शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अवैध दारू पकडली, एकास अटक; २ लाखांचा साठा जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2021 11:25 IST

अहेरी येथील मौजा मोदुमाडगू या गावातील एकाजणाकडे अवैधरित्या देशी-विदेशी दारूची साठवणूक करून ठेवल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्या माहितीच्या आधारे छाप टाकत पोलिसांनी एका घरातून २ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करत एकास ताब्यात घेतले.

ठळक मुद्देअहेरी पोलिसांची कारवाई

गडचिरोली : अहेरी येथील मौजा मोदुमाडगू या गावात देशी-विदेशी ब्रँडचा दारूसाठा बिनापास विक्रीकरीता बाळगल्याप्रकरणी अहेरी पोलिसांनी छापा टाकून एका आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून ८ खोक्यातील २ लाखांचा अवैध दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. मनोज राजन्ना आत्राम (वय ३० वर्षे धंदा शेती रा. मोदुमाडगू ता. अहेरी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

दिनांक ०६ ऑक्टोबरला शंकर डांगे व सोबत पोहवा जगन्नाथ मडावी असे मिळून पोलीस ठाणे अहेरी येथे  गिणतीकरीता येत होते. दरम्यान, मौजा मोदुमाडगू येथील नामे मनोज राजन्ना आत्राम याच्या घरी देशी, विदेशी दारु विक्रीकरीता आणून ठेवली असल्याची गोपणीय सुत्राकडून खात्रीशीर माहिती मिळाली. सदर माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीस पकडण्याची योजना आखली. 

पोउपनि. सुधीर पाडुळे, पोहवा देवराव पेंदाम, नापोशि विनोद रणदिवे, चानापोशि दीपक कत्रोजवार असे सरकारी वाहनाने वीर बाबुराव सेडमाके चौक येथे आले. त्यानंतर, मौजा मोदुमाडगू गावात राहणाऱ्या मनोज आत्राम याच्या घराजवळ जाऊन विचारपूस केल्यानंतर त्याच्या घराची झडती घेतली. यावेळी, आत्राम याच्या नविन घरातील दुस-या खोलीमध्ये खरडयाच्या ८ बॉक्समध्ये विविध कंपन्यांचा एकूण १,९७,६०० रुपयाचा माल अवैधरित्या बिनापास परवाना विक्री करिता बाळगतांना आढळून आला. सदर मालाबाबत आत्राम, यास विचारले असता, माल रात्री किसन रामटेके रा. चंद्रपूर ह.मु. आलापल्ली ता. अहेरीज, गडचिरोली याने आमचे घरी आणून ठेवल्याचे आत्राम याने सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी  जप्त केलेला मुद्देमाल व आरोपीस ताब्यात घेतले.

हा अवैध दारूसाठा पोउपनि सुधीर पाहूळे  यांच्या मार्गदर्शनाखाली सविस्तर घटनास्थळ जप्ती पंचनामा तयार करुन १) हायवर्ड ५००० कंपणीची६५० मि.ली. क्षमतेची एक बॉटल, २) किंगफिशर कंपणीची६५० मि.ली. क्षमतेची एक बॉटल, ३) रॉयल स्टॅग कंपणीची ७५० मि.ली. दरमतेची एक बॉटल, ४) ईम्पेरिअल ब्लू कंपणीची ७५० मि.ली. क्षमतेची एक बॉटल, ५) रॉकेट संत्रा कंपणीची देशी दारूची९० मि.ली. क्षमतेची एक निप असे वेगळे काढून साठा सीलबंद करत सि.ए. परिक्षणा करिता पाठवण्यात आला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी