समस्या सुटली : क्रिष्णा गजबे विनोद तावडेंना भेटलेकुरखेडा : झाडीपट्टीतील वृद्ध कलावंतांचे मानधन अनेक महिन्यांपासून थकीत होते. या समस्येला घेऊन आ. क्रिष्णा गजबे यांनी सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांची भेट घेतल्यामुळे झाडीपट्टीतील ११३ कलावंतांचे जवळपास सहा महिन्यांचे मानधन निकाली निघणार आहे. याकरिता १० लाख ११ हजार रूपयांचा निधी उपलब्ध करून देऊ, असे आश्वासन सांस्कृतिक कार्यमंत्री विनोद तावडे यांनी आ. क्रिष्णा गजबे यांना दिले आहे. (तालुका प्रतिनिधी)
११३ वृद्ध कलावंतांचे थकीत मानधन मिळणार
By admin | Updated: March 5, 2016 01:19 IST