस्जिदचे इमाम कारी, गुलाम अहेमद यासिनी आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी आ.कृष्णा गजबे म्हणाले, प्रतिष्ठेसाठी आयोजित करण्यात येणारे विवाह सोहळे अकारण खर्चास निमंत्रण आहे. विवाह सोहळ्याच्या माध्यमातून अनेक कुटुंब कर्जबाजारी होतात. या सर्व समस्येवर मात करण्यासाठी सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन हाच स्तुत्य उपक्रम आहे. सामाजिक बांधिलकी जोपासत आपले नैतिक कर्तव्य समजून एकात्मतेच्या भावनेने समाजबांधवांनी सहकार्य केल्यास अशा प्रकारच्या विवाह सोहळ्याचे आयोजन यशस्वीरित्या होऊ शकते, असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्य कुटुंबियांना मुला, मुलींचे लग्न पैसेअभावी कसे पार पाडायचे, असा प्रश्न अनेकदा निर्माण होतो. आर्थिक स्थिती बेताची असलेल्या कुटुंबांसाठी सामूहिक विवाह सोहळे फायदेशिर ठरतात, असे आ.गजबे यांनी सांगितले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी खलील खान, मोहम्मद खान, युनुस खानानी, आरिफ पटेल, मीर उमेद, गुफरान कुरैशी, हाजी अहमद कादर कुरैशी, आमीर शेख, अहमद सलाम, मकसुद खान पठाण, आबीद अली, एम.के.मज्जीद, मिसार अहमद, नवेद पठाण यांच्यासह तमाम मुस्लीम जमाअतच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहकार्य केले. सदर विवाह सोहळ्याला उपवर-वधूचे नातेवाईक उपस्थित होते.आठ वर्षात २०३ मुस्लीम जोडपी विवाहबद्धदेसाईगंज येथे बुधवारी झालेल्या सामूहिक विवाह सोहळ्यात लगतच्या नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली जिल्ह्याच्या एकूण २६ तालुक्यातील ३२ जोडपी रितीरिवाजाप्रमाणे विवाहबद्ध झाली. मुस्लीम समाजाच्या वतीने सामूहिक विवाह सोहळा आयोजन करण्याचे हे सलग आठवे वर्ष आहे. या आठ वर्षांत मुस्लीम समाजातील २०३ जोडपी विवाहबद्ध झाली आहेत. विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना मुस्लीम समाजाच्या वतीने संसारोपयोगी भेट साहित्य वितरित करण्यात आले. दरवर्षी विवाहबद्ध झालेल्या जोडप्यांना साहित्य प्रदान केले जाते.