शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
7
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
8
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
9
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
10
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
11
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
12
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
13
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
14
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
15
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
16
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
17
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
18
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
19
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
20
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
Daily Top 2Weekly Top 5

१० वर्षात सिकलसेलचे १२३ बळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2018 00:06 IST

पूर्व विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या सिकलसेल आजाराचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यातही बरेच आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाकडून हा आजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा आजार अजूनही अपेक्षित प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही.

ठळक मुद्देजनजागृतीवर भर गरजेचा : जिल्ह्यात सद्यस्थितीत २२४९ रुग्ण तर २८ हजार वाहक

मनोज ताजने ।लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : पूर्व विदर्भात प्रामुख्याने आढळणाऱ्या सिकलसेल आजाराचे प्रमाण गडचिरोली जिल्ह्यातही बरेच आहे. गेल्या १० वर्षांपासून शासनाकडून हा आजार रोखण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. मात्र हा आजार अजूनही अपेक्षित प्रमाणात नियंत्रणात आलेला नाही. २००८ ते २०१८ या १० वर्षात गडचिरोली जिल्ह्यात या आजाराने १२३ लोकांचा बळी घेतला आहे. यातील ८ जण यावर्षीच्या ११ महिन्यातील आहेत.दि.११ ते १७ डिसेंबरदरम्यान राज्यभर सिकलसेल जनजागृती सप्ताह साजरा करण्यात आला. यादरम्यान अनेक ठिकाणी जनजागृतीपर कार्यक्रम झाले असले तरी वर्षभर युवा वर्गात या आजाराबाबतची जनजागृती योग्य पद्धतीने होताना दिसत नाही. त्यामुळे सिकलसेलचे वाहक असणाºया युवक-युवतींमध्ये विवाह होऊन सिकलसेलग्रस्त बाळ जन्माला येत आहे. यावर्षी असे ३९ नवीन सिकलसेल रुग्ण जिल्ह्यात आढळले आहेत. याशिवाय १११३ नवीन वाहक आढळले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील सिकलसेल वाहकांची संख्या २८ हजार १२५ वर पोहोचली आहे.सिकलसेल आजाराच्या पेशी अनुवंशिक पद्धतीने पुढच्या पिढीत स्थानांतरित होतात. आजाराने ग्रस्त आणि आजाराचे वाहक अशा दोन प्रकारच्या पेशी असणारे लोक आढळतात. यातील रुग्णाला अशक्तपणा येत असल्याने त्यांना वारंवार रक्त द्यावे लागते. वाहक या प्रकारातील पेशी आढळणाऱ्या व्यक्ती स्वत: आजारी पडत नसली तरी दोन वाहक व्यक्तींमध्ये लग्न झाल्यास (पती-पत्नी) त्यांना होणारे अपत्य या आजाराने ग्रस्त आढळते. हे टाळण्यासाठी आणि आजाराचे वेळीच निदान करण्यासाठी वेळोवेळी रक्तचाचणी केली जाते.आधी सोल्युबिलीटी चाचणी करून त्यात सिकलसेल पॉझिटिव्ह आढळळ्यास इलेक्ट्रोफोरेसिस चाचणी करणे गरजेचे असते. परंतू अनेक दिवसांपासून या किटचा पुरवठा न करता सिकलसेल चाचणी व जनजागृतीसाठी राज्यस्तरावरून एचएलएल या कंपनीला कंत्राट देण्यात आला आहे.सरकारी यंत्रणेवर सरकारचाच अविश्वासज्या एचएलएल या कंपनीकडे सिकलसेल तपासणीसाठी रक्तनमुने घेण्याचे आणि सर्वत्र जनजागृती करण्याचे काम दिले त्या कंपनीकडे अपुरे मनुष्यबळ आहे. या कंपनीचे स्वयंसेवक रक्तनमुने घेतल्यानंतर स्थानिक स्तरावर तत्काळ निदान होणारी सोल्युबिलीटी चाचणी आधी न करता थेट रक्तनमुने नागपूर येथील आपल्या प्रयोगशाळेत पाठवितात. नंतर त्या नमुन्यांचा अहवाल एकत्रितपणे या कंपनीकडून आरोग्य विभागाला पाठविला जातो. यात अहवाल येण्यास विलंब होतो. वास्तविक जिल्ह्याच्या सरकारी आरोग्य यंत्रणेकडे स्थानिक स्तरावर प्रयोगशाळा आणि मनुष्यबळ असताना त्यांना डावलून खासगी कंपनीकडून केल्या जात असलेल्या या कामावर जास्त विश्वास आहे का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.जिल्ह्यात रक्तपेढींची कमतरतासिकलसेलग्रस्त रुग्णाला वारंवार रक्तपुरवठा करावा लागतो. परंतू जिल्ह्यात तालुकास्तरावर सर्वत्र रक्तपेढींची सुविधा नाही. दुर्गम भागातील रुग्णाला वारंवार रक्त घेण्यासाठी जिल्हा सामान्य रूग्णालयात येणे शक्य नसल्यामुळे गावातच त्याचा मृत्यू ओढवतो. हे टाळण्यासाठी प्रमुख तालुक्यांच्या ठिकाणी ग्रामीण रुग्णालयांमध्ये रक्तपेढीची सुविधा देण्याची मागणी केली जात आहे.

टॅग्स :Healthआरोग्य