शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

महिला रुग्णालयाला वाढीव १०० खाटा मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 23:47 IST

गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लोकार्पण झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता १०० खाटांचे हे रुग्णालय आता २०० खाटांचे होणार आहे. त्यासाठी वाढीव १०० खाटांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे.

ठळक मुद्देमनुष्यबळाची कमतरता दूर होणार : अतिरिक्त जागेसाठी जिल्हा परिषदेला पाठविला प्रस्ताव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : गेल्यावर्षी एप्रिल महिन्यात लोकार्पण झालेल्या जिल्हा महिला व बाल रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांची संख्या पाहता १०० खाटांचे हे रुग्णालय आता २०० खाटांचे होणार आहे. त्यासाठी वाढीव १०० खाटांना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाने मंजुरी दिली आहे. त्यासाठी ३० कोटींचा निधीही मंजूर झाला आहे. त्यामुळे या रुग्णालयातील सध्या भेडसावत असलेल्या अनेक समस्या दूर होणार आहेत.जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील आरोग्य सेवा परिपूर्ण नसल्यामुळे गाव आणि तालुकास्तरावरून बहुतांश गरोदर महिलांना जिल्हा महिला व बाल रुग्णालयात पाठविले जाते. त्यामुळे या रुग्णालयाची भरती रुग्णांची क्षमता १०० असली तरी २०० ते ३०० रुग्ण दाखल असतात. परंतू मनुष्यबळ १०० खाटांच्या प्रमाणातच मंजूर असल्यामुळे डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांवर कामाचा प्रचंड ताण आहे.ही समस्या दूर करण्यासाठी वाढीव १०० खाटांची मागणी आमदार डॉ.देवराव होळी यांनी राज्य शासनाकडे लावून धरली होती. खासदार अशोक नेते यांनीही त्याबाबत राज्य शासनाकडे पत्रव्यवहार केला होता. या प्रयत्नांना यश आले असून अतिरिक्त १०० खाटांमुळे या रुग्णालयाची सेवा अधिक प्रभावी होण्यास मदत होणार आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या रुग्णालयाच्या तीन मजली इमारतीवर आणखी मजला चढविण्याची परवानगी नाही. त्यामुळे वाढीव खाटांसाठी दुसºया जागेत इमारत बांधणे गरजेचे झाले आहे. त्यासाठी रुग्णालयाच्या बाजुला असलेल्या जिल्हा परिषदेची जागा सोयीचे होणार आहे. ती जागा द्यावी असा प्रस्ताव जिल्हा आरोग्य प्रशासनाने जिल्हा परिषदेकडे पाठविला आहे. जि.प.च्या येत्या सर्वसाधारण सभेत त्यावर चर्चा होण्याची शक्यता आहे.कोट्यवधीच्या यंत्रसामग्रीसाठी तंत्रज्ञच नाहीगडचिरोली जिल्ह्यात महिलांमध्ये गर्भाशयाचा कर्करोग जास्त प्रमाणात आढळत असल्यामुळे त्याच्या तपासणीसाठी काल्पोस्कोपीची अत्याधुनिक मशिन महिला व बाल रुग्णालयात उद्घाटनाच्या वेळीच लावली होती. परंतू ती मशिन हाताळण्यासाठी कोणत्याच स्त्रीरोग तज्ज्ञाला आरोग्य विभागाकडून विशेष प्रशिक्षण देण्यात आलेले नाही. त्यामुळे वर्षभरापासून ती मशिन धूळखात पडली आहे. यासोबतच स्तनांच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी असलेल्या मॅमोग्राफीच्या मशिनसाठीही विशेष प्रशिक्षित क्ष-किरण तज्ज्ञ नाही. या दोन्ही मशिनसाठी योग्य तंत्रज्ञांची नेमणूक करण्याची गरज आहे.वर्षभरात ४५०१ जन्म, १५७ मृत्यूसदर रुग्णालयात एप्रिल २०१८ ते मार्च २०१९ पर्यंत ४५०१ बाळांचा जन्म झाला आहे. त्यात ४९ जुळ्या बाळांचाही समावेश आहे. तसेच १५७ जणांचा मृत्यू झाला आहे. त्यात ३ माता, १२५ नवजात बाळ आणि १ महिना ते १ वर्षपर्यंतच्या १७ बाळांचा समावेश आहे. वर्षभरात १६६२ मोठे आॅपरेशन तर १८९७ छोटे आॅपरेशन या रुग्णालयात झाले. यादरम्यान ४९ हजार ४११ जणांची तपासणी करण्यात आली. त्यात २७ हजार २८५ महिला आणि २२ हजार १०९ बालकांचा समावेश आहे.रक्तपेढीची सक्त गरजया रुग्णालयात रक्तपेढी किंवा रक्त साठवणूक केंद्र नसल्यामुळे रुग्णांना लागणाºया रक्तासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयाशी संपर्क करावा लागतो. त्यात वेळ जाऊन अनेक वेळा रुग्णाच्या जीवावर बेतते. केंद्रातील रक्ताच्या बदल्यात रुग्णाचे नातेवाईक रक्तदान करतात. पण सध्या ती सोय या रुग्णालयात नसल्यामुळे नातेवाईकांना लांब अंतरावर असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयात जाऊन ही सर्व प्रक्रिया करणे कठीण जाते.रुग्णालयात रक्तपेढीची गरज आहेच. त्यासाठी ६ महिन्यांपासून जिल्हा शल्य चिकित्सकांमार्फत वरिष्ठांकडे पत्रव्यवहार सुरू आहे. पण तूर्त रक्तसाठा केंद्र मंजुरीच्या उंबरठ्यावर आहे. त्यासाठी लागणाºया सर्व गोष्टी परिपूर्ण करण्याचे काम अंतिम टप्प्यात आहे.- डॉ.दीपचंद सोयाम,वैद्यकीय अधीक्षक,महिला व बाल रुग्णालय

टॅग्स :zpजिल्हा परिषदDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस