शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
3
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
4
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
5
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
6
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
7
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
8
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
9
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
10
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
11
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
12
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
13
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
14
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
15
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
16
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
17
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
18
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा
19
Shocking: गंमत म्हणून विवाहित महिलेनं डीएनए चाचणी केली, सासराच निघाला बाप!
20
देव तारी त्याला कोण मारी! भीषण रेल्वे अपघातात ढिगाऱ्याजवळ जिवंत सापडला चिमुकला, पण...

आलीया गावात अजब वरात... गोंडी मंगलाष्टकांनी १२७ जोडप्यांची लग्नगाठ

By संजय तिपाले | Updated: March 26, 2023 10:41 IST

आठ आत्मसमर्पित नक्षलींचा समावेश: पोलिस दल, मैत्री परिवार संस्थेचा उपक्रम

संजय तिपाले/गडचिरोली : आदिवासी गोंडी समाजाच्या पुरातन चालीरीती व परंपरेनुसार २६ मार्चला शहरात १२७ जोडप्यांची लग्नगाठ बांधली जात आहे. सकाळी ९ वाजता शहरातून पारंपरिक पद्धतीने निघालेल्या वरातीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. आठ आत्मसमर्पित नक्षली जोडपीही यावेळी विवाहबद्ध होत आहेत. 

जिल्हा पोलिस दल व नागपूर येथील मैत्री परिवार संस्थेच्या संयुक्त विद्यमाने एकाच मांडवात होत असलेल्या या सामूहिक विवाह सोहळ्यामुळे शहर गजबजून गेले आहे. पिपाणीचा लयबद्ध सूर.. ढोलताशांचा गजरात मूल रोडवरील मंगल कार्यालयातून वरातीला सुरुवात झाली. हनुमान मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यावर वरात मुख्य व्यापारपेठेतून इंदिरा गांधी चौकातून पुन्हा लग्नमंडवात पोहोचली. गोंडी मंगलाष्टकांनी हा सोहळा पार पडत आहे. यावेळी पोलिस उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांची उपस्थिती आहे. पोलिस अधीक्षक नीलोत्पल, मैत्री परिवार संस्थेचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे, सचिव प्रमोद पेंडके, निरंजन वासेकर, दिलीप ठाकरे, मंजूषा जोशी, अश्विनी भांडकेर आदी यासाठी अथक परिश्रम घेत आहेत.महिलांकडून पुष्पवृष्टी, पोलिस थिरकले

वरातीच्या मार्गावर रांगोळ्या काढल्या होत्या.शहरातून वरात निघाली तेव्हा महिलांनी घराबाहेर पडून कैतुकाने वधू- वरांवर पुष्पवृष्टी केली. वरातीत नातेवाईकांची पाऊले थिरकली. यावेळी पोलिसांनाही ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही.जोडप्यांना प्रशिक्षण, देणार रोजगार

लग्नानंतर पोलिस प्रशासनाकडून जोडप्यांना रोजगाराभिमुख प्रशिक्षण देऊन त्यांचे संसार उभे करण्यात सर्वतोपरी सहकार्य केले जाणार आहे. पोलिस दलाकडून आदिवासींच्या उत्थानासाठी दादालोरा खिडकी या उपक्रमातून विविध योजना राबविल्या जातात. जोडप्यांना संसारोपयोगी साहित्य

वधूला डोरले, मंगळसूत्र, वधू-वरांना नवे कपडे, संसारोपयोगी साहित्य देण्यात आले. जोडप्यांच्या आई-वडिलांना आहेर दिला  आहे. वऱ्हाडींच्या मिष्ठान्न भोजनाची सोय केली जाणार आहे.लग्नाला साडेतीन हजारांवर वऱ्हाडी

विवाह सोहळ्यासाठी ५०० बाय ८० चौरस जागेत चार वेगवेगळे मंडप उभारले आहेत. यात साडेतीन हजार लोकांच्या बसण्याची व्यवस्था आहे. १२७ जोडप्यांचे दहा झोनमध्ये विभाजन केले आहे. मुख्य मंडपाला वीर बिरसा मुंडा, आदिवासी बांधवांच्या भोजनकक्षाला क्रांतिवीर बाबूराव शेडमाके व मान्यवरांच्या भोजनकक्षाला वीर नारायण सिंह यांचे नावे असून वधू- वर भोजन कक्षास वीर राणी दुर्गावती असे नाव दिले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली