शहरं
Join us  
Trending Stories
1
निकालाच्या भविष्यवाणीवर प्रशांत किशोर-योगेंद्र यादवांमध्ये चढाओढ; भाजपाला किती जागा?
2
बड्यांच्या मुलांनी ‘रेस’मध्ये माझं अख्खं कुटुंबच चिरडलं, तरुणाचा आक्रोश; १५ दिवस झाले, कोणालाच अटक नाही
3
"त्याला बोट धरुन शिवसेनेत आणलं नाही, मुलासोबत टर्निंग पॉईंटला नव्हतो याची खंत"; गजानन किर्तीकर थेटच बोलले
4
'लेडी लक'ची चमक! पत्नी एलिसा स्टेडियममध्ये आली अन् मिचेल स्टार्कने मैदानावर कमाल केली...
5
"एवढा आत्मविश्वास कुठून येतो"; उद्धव ठाकरेंच्या आरोपांवरुन राष्ट्रवादीची बोचरी टीका
6
Astro Tips: कासवाकृती अंगठीचा वापर लाभदायी, पण कोणत्या बोटात घालायची ते जाणून घ्या!
7
SEBI चा नवा नियम, आता ६ महिन्यांच्या सरासरीवरून ठरणार लिस्टेड कंपन्यांचं Market Cap
8
Mrunal Dusanis : "नीरजसारखा मुलगा आल्यावर मला वाटलं की..."; मृणाल दुसानिसने सांगितला 'तो' किस्सा
9
“आदित्य ठाकरेंना CM करण्यासाठी रश्मी ठाकरेंचा आग्रह होता, पण शरद पवारांनी नकार दिला”
10
‘त्या’ने जिथे दारू प्यायली, त्या चोरडियांच्या ब्लॅक हॉटेलला टाळे; पंचशील इन्फ्रास्ट्रक्चरचे चोरडिया यांच्या नावाने आहे परवाना
11
Gold Price Today: सोन्याच्या तेजीला ब्रेक, चांदीही घसरली; पाहा २२ मे रोजी किती घसरला भाव
12
MS Dhoni ची मोठी घोषणा! चाहतेही पडले संभ्रमात; लवकरच दिसणार नव्या भूमिकेत
13
"हा नवा भारत घरात घुसून मारतो, पण आम्ही..."; मोदींच्या भाषणाचा उल्लेख करत पाकिस्तानी राजदूताची धमकी
14
KKR vs SRH : ...अन् शाहरूख खानला मागावी लागली माफी; नेमकं काय घडलं, पाहा Video
15
ज्या आजोबांनी बाळाची हमी दिली, त्यांचे छोटा राजनशी कनेक्शन; भावाशी संपत्तीवरून वाद, मित्रावर गोळीबार
16
'बिल्डर लॉबी भाजपसाठी काम करते, पुण्यात येऊन फडणवीसांचा दिखावा'; रवींद्र धंगेकरांचा आरोप
17
ऐन निवडणुकीत प्रमुख नेत्यांना मारण्याचा कट; अटक केलेल्या युवकाचे पाकिस्तानशी कनेक्शन
18
“मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा फटका बसला, राज्यात महायुतीला...”: महादेव जानकर
19
'मातोश्रीवर लोटांगण घालण्याची घाई'; गजानन कीर्तिकरांच्या हकालपट्टीसाठी शिवसेना नेत्याचे मुख्यमंत्र्यांना पत्र
20
Swati Maliwal : "काल पक्षाच्या एका मोठ्या नेत्याचा फोन आला अन्..."; स्वाती मालीवाल यांचा गंभीर आरोप

गडचिरोलीत आणल्या जाणाऱ्या 14 पेट्या दारू जप्त

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 4:31 PM

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरात आणल्या जाणाऱ्या सुमारे १४ पेट्या दारू व चारचाकी वाहन जप्त करण्यात आल्या आहेत.

गडचिरोली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गडचिरोली शहरात आणल्या जाणाऱ्या सुमारे १४ पेट्या दारू व चारचाकी वाहन जप्त करण्यात आल्या आहेत. सदर कारवाई शनिवारी मूल मार्गावरील पारडी येथील तपासणी नाक्यावर करण्यात आली. संदीप नारायण कोवे, नागेश रविंद्रनाथ बुरेवार (दोघेही रा. नागपूर) यांना अटक करण्यात आली आहे.तर वाहन मालक प्रकाश मेलाराम गोधणी व नागपूर येथील सम्राट वाईन शॉपचा मालक या दोघांविरोधात गडचिरोली पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. चंद्रपूर जिल्ह्यातून दारू व इतर अवैध वस्तूंची निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वाहतूक होण्याची शक्यता लक्षात घेऊन वैनगंगा नदीजवळ तपासणी नाका तयार करण्यात आला आहे.या नाक्यावर मूल मार्गे येणा-या प्रत्येक वाहनाची तपासणी केली जाते. दरम्यान (एमएच -३१-डी-५१११) या चारचाकी वाहनात सुमारे १४ पेट्या विदेशी दारू आढळून आली. या दारूची किंमत २ लाख १ हजार ६०० रुपये एवढी होते. तर चारचाकी वाहनाची किंमत २ लाख २० हजार रुपये आहे. वाहन व दारू असा एकूण ४ लाख २१ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. संदीप कोवे (३३) व नागेश बुरेवार (३०) या दोघांना अटक करून त्यांना दारूबाबत विचारणा केली असता, सदर दारू नागपूर येथील सम्राट वाईन शॉप येथून आणण्यात आली आहे.तसेच वाहन प्रकाश गोधणी याच्या मालकीचे असल्याचे सांगितले. त्यानुसार या दोघांवरही दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे, लोकसभा निवडणुकीचे मुख्य केंद्र गडचिरोली शहर आहे. वाहनात आढळलेली पूर्ण दारू विदेशी आहे. त्यामुळे सदर दारू लोकसभेच्या निवडणुकीत वितरित करण्यासाठी आणली जात असावी, अशी शक्यता वर्तविली जात आहे. त्यादृष्टीने पोलीस तपास करीत आहेत. ही कारवाई मंडळ अधिकारी एस. एस. बारसागडे, पी. के. भंडारे, वनरक्षक एन. व्ही. वेदांती, एच. व्ही. मडावी, तुषार मेश्राम यांच्या पथकाने केली.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली