शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: जे लोकसभेला कमावले, ते विधानसभेला का गमावलं?; उद्धव ठाकरेंची चूक कबुल केली, म्हणाले...
2
Video: मुंबई गुजरातचाच भाग होता, मराठी लोक केवळ ३२ टक्केच; भाजपा खासदार निशिकांत दुबे पुन्हा बरळले
3
'मला वाटतं ५ विमानं पाडण्यात आली...', भारत-पाकिस्तान तणावावर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा दावा
4
जीवघेणा कॅन्सर कायमचा संपणार! शास्त्रज्ञांनी क्रांतीकारी mRNA लस केली विकसित
5
China Rare Earth Quotas: चीननं शांततेत केलं हे काम, भारताचं टेन्शन वाढणार; कसे धोक्यात येतील हे व्यवसाय?
6
'समुद्रात बुडवून बुडवून मारू', राज ठाकरेंच्या टीकेला, खासदार दुबेंनी दिले प्रत्युत्तर; पुन्हा हिंदी भाषेवर म्हणाले,...
7
"मराठी माणूस हिंदी सिनेमात हिरो होऊच शकत नाही, कारण...", अशोक सराफ स्पष्टच बोलले
8
सावध ! विंचू पिंडीवर बसलाय ! पडळकर हा विषय अत्यंत गंभीर अन् आव्हाडांची गँग...
9
आजचे राशीभविष्य, १९ जुलै २०२५: यश प्राप्तीसाठी कठोर परिश्रम करावे लागतील
10
गौरी योगात कामिका एकादशी: ८ राशींवर धनलक्ष्मी कृपा, पदोन्नती-पगारवाढ; सुबत्ता-कल्याण काळ!
11
मुख्यमंत्री संतापले : लाेक म्हणतात आमदार माजले, आपण लाथाबुक्क्यांतून संदेश देणार आहोत का?
12
मराठा आरक्षण : अंतिम सुनावणीस सुरुवात, अंतरिम स्थगिती देण्याची याचिकाकर्त्यांची मागणी
13
आयपीएस सुपेकरांवर कारवाई का नाही? वैशाली हगवणे आत्महत्या, पोलिसांवर कडक ताशेरे
14
मंत्र्यांच्या आईच्या नावावर डान्सबार; अनिल परब यांचा आरोप
15
कर्जमाफीचे आश्वासन पूर्ण करूच, शेतकऱ्यांसाठी कधी हात आखडता घेतला नाही : मुख्यमंत्री
16
मी तसे बोलायला नको होते; सभागृहात आणि बाहेर केलेल्या विधानांवरून आमदारांचा माफीनामा
17
‘विधिमंडळ प्रवेश पास ५ ते १० हजारांत विकले जातात’; आमदारांच्या आरोपाने खळबळ
18
दुबे यांनी मुंबईत येऊन दाखवावे, समुद्रात बुडवून बुडवून मारू; राज ठाकरेंचे भाजप खासदाराला प्रत्यूत्तर 
19
गांजा घरातच ‘पिकविण्या’चा नवा उद्योग; चार वर्षांपूर्वी पोलिसांना कल्पनाही नव्हती...
20
शेतकऱ्यांसाठी अलर्ट : टॅरिफमुळे अमेरिकेची कृषी उत्पादने भारतात आल्यास गंभीर परिणाम 

२० हजार बॅग तेंदूपत्ता संकलन

By admin | Updated: May 23, 2015 01:54 IST

पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांमधून १६ हजार २७८ व पेसा क्षेत्राबाहेरच्या युनिटमधून ३ हजार ७३९ असे एकूण सुमारे २० हजार १७ बॅग तेंदूपत्ता संकलन १७ मे पर्यंत करण्यात आले आहे.

गडचिरोली : पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांमधून १६ हजार २७८ व पेसा क्षेत्राबाहेरच्या युनिटमधून ३ हजार ७३९ असे एकूण सुमारे २० हजार १७ बॅग तेंदूपत्ता संकलन १७ मे पर्यंत करण्यात आले आहे. राज्यपालांच्या अधिसूचनेनुसार पेसा अंतर्गत येत असलेल्या गावांना तेंदूपत्ता संकलनाचे अधिकार देण्यात आले आहे. मात्र तेंदूपत्ता संकलन व त्याची विक्रीही अत्यंत किचकट बाब असून त्यासाठी लाखो रूपयांच्या भांडवलाची गरज असल्याने काही गावांनी वन विभागाचे सहकार्य घेतले आहे. या गावातील १३८ युनिटपैकी १२८ युनिटचा लिलाव झाला. १० युनिटची विक्रीच झाली नाही. या युनिटमधून २०१५ च्या हंगामात २ लाख ११ हजार ९४० बॅग तेंदूपत्ता संकलन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मागील १५ दिवसांपासून संकलनास सुरूवात झाली आहे. या युनिटमध्ये १७ मे पर्यंत १६ हजार २७८ बॅग तेंदूपत्ता संकलन करण्यात आला आहे. वन विभागाने ठरविलेल्या उद्दिष्टाच्या हे प्रमाण ७.६८ टक्के एवढे आहे. पेसा क्षेत्राबाहेर असलेल्या युनिटमध्ये पूर्वी प्रमाणेच वन विभाग स्वत: तेंदूपत्ता संकलन करीत आहे. पेसा क्षेत्राबाहेरचे एकूण ४३ युनिट विक्रीसाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी केवळ १० युनिटची विक्री झाली. या युनिटमधून १६ हजार ३९० बॅग तेंदूपत्ता संकलनाचे उद्दिष्ट वन विभागाने ठेवले होते. त्यापैकी ३ हजार ७३९ बॅग तेंदूपत्ता संकलन झाले आहे. हे प्रमाण उद्दिष्टाच्या २२.८१ टक्के एवढे आहे. मागील आठवड्यापासून तेंदूपत्ता संकलनाला जोर आला असल्याने या आठवड्यात सर्वाधिक तेंदूपत्ता संकलन होण्याची शक्यता वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केली असून या आठवड्यात जवळपास ६० ते ७० टक्के उद्दिष्ट गाठता येणार आहे. (नगर प्रतिनिधी)प्रती शेकडा २३७ रूपये ५० पैसे दरशासनाने तेंदूपत्ता संकलनाचे दर मागील वर्षीच्या तुलनेत १२ रूपये ५० पैसे एवढे वाढविले आहे. मागील वर्षी प्रती शेकडा २२५ रूपये भाव दिला जात होता. यावर्षी वाढ करून २३७ रूपये ५० पैसे एवढा भाव दिला जाणार आहे. हा शासकीय दर असला तरी जास्तीत जास्त प्रमाणात तेंदूपत्ता संकलन व्हावे यासाठी तेंदूपत्ता कंत्राटदार यापेक्षा जास्त दर देत आहेत.