शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत ठार करण्यात आलेल्या 16 पैकी 11 नक्षलवाद्यांवर होतं 76 लाखांचं बक्षीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2018 21:03 IST

11 बंदुका जप्त; 5 जणांची ओळख पटवण्याचे प्रयत्न सुरू

गडचिरोली:  नक्षलविरोधी अभियानादरम्यान रविवारी गडचिरोली पोलिसांच्या बंदुकीने वेध घेतलेल्या 16 मृत नक्षलींपैकी 11 जणांची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आलं आहे. त्यात नक्षल दलमच्या 3 वरिष्ठ नेत्यांसह 3 महिलांचाही समावेश आहे. त्या 11 जणांवर एकूण 76 लाखांचे बक्षीस ठेवण्यात आलं होतं.ओळख पटलेल्या नक्षलवाद्यांमध्ये साईनाथ ऊर्फ दुलेश मादी आत्राम (३२ वर्षे, पेरमिली दलम कमांडर) (बक्षीस १६,००,००० रुपये), श्रीनु उर्फ श्रीकांत उर्फ रावतू विजेंद्र (५०  वर्षे, दक्षिण विभाग कमांडर) (बक्षीस २०,००,००० रुपये), राजेश ऊर्फ दामा रायसु नरुटी (स्टाफ टिप पीपीसीएम) (४,००,००० रुपये), सुमन ऊर्फ जन्नी कुळयेटी (१८  वर्षे, प्लाटून क्रमांक ०७ सदस्य) (४,००,००० रुपये), शांता ऊर्फ मंगली पदा (३१  वर्षे, अहेरी दलम कमांडर) (८,००,००० रुपये), नागेश ऊर्फ  दुलसा कन्ना नरोट (३२  वर्षे, पेरमिली दलम एसीएम) (६,००,००० रुपये), तिरुपती ऊर्फ धर्मु पुंगाटी (२४ वर्षे, पेरमिली दलम सदस्य) (२,००,००० रुपये), श्रीकांत ऊर्फ दुलसा ऊर्फ रानु नरोटे (२३ वर्षे, पेरमिली दलम सदस्य) (२,००,००० रुपये), राजू ऊर्फ रमेश ऊर्फ नरेशकुटके वेलादी (२९ वर्षे, गट्टा एलओएस कमांडर) (८,००,००० रुपये), सन्नू ऊर्फ  बिच्छु बोळका गावडे (४४ वर्षे, प्लाटून क्रमांक ०७ सदस्य) (४,००,००० रुपये), अनिता ऊर्फ बाली रामजी मडावी (२४ वर्षे, पेरमिली दलम सदस्य) (२,००,००० रुपये) आदींचा समावेश आहे. उर्वरित 5 नक्षलवाद्यांची ओळख पटवण्याचा प्रयत्न सुरू आहे. ओळख न पटलेल्यांमधे 4 महिला व एका पुरूष नक्षलवाद्याचा समावेश आहे.रविवारी संध्याकाळपर्यंत चाललेल्या शोधमोहिमेत पोलिसांना मृत नक्षलींकडे 11 बंदुका सापडल्या. त्यात दोन एके 47, दोन एसएलआर आणि 7 इतर बंदुका आहेत. पोलीस अधिकाऱ्यांनी अहेरीत जाऊन ही मोहीम यशस्वी करणाऱ्या चमूचे अभिनंदन केले.

टॅग्स :naxaliteनक्षलवादीGadchiroliगडचिरोली