शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

Wimbledon Tennis : फुटबॉल विश्वचषकाच्या प्रक्षेपणाला येथे बंदी; चाहत्यांमध्ये नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2018 20:44 IST

रशियामध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून गतविजेत्या जर्मनीपाठोपाठ अर्जेंटिना, स्पेन या माजी विजेत्यांसह पोर्तुगाल या बलाढ्य संघांना गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे स्पर्धेतील विजेता कोण ठरेल याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीत यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या जगभरातील प्रेक्षकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबतची रूची किती वाढत चालली असल्याचा अंदाज बांधता येईल.

विम्बल्डन  - रशियामध्ये सुरू असलेल्या फुटबॉल विश्वचषक स्पर्धेतून गतविजेत्या जर्मनीपाठोपाठ अर्जेंटिना, स्पेन या माजी विजेत्यांसह पोर्तुगाल या बलाढ्य संघांना गाशा गुंडाळावा लागला आहे. त्यामुळे स्पर्धेतील विजेता कोण ठरेल याबाबतची उत्सुकता ताणली गेली आहे. फिफाने नुकत्याच जाहीर केलेल्या आकडेवारीत यंदाच्या विश्वचषक स्पर्धेच्या जगभरातील प्रेक्षकसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे या स्पर्धेबाबतची रूची किती वाढत चालली असल्याचा अंदाज बांधता येईल.एकिकडे प्रेक्षकसंख्येचे हे विक्रम मोडले जात असताना लंडन येथे सोमवारपासून सुरू झालेल्या एका स्पर्धेत फुटबॉल विश्वचषक स्पर्धेच्या सामन्यांच्या प्रक्षेपणाला बंदी घालण्यात आली आहे. त्यात इंग्लंडचा संघ चांगली कामगिरी करत असूनही या निर्णयाने क्रीडाप्रेमींमध्ये नाराजीचा सूर आहे. 141 वर्षांची परंपरा असलेल्या विम्बल्डन टेनिस स्पर्धेला सोमवारपासून सुरूवात झाली. पण या स्पर्धेत फुटबॉल फ्री झोन ठेवण्यात आला आहे. विश्वचषक स्पर्धेतील बाद फेरीचे सामने विम्बल्डनचे सामने पाहण्यासाठी येणा-या प्रेक्षकांना पाहता येणार नाही, अशी माहिती ऑल इंग्लंड क्लबने दिली आहे. विम्बल्डन स्पर्धेच्या परंपरेत कोणताही बदल करण्यात येणार नाही. याआधीही विम्बल्डनमध्ये फुटबॉलचे सामने दाखवण्यात आले नव्हते. मग ती युरोपियन चॅम्पियनशीप असो किंवा विश्वचषक, नियमात कोणताही बदल होणार नाही, असेही आयोजकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.  कधीपासून आहे हा नियम ?विम्बल्डन आयोजकांचा हा निर्णय टेनिस चाहत्यांसाठी आश्चर्यकारक नाही. 1996च्या युरो स्पर्धेपासून ही परंपरा कायम आहे. 2010च्या विश्वचषक स्पर्धेचे सामने सराव सत्रात दाखवण्यात यावे अशी ब्रिटनच्या अँडी मरे याने केलेली विनंती मान्य करण्यात आली होती. पण यंदा तशी काहीच शक्यता नाही. 

एकाच दिवशी दोन फायनलविश्वचषक फुटबॉल आणि विम्बल्डन स्पर्धेच्या अंतिम लढती 15 जुलैला होणार आहेत. यापूर्वी 1990 आणि 2006 च्या विश्वचषक  स्पर्धेत असा योगायोग झाला होता.  

टॅग्स :Wimbledonविम्बल्डनTennisटेनिसSportsक्रीडा