शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

नवीन वर्षासाठी २३१ कोटींचा निधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 06:00 IST

या बैठकीला ना.पवार यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार देवराव होळी, अपर मुख्य सचिव नियोजन, अप्पर मुख्य सचिव वित्त, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.

ठळक मुद्देअर्थमंत्र्यांची नागपुरात बैठक : जिल्ह्याचा मानव विकास निर्देशांक सुधारण्याची सूचना

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : नवीन आर्थिक वर्षासाठी जिल्ह्याला २३१ कोटी ४० लाख रुपयांच्या मागणीला मंजुरी देण्यात आली. राज्याचे अर्थ व नियोजनमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि.२८) नागपुरात नियोजन बैठक घेण्यात आली. यामध्ये नियतव्यय मर्यादा ही १४९.६४ कोटींची आहे. या व्यतिरिक्त पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मागणीनुसार वाढीव ५० कोटी रुपये आरोग्य, शिक्षणासह इतर विषयांसाठी मंजूर करण्यात आले.या बैठकीला ना.पवार यांच्यासह जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार देवराव होळी, अपर मुख्य सचिव नियोजन, अप्पर मुख्य सचिव वित्त, विभागीय आयुक्त संजीव कुमार, जिल्हाधिकारी दीपक सिंगला, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड आणि विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील आरोग्य सुविधांसाठी विशेष बाब म्हणून अतिरिक्त ५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. नक्षलप्रभावित गडचिरोली जिल्ह्यात नक्षल आत्मसमर्पित व्यक्ती व नक्षलपीडित व्यक्ती यांच्यासाठी १० कोटींचा अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला. अजित पवार यांनी गडचिरोलीमधील नक्षल प्रभाव कमी करण्यासाठी पालकमंत्र्यांच्या मागणीनुसार विविध निधींची वाढीव मागणी यावेळी मंजूर केली. आत्मसमर्पित नक्षलवादी व पीडितांबरोबरच पोलिसांच्या निवासाची उत्तम सोय होण्याकरिता पोलीस निवासस्थानांसाठी अतिरिक्त १५ कोटी रुपये मंजूर करण्यात आले. तसेच पोलीस विभागाला लागणाऱ्या वाहनांकरिता १ कोटी निधी देण्यात आला. या प्रकारे जिल्ह्यासाठी सन २०२०-२१ या वर्षाकरिता वाढीव निधीसह एकूण २३१.४० कोटींच्या तरतुदीला या बैठकीत मंजुरी देण्यात आली.अर्थमंत्री पवार यांनी गडचिरोली व नंदुरबार या जिल्ह्यातील मानव विकास निर्देशांक कमी आहे, तो वाढवण्यासाठी प्रयत्न करा, अशा सूचना दिल्या. त्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील आरोग्य, शिक्षणविषयक बाबींसाठी अतिरिक्त वाढीव निधी खर्च करणे अपेक्षित असल्याचे ते म्हणाले.आरोग्य व शिक्षणाला प्राधान्य देणारयावेळी जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांनी वाढीव निधीबाबत कारणे व योजनांबाबत माहिती सादर केली. नक्षलग्रस्त भागाच्या विकासासाठी शिक्षण व आरोग्याच्या योजनांसाठी यामध्ये प्राधान्याने तरतूद केलेली आहे. ग्राम विकासाकरिता प्राथमिकता देऊन तसेच वनांवर आधारित विकासाला चालना देण्यासाठी या निधीचा उपयोग केला जाईल. रस्ते विकास व विद्युत जोडणीची कामेही यामध्ये समाविष्ट करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. 

टॅग्स :Ajit Pawarअजित पवारEknath Shindeएकनाथ शिंदे