लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : राष्ट्रीयस्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून चॅम्पिययन ठरलेली स्थानिक शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी संगीता रूमाले हिला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधी मंडळातील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी २५ हजार रूपयांची मदत केली.राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरील सामन्यांसाठी होतकरू खेळाडूंना मदत देण्याचे आश्वासन आ. वडेट्टीवार यांनी दिले होते. त्यांनी प्रत्यक्ष मदत करून हे आश्वासन पाळले आहे. अजबगजब विचार मंचच्या वतीने येथील वासेकर लॉनमध्ये २९ जानेवारी रोजी आयोजित कार्यक्रमात संगीताच्या सत्काराप्रसंगी आर्थिक मदत करण्याचे आश्वासन आ. वडेट्टीवार यांनी दिले होते. त्यानुसार ३१ जानेवारी रोजी आ. वडेट्टीवार यांनी प्राथमिक स्वरूपात २५ हजारांची मदत संगीता रूमालेला केली. आर्थिक मदत देताना जि.प. सदस्य अॅड. राम मेश्राम, युवा गर्जनाचे अध्यक्ष अनिल तिडके, अजबगजब विचार मंच संयोजक सतीश त्रिनगरीवार, प्रशिक्षक महेश नीलेकर, यशवंत कुरूडकर आदी उपस्थित होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू पोहोचण्यासाठी त्यांना आर्थिक मदत व सुविधा देण्याची गरज आहे.
बॉक्सिंगपट्टू संगीताला २५ हजारांची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2018 00:33 IST
राष्ट्रीयस्तरावर बॉक्सिंग स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून चॅम्पिययन ठरलेली स्थानिक शिवाजी कनिष्ठ विज्ञान महाविद्यालयाची विद्यार्थिनी संगीता रूमाले हिला काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा विधी मंडळातील काँग्रेसचे उपगटनेते आ. विजय वडेट्टीवार यांनी २५ हजार रूपयांची मदत केली.
बॉक्सिंगपट्टू संगीताला २५ हजारांची मदत
ठळक मुद्दे आश्वासन पाळले : विजय वडेट्टीवार यांचे दातृत्व