शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
4
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
5
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
6
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
7
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
8
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
9
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
10
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
11
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
12
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
13
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
14
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
15
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
16
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
17
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
18
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
19
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
20
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

गडचिरोलीत दीड महिन्यात आठ प्रकल्पांत १०० टक्के पाणीसाठा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2025 19:40 IST

दिना धरण निम्मे भरण्याच्या स्थितीत : जिल्ह्यातील माजी मालगुजारी तलावही होताहेत तुडुंब

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : जिल्ह्यात यंदा १५ दिवस आधीच मोसमी नैर्ऋत्य पावसाचे आगमन झाले. यामुळे शेतकरी राजा लवकरच हंगामाला लागला. उन्हाळ्यात कोरडेठाक पडलेले सिंचन प्रकल्प व इतर जलस्रोतसुद्धा काही प्रमाणात पाण्याने भरले. सध्या जिल्ह्यातील आठ प्रकल्प १०० टक्के भरलेले आहेत, तर सात प्रकल्पांत निम्म्यापेक्षा अधिक जलसाठा आहे.

राज्यात मान्सूनचे लवकर आगमन झाल्याने जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. तत्पूर्वी मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्याने अनेक शेतकऱ्यांनी पेरणीपूर्वी मशागतीची कामे आटोपली. जवळपास आठवडाभर उसंत दिल्याने शेतकऱ्यांनी हंगाम उरकला. त्यानंतर पुन्हा पावसाच्या सरी बरसू लागल्या. २० जूननंतर सातत्याने पाऊस पडत आहे. आतापर्यंत मुसळधार पाऊस आला नसला तरी संततधार पावसामुळे जिल्ह्यातील लघु प्रकल्प भरत आहेत. संततधार पावसामुळे पिकांनाही फायदा झाला. मात्र, नदीकाठालगतच्या शेतातील पिके मात्र तीन ते चार दिवस बुडून राहिल्याने सडलेली आहेत.

चामोर्शी तालुक्याच्या रेगडी येथील दिना धरणात सध्या ४१.२८ टक्के पाणीसाठा आहे. संततधार पावसामुळे येथे बऱ्याप्रमाणात पाणीसाठा आहे. याशिवाय वैनगंगा नदीवरील चिचडोह बॅरेजचे संपूर्ण दरवाजे उघडलेले आहेत. जिल्ह्यात मोठा व मध्यम प्रत्येकी एक प्रकल्प तर २४ लघु प्रकल्प आहेत.

४६९.५ मिमी सरासरी पाऊस १ जून ते १२ जुलै या कालावधीत जिल्ह्यात पडलेला आहे. याची टक्केवारी १२४.७ एवढी आहे. सर्वाधिक ६६२ मिमी पाऊस देसाईगंज तालुक्यात, तर सर्वात कमी १३०.८ मिमी पाऊस सिरोंचा तालुक्यात पडलेला आहे.

हे प्रकल्प भरले तुडुंबपाटबंधारे विभागांतर्गत येणारे जिल्ह्यातील आठ लघु प्रकल्प तुडुंब भरलेले आहेत. यात येंगलखेडा, कोसरी लघु प्रकल्पासह चोप, विसोरा, वडेगाव, गडचिरोली, धानोरा, वडधा, आदी माजी मालगुजारी तलावांचा समावेश आहे.

ह्या प्रकल्पांमध्ये निम्माच पाणीसाठाजिल्ह्यातील रावणवाडी, बोडधा, राजगट्टा, बोदली, आदी मामा तलावांमध्ये ५० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. तळोधी मामा तलावात ४७.८५ टक्के, तर घोट, कसारी येथील मामा तलावात ७० टक्क्यांहून अधिक पाणीसाठा आहे. काही दिवसांतच हे तलाव १०० टक्के भरतील. दोन दिवसांपासून पावसाचा जोर ओसरला.

जिल्ह्यातील पाच प्रकल्पांमध्ये ३० टक्क्यांच्या आतच जलसाठाचामोर्शी तालुक्यातील कुनघाडा, अनखोडा, मूलचेरा तालुक्यातील लगाम, येलगूर गडचिरोली तालुक्यातील हिरापूर, आदी पाच मामा तलावांमध्ये ३० टक्क्यांच्या आतच जलसाठा आहे.

टॅग्स :Gadchiroliगडचिरोली