शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

World Cup 2022: कतार गमावणार फुटबॉल विश्वचषक स्पर्धेचा मान? 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 09:29 IST

रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर सर्वांना वेध लागलेत ते 2022च्या स्पर्धेचे, परंतु यजमानपदाच्या निवडीपासूनच ही स्पर्धा वादात राहिली आहे.

लंडन - रशियात नुकत्याच पार पडलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेनंतर सर्वांना वेध लागलेत ते 2022च्या स्पर्धेचे, परंतु यजमानपदाच्या निवडीपासूनच ही विश्वचषक स्पर्धा वादात राहिली आहे. त्यात यजमानपद मिळवण्यासाठी कतारने पेड बातम्या दिल्याचे प्रकरण समोर येत आहे. या स्पर्धेच्या आयोजनासाठी कतारसह अमेरिका, दक्षिण कोरिया, जपान आणि ऑस्ट्रेलिया यांनीही उत्सुकता दर्शवली होती. मात्र खरी चुरस रंगली ती कतार आणि अमेरिका यांच्यात, त्यात कतारने 14-8 अशा फरकाने बाजी मारली. 

कतारला यजमानपद मिळाल्यापासून 2022ची स्पर्धा चर्चेत आहेच. यजमानपदाच्या मतासाठी लाच दिल्याच्या आरोपापासून ते कतारच्या हवामानात खेळाडूंना होणा-या त्रासापर्यंतच्या मुद्यांवरून या निर्णयाला विरोध झाला. त्यात हे यजमानपद मिळवण्यासाठी कतारकडून फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. यजमानपदाच्या शर्यतीत असलेल्या अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया या दावेदारांबद्दल पैसे देऊन अपप्रचार केल्याचा आरोप कतारवर ठेवण्यात आला आहे. यासाठी कतारने जवळपास 7000 पाऊंड रक्कम खर्ची केल्याचा दावा करण्यात येत आहे. 

त्यामुळे फिफाच्या नियमांचे उल्लंघन झाले असून त्याची चौकशी सुरू आहे. यात कतार दोषी आढळल्यात त्यांच्याकडून यजमानपदाचा मान काढून घेतला जाऊ शकतो. 2022च्या विश्वचषक आयोजनासाठी इंग्लंडने तयारी दर्शवली आहे. त्यांनी 2018च्या स्पर्धेसाठी अर्ज दाखल केला होता, परंतु तो मान रशियाला मिळाला. इंग्लंड फुटबॉल असोसिएशनचे माजी अध्यक्ष लॉर्ड ट्राइस्मन यांनी 2022च्या विश्वचषक स्पर्धा आयोजनाची तयारी दर्शवली आहे. कतारने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

टॅग्स :FootballफुटबॉलQatarकतारSportsक्रीडा