शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

छत्तीसगडमधून जिल्ह्यात आलेली २५ लाख रूपयांची दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2019 01:36 IST

दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही दारू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा सुरूच असल्याची बाब कुरखेडाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली. या कारवाईत एका ४०७ मालवाहू वाहनातून आलेली दारू पोलिसांनी पकडली.

ठळक मुद्देकुरखेडा एसडीपीओंची कारवाई : मालवाहू वाहनातून सुरू होता पुरवठा

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : दारूबंदी असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात काही दारू तस्करांकडून मोठ्या प्रमाणात दारूचा पुरवठा सुरूच असल्याची बाब कुरखेडाच्या उपविभागीय पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या कारवाईत उघडकीस आली. या कारवाईत एका ४०७ मालवाहू वाहनातून आलेली दारू पोलिसांनी पकडली. त्यातील तब्बल २५ लाख रुपयांच्या विदेशी दारूच्या पेट्या जप्त करण्यात आल्या.ही कारवाई डोंगरगाव येथे रविवारी (दि.६) करण्यात आली. परंतू दोन दिवस या कारवाईचा मागमूसही कोणाला लागला नाही. एरवी थोडी दारू पकडली तरी माहिती देणाºया पोलिसांनी एवढी मोठी दारू पकडूनही त्याचा गवगवा का केला नाही? यामागील रहस्य काय? अशी चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे.‘लोकमत’ने यासंदर्भात विचारणा केल्यानंतर कुरखेडाचे एसडीपीओ शैलेश काळे यांनी सांगितले की, एका मालवाहू वाहनातून छत्तीसगडकडून मोठ्या प्रमाणात दारूची आयात केली जात असल्याची गुप्त माहिती त्यांना मिळाली होती. त्यानुसार पुराडा या गावाजवळ नाकेबंदी करण्यात आली. परंतू नाकेबंदीची माहिती दारूच्या पेट्या आणणाºया त्या वाहनचालकापर्यंत पोहोचली. त्यामुळे त्याने आपले वाहन देऊळगावकडे वळविले. त्याच्या दुर्दैवाने त्याच वेळी वाहनाचे एक चाक पंक्चर झाले. अशा स्थितीत वाहनाचालक आणि त्याचे सहकारी वाहन तिथेच सोडून पळून गेले.दरम्यान नाकेबंदी लावून बसलेल्या एसडीपीओंच्या पथकाला याची माहिती मिळताच त्यांनी देऊळगावकडे मोर्चा वळविला आणि त्या वाहनाची तपासणी केली. त्यात तब्बल २४ लाख ९५ हजार रुपयांच्या विदेशी दारूच्या पेट्या आढळल्या. त्या पेट्यांसह ७ लाखांचे वाहन असा एकूण ३२ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला. दरम्यान पंचर वाहनात दारूच्या पेट्या असल्याची माहिती मिळाल्यानंतर गावातील काही नागरिकांनीही त्यातील काही दारू लांबवल्याचे सांगितले जाते.‘ते’ वाहन कोणाच्ंो?ज्या मालवाहू वाहनातून ही दारू येत होती त्या वाहनाचा क्रमांक एमएच ४९, डीएस ३३५५ असा होता. त्यावरून पोलिसांनी ते वाहन कोणाचे हे शोधण्याचा प्रयत्न केला असता तो नंबरच अस्तित्वात नसल्याचे दाखविले. त्यामुळे संबंधिताने डुप्लिकेट नंबरप्लेट बसविल्याचे दिसून आले. त्यामुळे वाहनाच्या चेसिस नंबरवरून वाहन मालकाचा शोध घेणे सुरू आहे.कुरखेडा, गडचिरोली आणि चामोर्शीत पुरवठाछत्तीसगडमधून आलेली ही दारू कुख्यात दारू तस्कर निर्मल धमगाये याची असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. विशेष म्हणजे ती कुरखेडा, गडचिरोली आणि चामोर्शी तालुक्यातील तीन दारू विक्रेत्यांकडे पोहचविली जात होती. यापूर्वीही त्यांच्याकडे अशाच पद्धतीने दारू पोहोचत होती. धमगाये या दारू तस्करावर यापूर्वी दारूबंदी कायद्यान्वये अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र त्याचे धंदे थांबलेले नाहीत. त्याच्यावर कडक कारवाई करून पोलीस त्याच्या कारवायांना पूर्णपणे आळा घालणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.एक्साईज व एलसीबीसमोर आव्हानमद्यविक्री सुरू असलेल्या जिल्ह्यातून किंवा लगतच्या छत्तीसगड, तेलंगणातून येणाºया अवैध दारूला रोखण्याचे आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभाग (एक्साईज) आणि स्थानिक गुन्हे शाखेसमोर (एलसीबी) उभे ठाकले आहे. एक्साईज विभागाला अनेक दिवसानंतर नवीन अधीक्षक मिळाल्या आहे. आतातरी हा विभाग कारवाई करून दारू तस्करीला आळा घालणार का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत.

टॅग्स :liquor banदारूबंदीArrestअटक