शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात अतिवृष्टीने ६९ लाखांचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2018 01:15 IST

यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली.

ठळक मुद्देपिकांचीही झाली हानी : १० नागरिकांचा गेला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षीच्या पावसाळ्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे सुमारे ६९ लाख रूपयांच्या संपत्तीचे नुकसान झाले आहे. यामध्ये १० नागरिकांना जीव सुध्दा गमवावा लागला आहे.हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत यावर्षी पावसाने सरासरी गाठली. अगदी सुरूवातीपासून सातत्याने पाऊस कोसळत आहे. अधूनमधून अतिवृष्टीसुध्दा होत आहे. अतिवृष्टीमुळे अनेकदा पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे सखल भागात वास्तव्यास असलेल्या गावांना या पुराचा फटका बसला आहे. यावर्षी विशेष करून दक्षिणेकडील अहेरी, भामरागड व मुलचेरा, सिरोंचा या तालुक्यांना सर्वाधिक झळ सहन करावी त्यातही अहेरी तालुक्यात सर्वाधिक नुकसान झाले. अतिवृष्टीमुळे १० नागरिकांचा मृत्यू झाला. प्रत्येक व्यक्तीला शासनाकडून चार लाख रूपयांची मदत दिली जाते. ८२ लहान जनावरे मृत्यूमुखी पडले. यामुळे २ लाख ५८ हजारांची नुकसान झाले. मोठी १६५ जनावरे मृत्यूमुखी पडली. यामुळे २० लाख ७१ हजारांचे नुकसान झाले. १ हजार ८९ शेळ्या मरण पावल्या. १ हजार ५९३ घरांचे अंशत: नुकसान झाले. यामुळे ४० लाख रूपयांचे नुकसान झाले. तर ५५ घरे पूर्णपणे कोसळली आहेत. यामुळे ५ लाख २० हजारांचे नुकसान झाले. गुरांचे ६७ गोठे कोसळले. यामुळे ८१ हजार २०० रूपयांचे नुकसान झाले.पावसाळ्याच्या सुरूवातीपासून यावर्षी पाऊस कोसळत आहे. एक-दोन दिवसानंतर पाऊस कोसळत आहे. संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मध्यंतरी आठ दिवस पावसाने उसंत घेतली होती. त्यानंतर आता गुरूवारपासून पुन्हा पावसाला सुरूवात झाली आहे. सध्याचे वातावरण लक्षात घेतले तर पाऊस आणखी काही दिवस थांबण्याची शक्यता वर्तविली जात आहे.संततधार पावसाने जनजीवन विकस्ळीतमागील दोन दिवसांपासून जिल्हाभरात संततधार पाऊस पडत आहे. यामुळे ग्रामीण भागासह शहरी भागातीलही जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे गडचिरोली शहरातील बाजारपेठ शुकशुकाट दिसून येत होता. शासकीय कार्यालयांमध्येही नागरिक येत नसल्याने कर्मचारी आपल्या मर्जीने खुर्च्या लाऊन बसल्याचे चित्र दिसून येत होते. यावर्षीच्या पावसाने धानपीक डोलत आहे. मात्र कापूस, सोयाबिन, तूर या पिकांना पावसाचा फटका बसला आहे. या पिकांना पाण्याची कमी गरज राहते. मात्र सातत्याने पडणाऱ्या पावसामुळे जमीन ओलिचिंब आहे. परिणामी या पिकांची वाढ खुंटली आहे. पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास सोयाबिन, कापसाच्या उत्पादनात कमालीची घट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :Rainपाऊस