चामोर्शी तालुका : विधवा, अपंग, वृध्दापकाळ नवृत्ती वेतन योजनाचामोर्शी : विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत चामोर्शी तालुक्यात विधवा, अपंग, वृध्द व निराधार लाभार्थ्यांची ३ हजार १४२ प्रकरणे मंजूर करून २0१३-१४ व २0१४-१५ या वर्षात लाभ देण्यात आला. कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचा मृत्यू झाल्यास अथवा कुटुंबाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्यास विशेष अर्थसहाय्य योजनेतर्फे लाभ दिला जातो. संजय गांधी निराधार योजना समिती चामोर्शीच्यावतीने अनेक प्रकरणे निकाली काढण्यात आली.दारिद्रय़रेषेखालील कुटुंबातील १८ ते ५९ या वयोगटातील व्यक्ती मयत झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत २0 हजार रूपये मंजूर करण्यात येते. मे २0१४ मध्ये चामोर्शी तालुक्यातील १३ लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. २0१३-१४-१५ या वर्षात संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत ४३१ प्रकरणे प्राप्त झाली. त्यापैकी ३६३ प्रकरणे मंजूर तर ६८ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा नवृत्ती वेतन योजनेंतर्गत एकूण ५१ प्रकरणे प्राप्त झाली व ही सर्व प्रकरणे मंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय अपंग नवृत्ती वेतन योजनेंतर्गत एकूण प्राप्त ११ प्रकरणो निकाली काढण्यात आली. o्रावण सेवा राज्य नवृत्ती वेतन योजना (नॉन बीपीएल) योजनेची २ हजार १४३ प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी १ हजार ४५३ प्रकरणे मंजूर तर ६९0 प्रकरणे नामंजूर करण्यात आली. इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ नवृत्ती वेतन योजनेची (बीपीएल) एकूण १ हजार ६६८ प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी १ हजार १५७ प्रकरणे मंजूर तर ४९१ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेची १११ प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी १0७ प्रकरणे मंजूर तर ४ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत एकूण ४ हजार ३९५ प्रकरणे प्राप्त झाली. यापैकी ३ हजार १४२ प्रकरणे मंजूर तर १ हजार २५३ प्रकरणे नामंजूर करण्यात आली. राष्ट्रीय कुटुंब लाभ योजनेंतर्गत तालुक्यातील तुमडी येथील डाळंबा देवेंद्र गलबले व विष्णुपूर येथील रीना रतन शाकारी यांना प्रत्येकी २0 हजार रूपयाच्या आर्थिक मदतीचे धनादेश चामोर्शीचे उपविभागीय अधिकारी एम. देवेंद्रसिंह यांच्या हस्ते वितरीत करण्यात आले. यावेळी तहसीलदार सिध्दार्थ खंडारे, नायब तहसीलदार देवेंद्र दहीकर आदी उपस्थित होते. विशेष अर्थसाहाय्य योजनेंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना मदत केली जात आहे. ग्रामीण भागातील पात्र लाभार्थी शासनाच्या मदतीपासून वंचित राहू नये, यासाठी महसूल यंत्रणेमार्फत विशेष दक्षता घेतली जात आहे. विशेष अर्थसाहाय्य योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी संबंधित गावच्या तलाठय़ाकडे विहित नमुन्यातील अर्ज भरून सादर करावे व शासकीय योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन तहसीलदार सिध्दार्थ खंडारे यांनी केले आहे. (शहर प्रतिनिधी)
३ हजार १४२ प्रकरणे मंजूर
By admin | Updated: May 30, 2014 23:43 IST