शहरं
Join us  
Trending Stories
1
“उद्या दुपारी १२ वाजता या, अंतरवाली सराटीतील शेवटची बैठक”; जरांगेंचे मराठा समाजाला आवाहन
2
"पृथ्वीवर कोणत्याही सीमा दिसत नाहीत, आपण सर्व एक आहोत"; पंतप्रधान मोदींनी साधला शुभांशू शुक्लांशी संवाद
3
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाची तयारी सुरू; वॉर्डनिहाय आढावा घेणार, संचलन समितीची घोषणा
4
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
5
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
6
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
7
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
8
काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसण्याची चिन्हे
9
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
10
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
11
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
12
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार
13
महायुती सरकारमध्ये मतभेद! पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाने मांडली पक्षाची भूमिका
14
Gold price outlook: जागतिक तणाव झाला कमी, सोन्याच्या दरात होणार मोठी घसरण? एक्सपर्ट म्हणाले...
15
Shefali Jariwala Funeral: शेफालीच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार, पती पराग त्यागीची रडून वाईट अवस्था, भावुक करणारा व्हिडिओ
16
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
17
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
18
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
19
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
20
"मटण खाणारे पण वारीला आले" म्हणणाऱ्यांना DPने सुनावलं, म्हणाला- "हो मी मटण खातो पण..."

गोंडवानाला हवेत १६३ प्राचार्य

By admin | Updated: February 25, 2016 01:10 IST

चंद्रपूर-गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी २०११ पासून गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्यात आले.

कॉलेजचा कारभार ढेपाळला : ग्रंथपाल, अधिव्याख्याता, प्राध्यापकांची २ हजार ३२० पदे रिक्तदिलीप दहेलकर गडचिरोलीचंद्रपूर-गडचिरोली या शैक्षणिकदृष्ट्या मागास जिल्ह्याच्या विकासासाठी २०११ पासून गोंडवाना विद्यापीठ सुरू करण्यात आले. या विद्यापीठाअंतर्गत दोन्ही जिल्ह्यातील मिळून २३७ महाविद्यालये संलग्न आहेत. या महाविद्यालयांमध्ये प्राचार्यांची १६३ पदे रिक्त आहेत. त्यामुळे विद्यापीठाचा संपूर्ण शैक्षणिक डोलारा कोसळलेल्या स्थितीत आहे. राज्य शासनाच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे गोंडवाना विद्यापीठाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष झाले आहे. गडचिरोलीस्थित असलेल्या गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत चंद्रपूर, गडचिरोली जिल्ह्यात २३७ महाविद्यालये आहेत. यातील १७० महाविद्यालय हे कायम विनाअनुदान तत्त्वावरचे आहे. तर ६७ महाविद्यालय अनुदानीत आहे. दुर्गम व अतिदुर्गम भागात शैक्षणिक विस्तार करताना विनाअनुदानीत महाविद्यालयांकडे आर्थिक संसाधनांचा अभाव आहे. प्राचार्य पदासाठी येणारी व्यक्ती किमान ८० हजार ते एक लाख रूपये वेतनाची अपेक्षा ठेवून असते. त्यामुळे विनाअनुदानीत महाविद्यालयांना त्यांच्या वेतनाचा एवढा भार उचलने अत्यंत कठीण बाब ठरते. त्यामुळे अशा महाविद्यालयांनी आजवर नियमित प्राचार्यांची नियुक्ती केलेली नाही. तसेच राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण विभागाने २००९ मध्ये एक निर्णय जाहीर केला. त्यानुसार प्राचार्य पदावर येणाऱ्या व्यक्तीचा कार्यकाळ हा किमान पाच वर्षांचा ठेवण्यात आला आहे. त्यानंतर सदर व्यक्ती आपल्या मूळ आस्थापनेच्या ठिकाणी (महाविद्यालयात) परत जाईल. शासनाच्या या अटीमुळे अनेक प्राध्यापक प्राचार्य पदासाठी पात्र असूनही ते या पदावर येण्यास तयार होत नाही. प्राध्यापक व प्राचार्यांना सारखीच वेतनश्रेणी असल्याने प्राचार्य मिळण्यासही अडचण निर्माण होते. त्यामुळे नव्याने निर्माण झालेल्या गोंडवाना विद्यापीठातील महाविद्यालयासमोर नवे प्राचार्य मिळविण्याची प्रचंड अडचण आहे. याबाबत वेळोवेळी महाविद्यालयाच्या संस्थाचालकांनी राज्याच्या उच्च व तंत्रशिक्षण मंत्र्यांकडे यावर काही तरी तोडगा काढा, आम्हाला अनुदान द्या, आम्ही प्राचार्य नियुक्त करतो, अशी भूमिका मांडली. परंतु सरकारचे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत कारभाराकडे प्रचंड दुर्लक्ष झाले आहे. याचा परिणाम गोंडवाना विद्यापीठाच्या वाटचालीवर होत आहे. त्यातच २७ नोव्हेंबर २०१५ रोजी गोंडवाना विद्यापीठाच्या विद्वत परिषदेने ज्या महाविद्यालयांनी नियमित प्राचार्य नियुक्त केले नाही, तेथील विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठी नामांकन यापुढे करण्यात येऊ नये, असा ठराव पारित केला आहे. त्यामुळे आणखी नव्या अडचणी आता निर्माण होणार आहेत. तसेच या विद्यापीठाअंतर्गत ग्रंथपालाची २३७ पदे मंजूर आहेत. विद्यमान स्थितीत केवळ ५६ पदेच भरलेली असून १८१ पदे रिक्त आहेत. यामध्ये अनुदानीत महाविद्यालयांमधील ६७ पदांपैकी ५१ पदे भरलेली आहे. १६ पदे रिक्त आहेत. तर कायम विनाअनुदानीत महाविद्यालयातील १७० पदापैकी केवळ ५ पदे भरलेली असून १६५ पदे रिक्त आहेत. ग्रंथपालांची १८१ पदे गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत रिक्त आहेत. तसेच शारीरिक शिक्षक संचालकांची २०० पदे मंजूर असून त्यापैकी केवळ ५४ पदे भरलेली आहे तर अद्यापही तब्बल १४६ पदे रिक्त आहेत.