शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वेगाचा राजा उसैन बोल्ट उतरणार फुटबॉलच्या मैदानात, 'मॅन्चेस्टर युनायटेड'कडून खेळणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 13:08 IST

मॅन्चेस्टर युनायटेडने उसैन बोल्टसोबत करार केला आहे, स्पेनचा फुटबॉल क्लब बार्सिलोना विरोधात होणा-यासामन्यात बोल्ट करणार पदार्पण

ठळक मुद्देवेगाचा राजा अशी ओळख मिळवलेल्या उसैन बोल्टच्या कारकीर्दीची वेदनादायी अखेर झाली असली तरी बोल्ट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार यावेळी तो धावण्याच्या शर्यतीत नाही तर फुटबॉलच्या मैदानात उतरणार स्पेनचा फुटबॉल क्लब बार्सिलोना विरोधात एका चॅरिटी मॅचमध्ये खेळण्यासाठी मॅन्चेस्टर युनायटेडने बोल्टसोबत करार केला या सामन्यात लियोनेल मेसी आणि लुईस सुआरेझ यांच्यासारखे खेळाडूही खेळण्याची शक्यता

जमैका, दि. 17 - वेगाचा राजा अशी ओळख मिळवलेल्या उसैन बोल्टच्या कारकीर्दीची वेदनादायी अखेर झाली असली तरी बोल्ट पुन्हा एकदा प्रेक्षकांसमोर येणार आहे. यावेळी तो धावण्याच्या शर्यतीत नाही तर फुटबॉलच्या मैदानात उतरणार आहे. इंग्लिश फुटबॉल क्लब मॅन्चेस्टर युनायटेडसाठी खेळावं हे बोल्टचं अपूर्ण स्वप्न होतं. मात्र, आता अॅथलेटिक्सला निरोप दिल्यानंतर आपलं स्वप्न पूर्ण करण्याची संधी त्याच्याकडे चालून आली आहे. त्यामुळे लवकरच बोल्टचं हे स्वप्न पूर्ण होणार आहे.  

स्पेनचा फुटबॉल क्लब बार्सिलोना विरोधात एका चॅरिटी मॅचमध्ये खेळण्यासाठी मॅन्चेस्टर युनायटेडने बोल्टसोबत करार केला आहे. या क्षणाची मी अनेक वर्षांपासून वाट पाहात होतो. लवकरच दुखापतीतून सावरून या सामन्यासाठी तयारी सुरू करेन असं बोल्ट म्हणाला. या सामन्यात लियोनेल मेसी आणि लुईस सुआरेझ यांच्यासारखे खेळाडूही खेळण्याची शक्यता आहे. तसेच बोल्टसोबत रेयान गिग्स आणि पॉल सकॉलेस यांसारखे दिग्गज खेळाडूही असणार आहेत.  

2 सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे. या सामन्यासाठी जर्मनीच्या बोरुसिया डोरमुन्ड या क्लबसोबत बोल्ट ट्रेनिंग करेल. याबाबत बोलताना बोल्ट म्हणाला, मला फुटबल खेळण्याची इच्छा आहे, हे एक असं क्षेत्र आहे जेथे मी यशस्वी होऊ शकतो. 

वेगाचा बादशहा उसेन बोल्टला दु:खदायक निरोप-ज्या ट्रॅकवर गेली अनेक वर्षे अधिराज्य गाजवले, त्याच ट्रॅकवर दुर्दैवीपणे कोसळणा-या उसेन बोल्टसाठी त्याचा निरोप मात्र दु:खदायक राहिला. उपस्थित चाहत्यांना जणू ‘वेग’ थांबल्याची अनुभूती आली. १०० मीटर धावण्याच्या शर्यतीतील अशक्यप्राय असे विक्रम नोंदवणाºया बोल्टने आपल्या कारकिर्दीला विराम दिला. ४ बाय १०० मीटर रिलेमध्ये तो सुवर्णपदकासाठी धावत होता. धावता धावता अचानक खाली कोसळला. हा क्षण सर्वांनाचा भावुक करणारा होता. बोल्टच्या कारकिर्दीचा असा शेवट होईल, असे कधीही वाटले नव्हते आणि म्हणूनच त्यालाही आपले अश्रू आवरता आले नाहीत.खाली पडला तेव्हा..बोल्टला शेवटच्या लॅपमध्ये धावावे लागणार होते. जमैकाच्या तीन धावपटूंनी ३०० मीटर अंतर कापत आपले काम पूर्ण केले होते. मात्र, अंतिम लॅपमध्ये काही अंतर कापताच बोल्ट दुखापतग्रस्त झाला आणि खाली पडला. मांसपेशी ताणल्यामुळे बोल्टचे शेवटची शर्यत जिंकण्याचे स्वप्न भंगले. या स्पर्धेचे सुवर्णपदक यजमान ग्रेट ब्रिटनच्या टीमने पटकाविले. अमेरिका संघाने रौप्य तर जपानच्या संघाने कांस्यपदक पटकाविले.शर्यतीला झालेला उशीर महागात पडला : ब्लॅकजमैकन धावपटूंच्या संघातील एक सदस्य असलेल्या योहान ब्लॅकने शर्यतीला झालेला उशीर आपणास महाग पडल्याची प्रतिक्रिया दिली. त्याने नाराजी व्यक्त करीत आयोजकांना लक्ष्य केले. बोल्टची दुखापतही यालाच कारणीभूत असून त्याच्या कारकिर्दीचा निराशाजनक शेवट झाल्याने आम्हाला दु:ख झाल्याचे त्याने सांगितले. तो म्हणाला, की येथील वातावरण खूप थंड होते. अशातच शर्यतीसाठी वाट पाहावी लागली होती. शनिवारी होणारी अंतिम शर्यत ही पुरुषांची ५,००० मीटर आणि महिलांची उंच उडी या पदक समारोहानंतर सुरू झाली. वेळेवर सुरू झाली असती तर त्याचा फटका आम्हाला बसला नसता. आमच्यासोबत चांगली वागणूक झाली नाही, असा ठपका त्याने ठेवला आहे.साथीदारही रडले...बोल्ट खाली पडताच स्टेडियमवर सन्नाटा पसरला. उपस्थित चाहते अत्यंत भावुक होऊन एकमेकांकडे आश्चर्याने बघत होते. या शर्यतीनंतर बोल्टचे साथी खेळाडू अश्रूंना रोखू शकले नाहीत. बोल्टच्या साथीदारांचा पराभव आणि बोल्टच्या निवृत्तीचे दु:ख स्पष्ट दिसत होते.ट्रॅकवर असा एकही विक्रम नसेल जो बोल्टने मोडला नसेल. सर्वच कीर्तिमान त्याने आपल्या नावे केले. कदाचित, त्याची जागा दुसºया खेळाडूला घेणे शक्यही नसेल. सलग तीन आॅलिम्पिकमध्ये तिन्ही प्रकारांत सुवर्णपदक पटकाविणारा हा ‘ब्लॅक गोल्ड’ माणूस अनेकांच्या स्मरणात राहील.त्याने आठ वेळा ऑलिम्पिक सुवर्णपदक पटकाविले आहे. 11 जागतिक सुवर्णांचाही समावेश त्याच्या अलमारीत आहे. या महान खेळाडूला 2008, 2009, 2011, 2012, 2013 आणि 2016 मध्ये ‘वर्ल्ड अ‍ॅथलिट ऑफ द इयर’ हा पुरस्कार मिळाला आहे.

आणखी वाचा- (बोल्ट आणि ब्रॅडमन यांच्या शेवटच्या सामन्यातील दुर्दैवी योगायोग...)