शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
5
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
6
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
7
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
8
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
9
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
10
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
11
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
12
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
13
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
14
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
15
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
16
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
17
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

गडचिरोलीमध्ये २२७ घरे कोसळली, ८ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2024 13:00 IST

जिल्ह्यात अतिवृष्टीने दाणादाण : या हंगामात आतापर्यंत सहा जणांचा बळी; २२ जनावरे दगावली

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोलीः जूनमध्ये दडी मारणाऱ्या पावसाने जुलैमध्ये कसर भरुन काढली. चार दिवसांत अतिवृष्टीमुळे १९ ते २१ जुलै या दरम्यान जिल्ह्यात सुमारे ८ हजार हेक्टरवरील पिके मातीमोल झाली तर तब्बल २२७ घरे कोसळली. दरम्यान, दोघांचा बळी गेला. या हंगामात आतापर्यंत नैसर्गिक आपत्तीमुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या पाच झाली आहे.

जिल्ह्यात १८ जुलैपासून पावसाला सुरुवात झाली. पावसाचा जोर तीन दिवस कायम होता. १८ ते २१ जुलै दरम्यान झालेल्या नुकसानीची माहिती समोर आली आहे. यात १७ मोठी जनावरे, ५ लहान जनावरे मृत्युमुखी पडली. २२७ घरांचे नुकसान झाले असून यापैकी ७ घरे पूर्णतः क्षतिग्रस्त झाली आहेत. सोबतच ३२ गोठ्यांचेही नुकसान झाले आहे. जिल्ह्यातील बाराही तालुक्यांत अतिवृष्टीचा तडाखा बसला असून सुमारे ८ हजार २७७ हेक्टवरील ९ हजार ७८० शेतकऱ्यांचे नुकसान झाले. धान, कापूस, सोयाबीन, तूर व भाजीपाला तसेच काही ठिकाणी फळपिकांनाही जबर फटका बसला.

यांचा झाला मृत्यू...जून २०२४ पासून आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाला. जूनमध्ये वीज कोसळून चंदू गिरमा पोरटेत (रा. एटापल्ली) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला. ८ जुलै रोजी अक्षय उर्फ अंकुश पांडू कुळयेटी व ९ जुलै रोजी अमिल डोलू डोलू टिमा यांचा नाल्यात वाहून गेल्याने मृत्यू झाला. १७ जुलै रोजी विठ्ठल हणमंत गेडाम (रा. कुलकुली) हे नाल्यात वाहून गेले, नंतर त्यांचा मृतदेह आढळला. २१ जुलै रोजी वंश विजय भुते (रा. कोंढाळा ता. देसाईगंज) या ८ वर्षीय मुलाचा गावतलावात बुडून मृत्यू झाला. त्याच दिवशी मध्यरात्री आलापल्ली- मुलचेरा मार्गावरील जंगलात कोसळलेल्या झाडावर दुचाकी आदळल्याने माडीथाटी नवीनकुमार रेड्डी (रा. राजुरा कॉलनी, रायचोटी, कडपा, आंध्रप्रदेश, ह.मु. आलापल्ली) हा ठार झाला.

सरासरीपेक्षा २६८ मि.मी. अधिक पाऊसजून महिन्यात पावसाची सर्वांना प्रतीक्षा होती. मात्र, वार्षिक सरासरीच्या तुलनेत कमी पाऊस झाला होता. जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे ही तूट तर भरुन निघालीच, पण सरासरीपेक्षा २६८ मि.मी. अधिक पावसाची नोंद झाली. २१ जुलैपर्यंत वार्षिक सरासरी ३१८.५ मि.मी. इतकी आहे. प्रत्यक्षात ५८५.५ मि.मी. इतका पाऊस झाला. 

टॅग्स :floodपूरAgriculture Sectorशेती क्षेत्रfarmingशेतीGadchiroliगडचिरोली