शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वाहनासह ३.४० लाखांचा मुद्देमाल जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2019 22:28 IST

गोंदिया जिल्ह्यातून कोरेगाव मार्गे देसाईगंजकडे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला अडवून देसाईगंज पोलिसांनी ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल सोमवारी सायंकाळच्या सुमारास जप्त केला.

ठळक मुद्देगोंदिया जिल्ह्यातून दारूची वाहतूक : शंकरपूर-चोप मार्गावर पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : गोंदिया जिल्ह्यातून कोरेगाव मार्गे देसाईगंजकडे दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनाला अडवून देसाईगंज पोलिसांनी ३ लाख ४० हजारांचा मुद्देमाल सोमवारी सायंकाळच्या सुमारास जप्त केला.गोंदिया जिल्ह्यातून कोरेगाव मार्गे देसाईगंजकडे पांढऱ्या रंगाच्या एमएच ३४ एए ०७२९ क्रमांकाच्या कारने दारूची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती देसाईगंज पोलिसांना मिळाली. या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरिक्षक हर्षल नगरकर, सहायक फौजदार अशोक कऱ्हाडे, पोलीस हवालदार वासुदेव अलोणे, चालक पोलीस शिपाई शंकर बडे यांनी शंकरपूर-चोप मार्गावर सापळा रचला. दरम्यान पांढºया रंगाची एमएच ३४ एए ०७२९ क्रमांकाचे वाहन देसाईगंजकडे येताना दिसले. या वाहनास थांबविण्याचा इशारा पोलिसांनी केला. वाहन चालकाने हे वाहन थांबविले. त्यानंतर पोलिसांनी वाहनाची झळती घेतली. या वाहनातून देशी दारूच्या ९० मिली मापाच्या १ हजार ५०० बॉटला जप्त केल्या. या दारूची किंमत ९० हजार रुपये आहे. वाहनाची किंमत २ लाख ५० हजार रुपये आहे. दारू व वाहन मिळून ३ लाख ४० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईमुळे देसाईगंज तालुक्यासह जिल्ह्यातील बड्या दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहे.दोघांवर गुन्हा दाखलसदर दारू जप्त प्रकरणी शुभम दिवाकर सातपुते (२०) रा. गोकुलनगर, प्रविण विलास अडपल्लीवार (३३) रा. चामोर्शी यांच्या विरोधात देसाईगंज पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षकांच्या मार्गदर्शनात झाली.

टॅग्स :liquor banदारूबंदीPoliceपोलिस