शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

१०८ रूग्णवाहिकेने अनेकांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 14, 2018 01:24 IST

अपघातस्थळी रूग्णवाहिका पोहोचवून संबंधित रूग्णाला रूग्णालयात पोहोचविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची सेवा शासनाने सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० रूग्णवाहिका आहेत. २०१४ ते २०१८ या कालावधीत ३८ हजार ९७८ रूग्णांना रूग्णालयात पोहोचविले आहे.

ठळक मुद्देग्रामीण भागासाठी सोईचे : ३९ हजार रूग्णांना पोहोचविले रूग्णालयात, चार वर्षांपासून सेवा सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : अपघातस्थळी रूग्णवाहिका पोहोचवून संबंधित रूग्णाला रूग्णालयात पोहोचविण्यासाठी १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेची सेवा शासनाने सुरू केली आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकूण १० रूग्णवाहिका आहेत. २०१४ ते २०१८ या कालावधीत ३८ हजार ९७८ रूग्णांना रूग्णालयात पोहोचविले आहे. वेळेवर रूग्णालयात पोहोचवून त्यांच्यावर उपचार झाल्याने यातील अनेकांना जीवदान मिळाले आहे.ग्रामीण भागात चारचाकी वाहन उपलब्ध राहत नाही. त्यामुळे गावात एखादी अपघातात्मक घटना घडल्यास संबंधित रूग्णाला जवळपासच्या रूग्णालयात पोहोचविताना फार मोठी अडचण निर्माण होते. बऱ्याच वेळा वाहन मिळत नसल्याने रूग्णाचा मृत्यू सुध्दा होतो. अपघातात्मक घटना घडल्यानंतर सर्वप्रथम कमीत कमी कालावधीत त्या रूग्णावर उपचार होणे आवश्यक असते. मात्र वाहनाअभावी रूग्ण रूग्णालयापर्यंत पोहोचू शकत नाही. या सर्व बाबींची अडचण लक्षात घेऊन शासनाने १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका सेवा देशभरात सुरू केली आहे.गडचिरोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये वाहनांचा अभाव आहे. अशा स्थितीत १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका अत्यंत महत्त्वाची सेवा बजावत आहे. अपघात झालेल्या व्यक्तीला रूग्णालयात पोहोचविण्याबरोबरच गरोदर माताना सुध्दा रूग्णालयात पोहोचविले जात असल्याने माता व बालमृत्यूचे प्रमाण कमी होण्यास मदत होते. १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेसोबत डॉक्टर उपलब्ध राहतो. त्यामुळे प्रवासादरम्यान संबंधित रूग्णाची वेळोवेळी तपासणी करण्याचे काम डॉक्टर करीत असतो.रूग्णवाहिकेच्या सेवेची सुरूवात २०१४ मध्ये झाली. पहिल्या वर्षी १ हजार २६३ रूग्णांना पोहोचविण्यात आले. २०१५ मध्ये ४ हजार ३३ रूग्ण, २०१६ मध्ये ६ हजार ३८२ रूग्ण, २०१७ मध्ये १० हजार ९९१ व २०१८ मध्ये १७ हजार २०९ रूग्णांना रूग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. २०१४ ते २०१८ मधील रूग्णवाहिकेने रूग्णालयात भरती केलेल्या रूग्णांच्या संख्येकडे नजर टाकल्यास दरवर्षी ही संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येते.यावरून १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेबाबत नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली आहे. यापूर्वी गावखेड्यात कव्हरेज राहत नसल्याने १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेसाठी कॉल सेंटरला कॉल करण्यास अडचण निर्माण होत होती. मात्र ग्रामीण भागातही आता कव्हरेज प्राप्त झाले असल्याने १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेचा लाभ घेणाऱ्यांची संख्या वाढत चालली असल्याचे दिसून येते.नऊ हजार गरोदर मातांना दिली सेवागडचिरोली जिल्ह्यात वाहनांची संख्या कमी आहे. त्यामुळे गरोदर मातांना रूग्णालयात पोहोचविण्यास फार मोठी अडचण निर्माण होत होती. परिणामी गरोदर मातांची घरीच प्रसुती केली जात होती. यामुळे मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण वाढले होते. मात्र १०८ क्रमांकाची रूग्णवाहिकेची सेवा उपलब्ध झाल्याने गावकरी गावातच १०८ क्रमांकाची रूग्णवाहिका बोलवितात. त्यानंतर संबंधित महिलेला तत्काळ नजीकच्या रूग्णालयात भरती केले जाते. २०१४ ते २०१८ या कालावधीत ९ हजार ११३ गरोदर महिलांना रूग्णालयात पोहोचविण्यात आले आहे. अपघातात जखमी झालेल्या २ हजार ९१० नागरिकांना रूग्णालयात पोहोचविले आहे. जळालेल्या १३४ नागरिकांना, पडलेल्या ७४६ नागरिकांना, विजेने जखमी झालेल्या ६४ इत्यादी ३८ हजार ९७८ रूग्णांना १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेने पोहोचविण्यात आले आहे.जनजागृती वाढलीवाहनांवर व इतर ठिकाणीही अपघात झाल्यास १०८ क्रमांक डायल करा, असे लिहिले राहत असल्याने नागरिकांमध्ये १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेविषयी जनजागृती झाली असल्याचे दिसून येते.रस्त्यांची अडचण कायम१०८ क्रमांकाची रूग्णवाहिका उपलब्ध करून दिल्याने ग्रामीण भागातील नागरिकांसाठी फार सोयीचे झाले आहे. मात्र दुर्गम भागातील काही गावांमध्ये अजुनही रस्ते पोहोचले नाही. परिणामी गरोदर माता व इतर आजाराने जखमी असलेल्या व्यक्तीला रूग्णालयात भरती करणे शक्य होत नाही. बऱ्याचवेळा संबंधित रूग्णाला खाटेवर टाकून कित्येक दूरपर्यंत न्यावे लागते. यामध्ये बराचसा वेळ जाऊन संबंधित रूग्णांचा मृत्यू होतो. रस्त्याची समस्या अतिशय गंभ्ीर असून ती सोडविणे आवश्यक आहे.

टॅग्स :Healthआरोग्य