शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

१४ ग्रामपंचायतींचा होणार सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 01:08 IST

जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने ग्रामपातळीवर वनराई बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० बंधाऱ्यांचे काम उत्कृष्टरित्या करून जलसंधारणाचे काम करतील, अशा जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार देऊन प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देजिल्हा व तालुकास्तरीय पुरस्कार मिळणार : श्रमदान व लोकसहभागातून बंधारा बांधकाम चळवळ

दिलीप दहेलकर ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्हा व जिल्हा परिषद प्रशासनाच्या पुढाकाराने ग्रामपातळीवर वनराई बंधारा बांधण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे. ज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० बंधाऱ्यांचे काम उत्कृष्टरित्या करून जलसंधारणाचे काम करतील, अशा जिल्ह्यातील १४ ग्रामपंचायतींना रोख पुरस्कार देऊन प्रशासनाच्या वतीने सन्मानित करण्यात येणार आहे.प्रशासन व नरेगा विभागाच्या पुढाकाराने जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात २५ सप्टेंबर ते ७ आॅक्टोबर या कालावधीत वनराई बंधारा निर्मितीची चळवळ उभारण्यात आली. जिल्हाधिकारी शेखर सिंह, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड, जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांच्यासह जि.प.च्या इतर पदाधिकाºयांच्या संकल्पनेतून यंदा प्रथमच जिल्ह्यात वनराई बंधारा निर्मितीची चळवळ उभारण्यात आली. जमिनीतील पाणी जमिनीत मुरावे, पाणीपातळी वाढावी, सिंचन क्षेत्र वाढावे तसेच टंचाईमुक्त गडचिरोली जिल्हा व्हावा, या उदात्त हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला. सिमेंटची रिकामी बॅग, माती, वाळू व दगड यांच्या सहाय्याने जिल्हाभरात मागील आठवड्यापर्यंत जवळपास दोन हजार वनराई बंधारे बांधण्यात आले. जिल्हाभरात तब्बल २ हजार ७९३ बंधारे बांधकामाचे उद्दिष्ट प्रशासनाने दिले आहे. त्यानुसार आरमोरी तालुक्यात सर्वाधिक ४००, त्याखालोखाल धानोरा तालुक्यात ३१०, देसाईगंज ३०० वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. याशिवाय इतरही तालुक्यांना १००, १५० ते २०० बंधारे बांधकामाचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. वनराई बंधाऱ्याचे बांधकाम श्रमदान करून लोकसहभागातून केले जात आहे. याचा आढावाही तालुका व जिल्हा प्रशासनाकडून सातत्याने घेतला जात आहे.प्रशासनाने दिलेल्या माहिती नुसार आतापर्यंत चामोर्शी तालुक्यात सर्वाधिक २८०, कोरची तालुक्यात २०६, धानोरा तालुक्यात २०२, सिरोंचा तालुक्यात २०१, आरमोरी तालुक्यात १९२ बंधाऱ्याचे काम झाले आहे. याशिवाय देसाईगंज तालुक्यात १८५, गडचिरोली १८५, एटापल्ली ९५, मुलचेरा ९०, कुरखेडा ७०, अहेरी तालुक्यात ५२ बंधाऱ्याचे काम झाले आहे. सिरोंचा व भामरागड तालुका या कामात माघारला आहे.असे मिळणार रोख पुरस्कारज्या ग्रामपंचायती कमीत कमी १० वनराई बंधारे तयार करणार, अशा ग्रामपंचायती तालुकास्तरीय पुरस्कार स्पर्धेसाठी पात्र ठरणार आहेत. यापैकी प्रत्येक तालुक्यातून एका ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे. प्रती ग्रामपंचायतीला २० हजार रूपयांचा तालुकास्तरीय पुरस्कार प्रदान करून सन्मानित करण्यात येणार आहे.तालुकास्तरावरील स्पर्धेसाठी पात्र झालेल्या ग्रामपंचायतीमधून जिल्हास्तरावर दोन ग्रामपंचायतीची निवड करण्यात येणार आहे. एका ग्रा.पं.ला प्रथम व दुसऱ्या ग्रा.पं.ला द्वितीय पुरस्कार दिला जाणार आहे. प्रथम पुरस्कार रोख ६० हजार रूपये व द्वितीय पुरस्कार ४० हजार रूपयांचा असणार आहे.तालुकास्तरावरून तपासणीस प्रारंभकोणत्या ग्रामपंचायतीने किती व कशाप्रकारचे वनराई बंधारे बांधले याबाबतची प्रत्यक्ष तपासणी तालुकास्तरीय देखरेख, अंमलबजावणी व तपासणी समितीमार्फत २० आॅक्टोबरपासून सुरू झाली आहे. या समितीमध्ये संबंधित तालुक्याचे गटविकास अधिकारी, पंचायत विस्तार अधिकारी, शाखा/कनिष्ठ अभियंता आदींचा समावेश आहे.तालुकास्तरावरील तपासणी व मूल्यमापनाचे काम पूर्ण झाल्यावर जिल्हास्तरीय समितीकडून बंधारा कामाची तपासणी करण्यात येणार आहे. या जिल्हास्तरीय समितीमध्ये जि.प.चे उपमुख्य कार्यकारी (ग्रा.पं.), उपमुख्य कार्यकारी (नरेगा), कृषी विकास अधिकारी (जि.प) व पंचायत विस्तार अधिकारी (जिल्हा परिषद) आदींचा समावेश आहे.

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायत