शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्धव ठाकरे माझे शत्रू नाहीत, उद्या त्यांच्यावर संकट आलं तर..."; नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
सुषमा अंधारेंना नेण्यासाठी आलेले हेलिकॉप्टर क्रॅश, पायलट सुखरूप
3
रायगडात ठाकरे गटाच्या जिल्हाप्रमुखावर हल्ला; चालकाच्या प्रसंगावधान राखल्याने सारे बचावले
4
"कृष्ण आहेत रेवण्णा...",  प्रज्वल यांच्याबाबत काँग्रेस मंत्र्याचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाचा हल्लाबोल
5
KL Sharma : "स्मृती इराणींपेक्षा मला अमेठी जास्त माहीत"; तिकीट मिळताच केएल शर्मा यांनी स्पष्टच सांगितलं
6
Adani Enterprises ला SEBI नं पाठवली कारणे दाखवा नोटीस, हिंडेनबर्गच्या तपासाशी निगडीत प्रकरण 
7
श्रेष्ठींनी समज दिली, नाईकांची नाराजी मिटली; नरेश म्हस्केंचा अर्ज भरायला 'ते' सगळे येणार
8
Lok Sabha 2024 Rahul Gandhi :सस्पेन्स संपला! अखेर राहुल गांधींच्या नावाची घोषणा, पाहा कुठून लढणार लोकसभा, अमेठीत कोण?
9
Opening Bell: अमेरिकन जॉब डेटाच्या आकडेवारीमुळे बाजारात तेजी; Bajaj Financeच्या शेअरमध्ये वाढ, पॉवर ग्रिड घसरला
10
तनिष्क प्रस्तुत करत आहे 'ग्लॅमडेज' - रोज वापरण्याजोग्या दागिन्यांची श्रेणी 
11
सूर्य पश्चिमेला उगवेल मात्र उद्धव ठाकरे निर्णय बदलत नाहीत; जयंत पाटील थेट बोलले
12
Post Office ची 'ही' स्कीम बनवेल कोट्यधीश, वाचवावे लागतील ४१७ रुपये; जाणून घ्या माहिती
13
तुम्ही महाराष्ट्राचे वाघ तर आम्हीही सांगलीचे वाघ; ठाकरेंसमोरच विश्वजित कदम गरजले
14
भाजप v/s काँग्रेस; उद्धवसेना v/s शिंदेसेना; शरद पवार गट विरुद्ध शिंदेसेनेत एकही लढत नाही
15
आजचे राशीभविष्य - ३ मे २०२४; नोकरी करणाऱ्यांसाठी आजचा दिवस शुभ फलदायी
16
एकेकाळी मोबाइल फोन क्षेत्र गाजवलं, आता त्यांचं वर्कप्लेस अपग्रेड करणार Wipro; मिळाली मेगा डील!
17
पाकमधील हिंदू मुलींचे बळजबरी धर्मांतर रोखा; दानेशकुमार पलानी यांनी उठवला आवाज
18
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
19
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
20
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन

‘वीवो ला फ्रान्स’ : विजयानंतर रात्रभर जल्लोष

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 5:39 AM

बेल्जिअमला पराभूत केल्यानंतर फ्रान्सने विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर पॅरिसमध्ये पूर्ण रात्रभर जल्लोष करण्यात आला. ‘वीवो ला फ्रान्स’च्या घोषणा देत संघाचे चाहते आनंद व्यक्त करत होते.

पॅरिस : बेल्जिअमला पराभूत केल्यानंतर फ्रान्सने विश्वचषक अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. त्यानंतर पॅरिसमध्ये पूर्ण रात्रभर जल्लोष करण्यात आला. ‘वीवो ला फ्रान्स’च्या घोषणा देत संघाचे चाहते आनंद व्यक्त करत होते.पॅरिसवर काल रात्री फुटबॉलची नशा चढली होती. रशियात जेव्हा फ्रान्स विरुद्ध बेल्जिअम सामना सुरू होता. तेव्हाही पॅरिसमधील प्रसिद्ध स्मारक आर्क डे ट्रायोम्फेजवळ हजारोंच्या संख्येने चाहते गोळा झाले होते. २००६ नंतर पहिल्यांदाच फ्रान्सचा संघ अंतिम फेरीत पोहचला, त्यामुळे आनंद साजरा करण्यात आला.विजयानंतर पॅरिसमध्ये सामूहिक आनंदोत्सव साजरा करण्यात आला. अनेक लोक पथदिव्यांवरदेखील चढले होते. काहींच्या हातात फ्रान्सचा राष्ट्रध्वज होता. कॅफे आणि स्पोर्ट्स बारमध्ये जल्लोष सुरू होता. अनेक फुटबॉल चाहत्यांनी चेहऱ्यांवर राष्ट्रध्वजाचे रंग लावले होते. पॅरिसच्या ऐतिहासिक टाऊन हॉलजवळ मोठ्या स्क्रिनवर सामना पाहण्यासाठी २० हजार फुटबॉलप्रेमी गोळा झाले होते. रस्त्यावर लोक नाचत होते. फ्रान्समध्ये नोव्हेंबर २०१५च्या दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षेच्या कडक उपाययोजना करण्यात आल्या होत्या. टाऊन हॉलमध्ये जवळपास १२०० पोलीस तैनात करण्यात आले होते. (वृत्तसंस्था)डेश्चॅम्प करू शकतात विक्रमसेंट पिर्ट्सबर्ग : फ्रान्सने जर रविवारी विश्वचषक अंतिम सामन्यात विजय मिळवला तर प्रशिक्षक दिदियोर डेश्चॅम्प हे खेळाडू आणि प्रशिक्षक म्हणून विश्वचषक जिंकणारे जगातील तिसरे आणि फ्रान्सचे पहिलेच प्रशिक्षक बनतील. या आधी ही कामगिरी जर्मनीच्या फ्रेंज बॅकनबाऊर आणि ब्राझीलच्या मारियो जगालो यांनी केली आहे.डेश्चॅम्प १९९८ मध्ये फ्रान्सच्या विश्वचषक विजेत्या संघाचे कर्णधार होते. त्या सामन्यात फ्रान्सने ब्राझीलला ३ -० ने पराभूत केले होते. डेश्चॅम्प यांच्या नेतृत्वात खेळणाºया झिदानने दोन, तर पेटीट याने अतिरिक्त वेळेत गोल नोंदवला होता. डिफेन्सिव्ह मिडफिल्डर म्हणून खेळणाºया डेश्चॅम्प यांनी बचाव फळी सांभाळत ब्राझीलच्या संघाला गोल करण्यात यश मिळू दिले नव्हते. प्रशिक्षक म्हणून त्यांनी फ्रान्सला विश्वचषक २०१८ च्या अंतिम फेरीत पोहचवले आहे. तर युरो २०१६ च्या अंतिम फेरीतही पोहचवले आहे.1998 साली फ्रान्सने आपल्याच यजमानपदाखाली झालेल्या विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बलाढ्य ब्राझीलला धक्का देत जगज्जेतेपद पटकावले होते.2006 साली फ्रान्सने दुसºयांदा विश्वचषकाची अंतिम फेरी गाठली. मात्र, त्यावेळी त्यांना जर्मनीविरुद्ध पराभूत व्हावे लागल्याने उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले होते.किएरन ट्रिपिएर याने पाचव्याच मिनिटाला नोंदवलेल्या शानदार गोलच्या जोरावर इंग्लंडने विश्वचषक फुटबॉल स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात क्रोएशियाविरुद्ध १-० अशी आघाडी घेतली. लुझनिकी स्टेडियमवर दोन्ही संघांनी सावध सुरुवात करत एकमेकांचा अंदाज घेतला.या महत्त्वपूर्ण सामन्यात इंग्लंडने संघात कोणतेही बदल केले नाही. स्वीडन आणि कोलंबियाविरुद्ध विजयी कामगिरी केलेला संघच क्रोएशियाविरुद्ध खेळविण्यात आला. क्रोएशियाचा कर्णधार लुका मॉडरिचकडून अडथळा झाल्यामुळे ट्रिपिएर पडला आणि रेफ्रीने इंग्लंडला फ्री किक दिली.पाचव्याच मिनिटाला मिळालेली ही संधी साधताना ट्रिपिएरने चेंडू थेट गोलजाळ्यात मारला आणि इंग्लंडला १-० अशी आघाडी मिळवून दिली. यानंतर क्रोएशियाने पुनरागमनाचे प्रयत्न करताना आक्रमक चाली रचल्या, पण इंग्लंडचा बचाव भेदण्यात त्यांना यश आले नाही.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८newsबातम्या