शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

नऊ महिन्यात १०,७६३ वाहन नोंदणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 31, 2020 06:00 IST

दरवर्षी वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. पूर्वी चैनीची वस्तू म्हणून वाहनांकडे पाहिले जात होते, पण आता प्रत्येकासाठी वाहन गरजेचे होऊ पाहात आहे. त्यामुळे प्रत्येक घरात किमान दुचाकी वाहन दिसू लागले आहे. गेल्यावर्षी (२०१८) एप्रिल ते डिसेंबर यादरम्यान ८३१६ मोटार सायकल, ७८१ कार आणि ९८९ इतर वाहनांची नोंदणी झाली होती.

ठळक मुद्दे१८ कोटींचा महसूल : ८७८१ दुचाकी, ७१९ कार तर ११९० इतर वाहनांची नोंदणी

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : येथील उपप्रादेशिक परिवहन कार्यालयाने एप्रिल ते डिसेंबर २०१९ या नऊ महिन्यात १० हजार ७६३ वाहनांची नोंदणी करत १८ कोटी रुपयांचा महसूल शासनाला मिळवून दिला. आरटीओ कार्यालय नवीन आणि प्रशस्त इमारतीत स्थानांतरित झाल्यापासून कामांचा वेग वाढला असून ऑनलाईन पद्धतीमुळे या कार्यालयाचे काम अधिक पारदर्शक आणि सुटसुटीत झाले आहे. विशेष म्हणजे मंजूर असलेल्या पदांपैकी ५० टक्के पदे रिक्त असतानाही प्रलंबित कामांचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसून येते.दरवर्षी वाहन खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढतच आहे. पूर्वी चैनीची वस्तू म्हणून वाहनांकडे पाहिले जात होते, पण आता प्रत्येकासाठी वाहन गरजेचे होऊ पाहात आहे. त्यामुळे प्रत्येक घरात किमान दुचाकी वाहन दिसू लागले आहे. गेल्यावर्षी (२०१८) एप्रिल ते डिसेंबर यादरम्यान ८३१६ मोटार सायकल, ७८१ कार आणि ९८९ इतर वाहनांची नोंदणी झाली होती. यावर्षी सर्वच वाहनांच्या नोंदणीत वाढ झाली. एप्रिल ते डिसेंबर २०१९ या कालावधीत ८७८१ मोटारसायकल, ७९२ कार आणि ११९० इतर वाहनांची नोंदणी झाली आहे. म्हणजेच यावर्षी ९ महिन्यात ६७७ अधिक वाहनांची नोंदणी झाली आहे.वाहन नोंदणीसह विविध माध्यमातून परिवहन विभागाने डिसेंबर अखेरपर्यंतच्या ९ महिन्यात १८ कोटी ३ लाखांचा महसूल वसूल केला. गेल्यावर्षी याच कालावधीत १४ कोटी ६१ लाखांचा महसूल मिळाला होता. विविध करांपोटी यावर्षी १ कोटी २६ लाख रुपयांचा महसूल या विभागाला मिळाला आहे.यावर्षी ९ महिन्यात जादा भार वाहून नेणाऱ्या वाहनधारकांकडून ४ लाख ७१ हजार १३० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. गेल्यावर्षीपेक्षा या नियमांतर्गत कारवायांचे प्रमाण घटले. शासनाने वाहनांची वजन मर्यादा वाढविल्यामुळे दोषी वाहनांचे प्रमाण घटल्याचे परिवहन विभागाकडून सांगण्यात आले. पूर्वी भार वाहून नेणाऱ्या वाहनाची वजन मर्यादा ३१,००० किलोग्रॅम होती. ही मर्यादा ३५,००० किलोग्रॅम वाढविल्यामुळे कारवाईसाठी पात्र ठरणाऱ्या वाहनांची संख्या घटल्याचे दिसून येते.अवैध प्रवासी वाहतूक करणाऱ्या खासगी बस आणि इतर वाहनांवरील कारवायांमधून सदर विभागाला ५ लाख १८ हजार ४३४ रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यात बसवरील कारवायांमधून १ लाख ८ हजार तर बस व्यतिरिक्त इतर वाहनांवरील कारवायांमधून ४ लाख १० हजार रुपयांचा महसूल मिळाला आहे.५० टक्के जागा रिक्त, तरीही कामकाज सुरळीतविशेष म्हणजे उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात विविध पदांच्या ५० टक्के जागा रिक्त आहेत. मात्र तरीही त्याचा दैनंदिन कामकाजावर फारसा फरक पडला नसल्याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी रविंद्र भुयार यांनी सांगितले. रिक्त पदांमध्ये सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी १, मोटार वाहन निरीक्षक ५, सहायक मोटार वाहन निरीक्षक १९, आणि वरिष्ठ लिपीक १ अशा विविध पदांच्या एकूण २६ जागा रिक्त आहेत. यापूर्वी याहीपेक्षा जास्त जागा रिक्त होत्या. काही महिन्यांपूर्वी ७ मोटार वाहन निरीक्षक मिळाले, पण तरीही त्यांच्या ५ जागा रिक्त आहेत. एक निरीक्षक प्रतिनियुक्तीवर मुंबईला कार्यरत आहे.परिवहन विभागाचे काम आता अधिक सुटसुटीत आणि पारदर्शक झाले आहे. वाहनधारकांनी आपल्या वाहनांचा कर वेळोवेळी भरून योग्यता प्रमाणपत्र घ्यावे. कर चुकवणाऱ्या आणि योग्यता प्रमाणपत्र नसलेल्या वाहनधारकांवर कारवाईसाठी लवकरच मोहीम सुरू केली जाणार आहे.- रवींद्र भुयार,उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गडचिरोली

टॅग्स :Rto officeआरटीओ ऑफीस