शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

तिसऱ्या स्थानासाठी कुणाचे पारडे जड? क्रोएशिया-मोरोक्को यांच्यात ‘हाय व्होल्टेज’ लढत आज

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2022 06:02 IST

क्रोएशिया संघ मागच्या विश्वचषकाचा उपविजेता आहे. यावेळी उपांत्य सामन्यात त्यांना अर्जेंटिनाने ३-० ने नमविले.

दोहा : फिफा विश्वचषकाच्या उपांत्य सामन्यात पराभूत झालेले  क्रोएशिया आणि मोरोक्को संघ शनिवारी तिसऱ्या स्थानावर दावा सांगण्यासाठी एकमेकांविरुद्ध झुंजणार आहेत. रात्री ८.३० वाजल्यापासून हा सामना खलिफा आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळविला जाईल. क्रोएशियाचा अर्जेंटिनाकडून आणि मोरोक्कोचा फ्रान्सकडून उपांत्य सामन्यात पराभव झाला होता. 

क्रोएशिया संघ मागच्या विश्वचषकाचा उपविजेता आहे. यावेळी उपांत्य सामन्यात त्यांना अर्जेंटिनाने ३-० ने नमविले. मोरोक्को पहिल्यांदा उपांत्य सामना खेळला. आफ्रिकेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या संघाच्या खेळाची चर्चा जगातील चाहत्यांच्या ओठांवर आहे.  उपांत्यपूर्व सामन्यात पोर्तुगालचा स्वप्नभंग करीत त्यांनी उपांत्य फेरी गाठली होती.  तथापि गतविजेत्या फ्रान्सने त्यांची विजयी घोडदौड २-० ने रोखली.

आफ्रिकेतील संघांविरुद्ध क्रोएशियाचे रेकॉर्ड दमदार आहेत. याआधीच्या तीन विश्वचषकांत कोणत्याही आफ्रिका संघाला त्यांच्यावर गोल नोंदविता आलेला नव्हता.  २०१४ ला क्रोएशियाने कॅमेरूनचा ४-० ने आणि २०१८ ला नायजेरियाचा २-० ने पराभव केला. यंदा मोरोक्कोविरुद्ध त्यांची लढत अनिर्णित राहिली.विश्वचषकाच्या इतिहासात तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या १९ पैकी कोणताही सामना पेनल्टी शूटआउटपर्यंत गेलेला नाही.  या दरम्यान केवळ एकदा १९८६ ला फ्रान्स-बेल्जियम यांच्यात अतिरिक्त वेळेपर्यंत खेळ झाला होता. फिफा विश्वचषकात तिसऱ्या स्थानासाठी झालेल्या सामन्यात दहा वेळा युरोपियन संघांनी बाजी मारली. क्रोएशिया विश्वचषकात दुसऱ्यांदा तिसऱ्या स्थानासाठी खेळणार असून, १९९८ ला त्यांनी नेदरलँड्सचा २-१ ने पराभव केला होता.

साखळीतही भिडले दोन्ही संघक्रोएशिया आणि मोरोक्को विश्वचषकाच्या एकाच गटात होते. त्यांच्यात झालेला साखळी सामना अनिर्णित सुटला होता.  एफ गटात या दोन संघांशिवाय बेल्जियम तसेच कॅनडा यांचा समावेश होता.  मोरोक्कोने बेल्जियम आणि कॅनडावर मात करीत गटात अव्वल स्थान मिळविले होते.  क्रोएशियाचा बेल्जियमविरुद्धचा सामना अनिर्णित राहिला; तर कॅनडाला पराभूत करीत त्यांनी राउंड ऑफ १६ मध्ये स्थान मिळविले होते.

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२