शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेसाठी १३१ हेक्टर भूसंपादन होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2018 00:45 IST

देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील खासगी, शासकीय व वनजमीन अशी एकूण १३१.४३४ हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे.

ठळक मुद्देदेसाईगंज-गडचिरोली नवीन मार्ग : आरमोरी व देसाईगंज तालुक्यातील जमीन

आरिफ शेख।लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील खासगी, शासकीय व वनजमीन अशी एकूण १३१.४३४ हेक्टर जमीन भूसंपादित करावी लागणार आहे.देसाईगंज-गडचिरोली रेल्वे मार्गासाठी भूसंपादन करण्याची कार्यवाही सुरू झाली आहे. या रेल्वे मार्गात देसाईगंज तालुक्यातील तीन गावांमधील २.१६५ हेक्टर आर व आरमोरी तालुक्यातील १२ गावांमधील ५.२७३ हेक्टर आर अशी एकूण ७.४३८ हेक्टर आर शासकीय जमीन लागणार आहे. भूसंपादनासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश निर्गमित केले आहेत. वनविभागाच्या अखत्यारितील देसाईगंज तालुक्यातील ४.७७ व आरमोरी तालुक्यातील ३८.५२९ हेक्टर आर जमीन रेल्वे मार्गासाठी लागणार आहे.उपअधीक्षक भूमिअभिलेख व संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी यांच्यासोबत जमिनीची संयुक्त पूनर्मोजणी झाली आहे. या अहवालानुसार देसाईगंज तालुक्यातील २५.१७७ व आरमोरी तालुक्यातील ५५.५२ अशी एकूण ८०.६९७० हेक्टर आर खासगी जमीन रेल्वे प्रकल्पासाठी भूसंपादित करावी लागणार आहे.२५ जानेवारी २०१७ च्या परिच्छेद ४ मध्ये नमूद असलेल्या संबंधित विभागाने केलेल्या संयुक्त मोजणी अहवालानुसार देसाईगंज उपविभागातील खासगी जमीन संपादित करण्याकरिता दुय्यम निबंधक तसेच नगररचनाकार गडचिरोली यांनी ठरवून दिलेल्या दरानुसार जिल्हास्तरीय समितीने मंजूर केलेल्या दरानुसार सदर गावातील प्रतिहेक्टरी दर यापैकी जे दर जास्त असेल, त्या दरानुसार भूसंपादन केले जाणार आहे. २६ मे २०१५ च्या अनुसूची क्षेत्राच्या वर्गीकरणानुसार दर्शविण्यात आलेल्या घटकाचे गुणांकानुसार जमिनीचा मोबदला निश्चित केला जाणार आहे. संपादन करावयाच्या जमिनीवर घर, विहीर, झाड, विद्युत विभागाचे पोल, टॉवर याबाबतचेही मूल्यांकन करण्यात आले आहे. त्यानुसार संबंधित शेतकºयाला मोबदला दिला जाणार आहे. ज्या गावांचे मूल्यांकन व अंतिम निवाळा पारित करण्यात आला आहे. ज्या शेतकºयांनी जमीन विक्रीकरिता संमती दर्शविली आहे. त्या जमीन धारकांकडून क्षतीपूर्ती बंदपत्र भरून घेतले जाईल. उपविभागीय अभियंता (बांधकाम) दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर यांचे नावे खासगी जमिनीची रजिस्ट्री केली जाणार आहे.४०३ पैकी १४४ शेतकऱ्यांची सहमतीरेल्वेसाठी देसाईगंज व आरमोरी तालुक्यातील ४०३ खासगी जमीनधारकांची जमीन जाणार आहे. त्यापैकी देसाईगंज तालुक्यातील २८ व आरमोरी तालुक्यातील ११६ अशा एकूण १४४ जमीनधारकांनी जमीन देण्यास सहमती दर्शविली आहे. उर्वरित जमीनधारकांकडून सहमतीपत्र घेण्याचे काम सुरू झाले आहे. या जमीन मालकांना जमीन व त्यावर असलेल्या संसाधनाचा मोबदला म्हणून २८ कोटी ७३ लाख ९१ हजार ६३२ रूपये निश्चित करण्यात आले आहे.

टॅग्स :railwayरेल्वेFarmerशेतकरी