लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : तालुक्यातील भगवानपूर-मोहडोंगरी जंगलपरिसरात दारूविक्रेत्यांनी मोहसडवा टाकला असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार गडचिरोली पोलीस व मुक्तिपथ चमुनी शोधमोहीम राबवून ९० हजार रुपये किमतीचा १७ क्विंटल मोहसडवा व साहित्य नष्ट केले. या कारवाईमुळे दारूविक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.मोहडोंगरी येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केल्या जाते. सभोवतालच्या गावांतील मद्यपी मोहडोंगरी येथे जाऊन दारू पितात. त्यामुळे महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर बामणी येथील गाव संघटनेने पुढाकार घेत दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्याचे ठरविले.भगवानपूर-मोहडोंगरी जंगल परिसरात अनेक दारूविक्रेत्यंनी मोहसडवा टाकला असल्याची माहिती गावसंघटनेद्वारा मुक्तिपथ तालुका चमू व पोलीस ठाण्याला देण्यात आली. त्यानुसार गडचिरोली पोलिसांनी जंगलपरिसरात शोधमोहीम राबविली. दरम्यान काही ठिकाणी मोहसडवा टाकला असल्याचे दिसून आले. पोलिसांनी एकूण ९० हजार रुपये किमतीचा जवळपास १७ क्विंटल मोहसडवा व साहित्य नष्ट केला आहे. पोलिसांच्या या कृतीमुळे परिसरातील दारूविक्रेत्यांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.सदर कारवाई पोलीस निरीक्षक प्रदीप चौगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय पूनम गोरे, पीएसआय स्नेहल चव्हाण, बिट जमादार भाष्कर ठाकरे, प्रमोद वाळके, मुक्तिपथ तालुका चमू यांनी केली.कोरोना लॉकडाऊनच्या काळात पोलीस प्रशासन व मुक्तिपथ अभियानाच्या पुढाकारातून अहेरी उपविभागाच्या पाचही तालुक्यात तंबाखू व दारूविरोधी कारवाया वाढल्या आहेत. तरी सुद्धा काही विक्रेत्यांनी व्यवसाय सुरू ठेवला आहे.
१७ क्विंटल मोहसडवा व साहित्य नष्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2020 5:00 AM
मोहडोंगरी येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारूविक्री केल्या जाते. सभोवतालच्या गावांतील मद्यपी मोहडोंगरी येथे जाऊन दारू पितात. त्यामुळे महिलांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अखेर बामणी येथील गाव संघटनेने पुढाकार घेत दारूविक्रेत्यांना धडा शिकविण्याचे ठरविले.
ठळक मुद्देभगवानपूर, मोहडोंगरी जंगलात धाड : गडचिरोली पोलिसांची कारवाई; बामणी गाव संघटनेचा पुढाकार