शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ला: पाकिस्तानबद्दल आता भूमिका काय? अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने थेट उत्तर देणं टाळलं
2
OLA चे ७५ शोरूम बंद, अजून १२१ बंद करण्याच्या सूचना; RTO ची धडक कारवाई, कारण काय?
3
घर-कार खरेदी करणं झालं स्वस्त; २ मोठ्या सरकारी बँकांनी व्याजदर केले कमी, तुम्हीही आहात का ग्राहक?
4
सीमेपलीकडील सूत्रधार अन् दहशतवाद्यांचे दोन गुप्त संवाद गुप्तचर यंत्रणांनी पकडले
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांसाठी NSE चा पुढाकार, १ कोटींची मदत करणार
6
LoCवर संघर्षाचा भडका! पाकिस्तानी सैन्याकडून रात्रभर गोळीबार, भारतीय लष्कराकडून चोख प्रत्युत्तर
7
पुण्यातील बंडगार्डन, कोंढवा, लष्कर आणि कोरेगाव पार्क परिसरात १११ 'पाकिस्तानी' वास्तव्यास
8
सज्ज राहा...सीमेवर पाकसोबत संपूर्ण युद्ध नव्हे, तर कारगिलसारखे लहान युद्ध होऊ शकते
9
Today Horoscope: आज आर्थिक लाभ होतील, मैत्रिणी भेटतील; तुमची राशी काय सांगतेय?
10
उरलेसुरले अस्तित्वही पूर्णपणे उद्ध्वस्त करण्याची हीच ती वेळ; PM नरेंद्र मोदींचा निर्धार
11
भारत-पाक यांच्यात संघर्ष वाढणार; सिंधू जल अन् सिमला करार स्थगित केल्याने काय होईल?
12
एक घाव अन् दोन तुकडेच! भारताला फक्त प्रतिकारात्मक नव्हे, तर प्रतिबंधात्मक पावले उचलावी लागतील
13
आम्ही कायम तुमच्यासोबत... दहशत झुगारून काश्मिरात देशभरातून पर्यटकांचा ओघ कायम! 
14
आम्ही कपाळाच्या टिकल्या काढल्या, तरी मारले...; गनबोटे यांच्या पत्नी संगीता यांची आपबीती
15
‘राग’ येऊ द्या, पण आपल्याच पायावर कुऱ्हाड मारू नका; पर्यटनस्थळी जागता पाहारा का नाही?
16
तोल गेला, आईच्या हातातून निसटले बाळ; २१ व्या मजल्यावरून पडून बाळाचा मृत्यू
17
Pahalgam Attack: ‘मिनी स्वित्झर्लंड’ला इतकी मोठी गर्दी असताना एकही लष्करी जवान नव्हता
18
महाराष्ट्राची भाग्यरेषा उजळणार, ‘समृद्धी’चा अंतिम टप्पा लोकार्पणाच्या उंबरठ्यावर
19
‘आई’वर कुरघोडी करू पाहणाऱ्या ‘मावशी’चा राग; हिंदी सक्तीचा परस्पर GR काढला कुणी?
20
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस

टू मच क्रिकेट इन इंडिया...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2018 05:40 IST

राष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केमलिनच्या रेड स्क्वेअरमध्ये एका दिमाखदार सोहळ्यामध्ये केलेले विश्वचषक २०१८चे उद्घाटन आणि त्यांच्या संघाने तितकाच शानदार विजय मिळविल्याने रशियामध्ये आनंदाची - चैतन्याची लाट पसरणे स्वाभाविक आहे. कोणत्याही युद्धात पहिली चकमक जिंकणे महत्त्वाचे!

- रणजीत दळवीराष्ट्राध्यक्ष पुतिन यांनी केमलिनच्या रेड स्क्वेअरमध्ये एका दिमाखदार सोहळ्यामध्ये केलेले विश्वचषक २०१८चे उद्घाटन आणि त्यांच्या संघाने तितकाच शानदार विजय मिळविल्याने रशियामध्ये आनंदाची - चैतन्याची लाट पसरणे स्वाभाविक आहे. कोणत्याही युद्धात पहिली चकमक जिंकणे महत्त्वाचे! सौदी अरेबियाने सपशेल शरणागती पत्करली, म्हणून रशियाचा विजय कमी लेखता येणार नाही. तसा तो त्यांच्या घोडदौडीची नांदी असेही म्हणता येणार नाही. कारण आता त्यांना पुढची फेरी गाठण्यासाठी उरुग्वे आणि इजिप्तशी संघर्ष करावाच लागणार आहे.दोन वर्षे आंतरराष्ट्रीय फूटबॉलपासून दूर आणि तीन वर्षांतला हा पहिलाच विजय रशियाचा आत्मविश्वास वाढविणार हे नक्की. आपली ताकद किती याचा पूर्णपणे नसला, तरी काहीसा अंदाज प्रशिक्षक स्टॅनिसलास चेसचेसोव यांना आला. बदली खेळाडू चेरयीशेव आणि झ्युबा यांनी केलेले गोल त्यांना दिलासा देऊन गेले असतील. आपल्या फौजफाट्यातले सर्व शिलेदार सज्ज पाहून, त्यांना पुढच्या चकमकींमध्ये कसे आणि कोठे लढवायचे, याचाही पक्का अंदाज आला असणार.पहिली चकमक म्हणजे डोकेदुखी, प्रचंड दबाव. संभाव्य विजेते स्पेनसाठी, तर गेले दोन-चार दिवस प्रचंड ताणतणावाचे गेले. प्रशिक्षक हुलेन लोपेतेगुई यांची हकालपट्टी त्यांच्या संघाला कितीशी मारक ठरते, हे पोर्तुगालविरुद्ध होणाऱ्या पहिल्या लढतीदरम्यान समजेल. नवे प्रशिक्षक फर्नांडो हिएरोंपुढे मोठे आव्हान आहे, पण ९० सामन्यांत स्पेनसाठी २९ गोल करणाºया हिएरोंकडे प्रचंड अनुभव आहे. कर्णधार सर्गिओ रामोस हा हिएरोंसारखा मोठा बचावपटू. हिएरो चार विश्वचषक खेळले, त्यामुळे या दोघांचे ‘ट्युनिंग’ होईल, असे वाटते. दुसरीकडे, पोर्तुगालकडे रोनाल्डो आहे, पण युरोविजेत्यांचा संघ स्पेनएवढा समतोल व तुल्यबळ निश्चित नाही. ही महत्त्वाची लढत दोन्ही संघ कसे खेळतात, याची उत्सुकता सर्वांनाच आहे.स्पेनला जसा धक्का बसला, तसा मोरोक्कोलाही बसला. त्यांची २०२६च्या विश्वस्पर्धेच्या यजमानपदाच्या शर्यतीत हार झाली. त्यांची पहिली लढत इराणविरुद्ध झाली. मोरोक्को हे फूटबॉलमधील मोठे प्रस्थ नाही, पण त्यांनी जगाला सैद आॅइता आणि हिकम एल गेरुस यांसारखे आॅलिम्पिक, विश्वविजेते आणि विश्वविक्रमवीर दिले. त्यांचा एक चाहता, युसेफ इब्न खालदून याच्याशी क्रेमलिनमध्ये बातचीत केली. आपला संघ एखाद्या बड्या संघाला म्हणजे स्पेन-पोर्तुगालला चकित करेल, असा आशावाद त्याच्यापाशी दिसला. बोलण्याच्या ओघात त्याने विचारले, ‘तुम्ही फूटबॉलमध्ये मागे का पडला?’ त्याला म्हटले, ‘कशामुळे हे तू सांगशील?’ तो झटकन म्हणाला, ‘टू मच क्रिकेट! टू मच मनी देअर!’ अगदी थोडक्यात तो वास्तव सांगून गेला. माझा भारत विश्वचषकात नाही, याचे शल्य त्या परक्यालाही वाटत होते.

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलCricketक्रिकेटIndiaभारत