शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
3
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
4
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
5
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
6
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
7
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
8
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
9
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
10
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
11
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
12
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
13
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
14
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
15
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
16
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
17
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
18
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा
19
कुबेरेश्वर धाममध्ये आणखी ३ भाविकांचा मृत्यू; आतापर्यंत ७ जणांनी गमावला जीव, कारण काय..?
20
रशियाचे राष्ट्राध्यक्ष भारतात येणार, ट्रम्प यांच्या 'दबावतंत्रा'वर मोदी-पुतीन तोडगा काढणार!

सिरोंचा तालुक्यातील 12 गावे करणार रिकामी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2022 05:00 IST

पावसाचे पाणी काही गावात शिरण्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मात्र नागेपल्लीत अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरले आणि प्रशासनाला बचावकार्य मोहिम राबवावी लागली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. 

लाेकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : सिरोंचा तालुक्यात गोदावरी आणि प्राणहिता नदीला आलेला पूर आणि मेडीगड्डा धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे निर्माण झालेला धोका पाहून १२ गावातील नागरिकांना घर सोडण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. दरम्यान पुरात अडकलेल्या अनेक लोकांना सुरक्षित स्थळी हलविण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घेतला आहे.जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून दक्षिण भागातील तालुक्यांमध्ये असलेली पूरस्थिती मंगळवारीही कायम होती. त्यामुळे संभाव्य धोका लक्षात घेता नागरिकांना सुरक्षित स्थळी जाण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. पावसाचे पाणी काही गावात शिरण्याचा अंदाज घेऊन खबरदारीचा उपाय म्हणून १०९ कुटुंबातील ४४० लोकांना सुरक्षित निवाऱ्यात ठेवण्यात आले आहे. यामध्ये अहेरी तालुक्यातील ११ गावांचा समावेश आहे. मात्र नागेपल्लीत अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गावात शिरले आणि प्रशासनाला बचावकार्य मोहिम राबवावी लागली. रात्रीपासून नागेपल्ली गावातील समाक्का मंदिराजवळील नागरिक पावसाच्या पाण्यात अडकल्याची माहिती प्रशासनाला प्राप्त झाली. पोलीस, महसूल यंत्रणा यांनी सकाळी तात्काळ एसडीआरएफ टीमला घटनास्थळी बोलविले. २५ नागरिकांना स्थानिक युवकांच्या मदतीने सुखरूप बाहेर  काढण्यात आले. नागेपल्लीमधील १७ नागरिकांना बोटीने बाहेर काढले. अहेरीतील मुसळधार पावसामुळे दिना नदीला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. बोरी, आलापल्ली, मुक्तापूर येथे रस्ता खचल्याने वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. वेलगूर येथील मामा तलाव पावसाच्या पाण्याने फुटला होता, त्यानंतर प्रशासनाने दुरूस्ती केली. मात्र पुन्हा मंगळवारी तलाव फुटला. यामध्ये कुठेही जीवीत हानी झालेली नाही.

या गावकऱ्यांना घर सोडावे लागणार-    सिरोंचा तालुक्यातील ज्या १२ गावांमधील नागरिकांना तूर्त घर सोडण्यास सांगितले आहे त्यात सिरोंचा रै. (छोटा बाजार), सूर्यरापल्ली (सिरोंचा माल), मंडलापूर, मद्दीकुंठा, जानमपल्ली, मृदुक्रिष्णापूर, आयपेठा रै, सोमनूर माल (अंशतः), नडीकुडा, कोत्तूर रै, असरअल्ली (अंशतः), अंकिसा, कंबालपेठा टोला (अंशत:) या गावांचा समावेश आहे. पोलीस आणि महसूल प्रशासनाच्या कर्मचाऱ्यांनी संबंधित गावात जाऊन नागरिकांना घरे सोडण्यास सांगितले आहे.

आलापल्लीत ३२५ मिमी पाऊसगेल्या दोन दिवसांपासून जिल्ह्यात पर्जन्यमानाबाबत रेड अलर्ट देण्यात आला होता. सोमवारी रात्रीपासून मंगळवारच्या सकाळपर्यंत अहेरी तालुक्यातील आलापल्ली महसूल मंडळात ढगफुटीसदृश पाऊस झाला. तब्बल ३२५ मिलीमीटर अशा विक्रमी पावसाची नोंद झाली. असा पाऊस यापूर्वी कधीच पाहिला नाही, अशी प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केली. या पावसामुळे आलापल्ली मंगळवारी जलमय झाले होते.

 

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर