मॉस्को : ‘रशियातील विश्वचषक स्पर्धा अत्यंत चुरशीचा होत असून यंदाची स्पर्धा याआधी झालेल्या इतर सर्व विश्वचषकांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ ठरला,’ असे मत फिफाचे अध्यक्ष गियानी इन्फेन्टीनो यांनी व्यक्त केले. फ्रान्स व क्रोएशिया यांच्यात होणाऱ्या अंतिम सामन्याच्या दोन दिवसआधी इन्फेन्टीनो यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना मत व्यक्त केले.इन्फेन्टीनो म्हणाले, ‘मी सुरुवातीपासूनच म्हणत होतो की, यंदाचा विश्वचषक सर्वश्रेष्ठ ठरणार आणि आज मी पूर्ण विश्वासाने असे म्हणू शकतो.’ इन्फेन्टीनो यांनी रशियाचे कौतुक करताना म्हटले की, ‘रशियाच्या बाबतीत लोकांमध्ये जी प्रतिमा होती, ती येथे आलेल्या दहा लाखांहून अधिक फुटबॉलप्रेमींच्या सकारात्माक अनुभवाने बदलली आहे. या स्पर्धेमुळे रशियाची प्रतिमा खूप उंचावली आहे.’
यंदाचा विश्वचषक सर्वश्रेष्ठ - इन्फेन्टीनो
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 14, 2018 05:27 IST