शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
3
पाकिस्तानने अणुबॉम्ब फोडला, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
4
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
5
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
6
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
7
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
8
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
9
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
10
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
11
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
12
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
13
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
14
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
15
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
16
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...
17
टिंडरवरची गर्लफ्रेंड महागात पडली! तोंडओळखीतच इंजिनियर तरुण लट्टू झाला अन् कंगाल होऊन बसला! 
18
"मी ऐकलंय की मराठी अभिनेत्रीसोबत त्याचं अफेअर...", गोविंदाबद्दल पत्नी सुनीता आहुजाचा खुलासा
19
₹३४,००० पगार असेल तर ८ व्या वेतन आयोगानंतर किती होईल? जाणून घ्या कॅलक्युलेशन

India Vs Pakistan : भारताच्या मुलींचा पाकिस्तानला इंगा, फुटबॉल सामन्यात केला पराभव

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2018 14:59 IST

U16 Women's Championship :भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील क्रिकेट सामना पुढील दोन तासांत सुरू होणार आहे. मात्र, त्या लढतीपूर्वी भारताच्या मुलींनी पाकिस्तान संघाला इंगा दाखवला आहे.

मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील आशिया चषक स्पर्धेतील क्रिकेट सामना पुढील दोन तासांत सुरू होणार आहे. मात्र, त्या लढतीपूर्वी भारताच्या मुलींनी पाकिस्तान संघाला इंगा दाखवला आहे. एएफसी 16 वर्षांखालील महिला चॅम्पियन्सशीप पात्रता फुटबॉल स्पर्धेत भारतीय संघाने 4-0 अशा फरकाने पाकिस्तान संघाचा धुव्वा उडवला. सलग दुसऱ्या विजयासह भारतीय संघ ( 6 गुण) ब गटात अव्वल स्थानावर आहे. ब गटातील लढतीत भारतीय मुलींनी सुरूवातीलाच सामन्यावर पकड घेतली होती. 22व्या मिनिटाला अविका सिंगने भारताला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. त्यात पाकिस्तानच्या आयेशाने स्वयंगोल करत (41 मि.) भर घातली. दुसऱ्या सत्रात पाकिस्तानकडून चुरशीचा खेळ झाला, परंतु भारतीय संघाने आघाडी कायम राखली होती. शेवटच्या दहा मिनिटांत भारतीय खेळाडूंनी आणखी दोन गोलची भर घातली. सुनिता मुंडा ( 82 मि.) आणि शिल्की देवी ( 88 मि.) यांनी प्रत्येकी एक गोल केला.भारताने पहिल्या सामन्यात हाँगकाँगचा 6-1 असा धुव्वा उडवला होता. या लढतीत कोमने तीन गोल केले होते, तर देवीने दोन आणि मुंडाने एक गोल केला होता. '' पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात आम्हाला आणखी गोलची अपेक्षा होती, परंतु या निकालावरही आम्ही समाधानी आहोत. आम्हाला मंगोलिया व लाओस संघांचा सामना करायचा आहे. त्यात विजय मिळवण्याचा आमचा प्रयत्न आहे,''असे अविका सिंगने सांगितले. 

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारत