शहरं
Join us  
Trending Stories
1
गिलनं करून दाखवलं! जिथं पिढ्यानं-पिढ्या पराभव पाहिला तिथं टीम इंडियानं पहिला विजय मिळवला, अन्...
2
"महाराष्ट्र दिल्लीसमोर झुकवू पाहणाऱ्यांच्या पोटात दुखणारच"; विजयी मेळाव्यावरील टीकेला आदित्य ठाकरेंचे प्रत्युत्तर
3
ICAI CA Toppers 2025: महाराष्ट्राचा राजन काबरा सीए फायनलमध्ये अव्वल; २२ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात मिळवलं यश
4
बहीण करतीये कॅन्सरचा सामना; बॉलिंग करताना तिचा चेहरा डोळ्यासमोर दिसायचा! आकाश दीप म्हणाला...
5
अशोक सराफ कला क्षेत्राचे कोहिनूर, अभिनयाचे चालते बोलते विद्यापीठ; एकनाथ शिंदे यांचे गौरवोद्गार
6
"...तर दुसऱ्याच दिवशी घर रिकामे करेन"; सुप्रीम कोर्टाच्या 'त्या' पत्राला माजी सरन्यायाधीशांनी दिले उत्तर
7
महापालिका निवडणुकांमध्ये काँग्रेसची स्वबळाची तयारी? पवार-ठाकरेंना धक्का देणार राहुल गांधी?
8
मध्य प्रदेशात लाडकी बहीण योजनेचा हफ्ता वाढला; आता महिन्याला किती मिळणार पैसे?
9
जिंकलंस भावा! 'पंजा' मारला अन् आकाश दीप पळत पळत जाऊन थेट बुमराहला भेटला
10
भीमा कोरेगाव प्रकरणाचा अहवाल लवकरच सादर होणार; युक्तीवाद पूर्ण, ८५ जणांची झाली उलटतपासणी
11
900 कोटींच्या लढाऊ विमानाची 'धक्का परेड', इंग्लंडचं F-35 ओढत हँगरमध्ये नेतानाचा व्हिडिओ व्हायरल!
12
BJP-JDU च्या अडचणी वाढणार; चिराग पासवान यांनी केली विधानसभा लढवण्याची घोषणा
13
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
14
IND vs ENG : वॉशिंग्टनचा अतिसुंदर चेंडू! लंच आधी बेन स्टोक्स जाळ्यात फसला; DRS घेतला, पण...
15
लाल समुद्रात ब्रिटिश जहाजावर हल्ला, गोळीबार अन् रॉकेट डागले; हुथी बंडखोरांवर संशय
16
लढाई संपलेली नाही...; सरकारच्या डॉ. नरेंद्र जाधव समितीविरोधात आझाद मैदानात धरणे आंदोलन
17
समलैंगिक संबंधाचा भयानक अंत; मुंबईत कोल्ड्रिंक देऊन १६ वर्षाच्या मुलाची हत्या, आरोपीला अटक
18
पंढरपूर नगरीत भक्तीचा महापूर, वारकऱ्यांचा महासागर; दर्शनासाठी पाच किलोमीटरपर्यंत रांग...!
19
एवढा वेळ घेऊनही प्रवाशांच्या जीवाशी खेळ! पलावा पूल खुला, पण रस्त्याचा खुळखुळा; पाहा Video
20
आता १४ वर्षीय वैभव सूर्यंवशीला द्विशतक ठोकायचंय! वर्ल्ड रेकॉर्डनंतर मनात सेट केलंय हे टार्गेट

मुस्का येथील सामूहिक विवाह सोहळ्यात २३ जोडपी विवाहबद्ध

By admin | Updated: March 2, 2015 01:22 IST

पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या तंटामुक्त गाव समित्यांच्या वतीने मुस्का येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या मेळाव्यात सुमारे २३ जोडपे विवाहबद्ध झाले.

मालेवाडा : पोलीस मदत केंद्रांतर्गत येत असलेल्या तंटामुक्त गाव समित्यांच्या वतीने मुस्का येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन शुक्रवारी करण्यात आले. या मेळाव्यात सुमारे २३ जोडपे विवाहबद्ध झाले. सामूहिक विवाह सोहळ्याला प्रमुख अतिथी म्हणून उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर, प्रभारी अधिकारी दिलीप पवार, उपकमांडंट राजेंद्रसिंह, डॉ. नितीन परचाके, पोलीस उपनिरिक्षक अजित कपासे, सीआरपीएफ चार्ली कंपनी १९१ बटालियनचे पोलीस निरीक्षक लायक अली, सागर काथे, डॉ. आर. के. ठवरे, डी. एन. सोनपिपरे, धानोराचे कृषी अधिकारी ए. जी. मेश्राम, सरपंच तनुजा कुमरे, पोलीस पाटील देवांगना वासनिक, बळीराम मारगाये आदी मान्यवर उपस्थित होते. वाढत्या महागाईमुळे लग्नाचा खर्च वधू व वरपित्यांना उचलणे कठीण झाले आहे. अनेक पालकांना कर्ज काढूनच मुलीचे लग्न करावे लागते. यावर उपाय म्हणून मुस्का परिसरातील तंटामुक्त समित्यांच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत मुस्का येथे सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन केले. सदर आयोजन मुस्काचे तंमुस अध्यक्ष गजानन चंदनखेडे, कुलकुलीचे अध्यक्ष लक्ष्मण उईके, निमगावचे अध्यक्ष बाबुराव हलामी, पोलीस पाटील श्रीदास गेडाम, मुकरू उसेंडी, शिवराम हलामी, एकनाथ मेश्राम यांनी केले. या विवाह सोहळ्यात सुमारे २३ जोडपे विवाहबद्ध झाले. विवाह सोहळ्यानंतर वधुवरांना जीवनावश्यक वस्तू भेट देण्यात आल्या. आदिवासी विकास विभाग व समाज कल्याण विभाग यांच्या मार्फतीने नवदाम्पत्यांना प्रत्येकी १० हजार रूपयांचे अनुदान मिळवून दिले जाणार आहे. यासाठी पोलीस विभाग प्रयत्न करेल, असे आश्वासन उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन पांडकर यांनी दिले. (वार्ताहर)