शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

असंख्य गरीब व होतकरू मुलांना घडविणारे फुटबॉल कार्यकर्ते सुरेंद्र करकेरा यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2023 18:47 IST

फुटबॉलचे नि:स्वार्थी आणि सच्चे कार्यकर्ते सुरेंद्र करकेरा यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी निधन झाले

मुंबई : असंख्य गरीब आणि होतकरू खेळाडूंना बिपीन फुटबॉल अकादमीच्या माध्यमातून तळमळीने फुटबॉलचे प्रशिक्षण मिळावे म्हणून धडपडणारे फुटबॉलचे नि:स्वार्थी आणि सच्चे कार्यकर्ते सुरेंद्र करकेरा यांचे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने आज सकाळी निधन झाले. ते ७१ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा आणि सून असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे मुंबई फुटबॉल जगताला जबर मानसिक धक्का बसला आहे.

गरीब-गरजू मुलांना फुटबॉलचे प्रशिक्षण देण्यासाठी धडपडणाऱ्या तसेच बिपीन पुटबॉल अकादमीच्या माध्यमातून गेली ३४  वर्षे सातत्याने आंतरकेंद्र फुटबॉल स्पर्धांचे आयोजन करणाऱ्या करकेरांबद्दल आंतरराष्ट्रीय फुटबॉलपटूंपासून सामान्य कार्यकर्त्यांपर्यंत साऱ्यांच्याच मनात आदराची भावना होती. करकेरा यांनी गेल्या चार दशकांत सामान्य फुटबॉलपटूंसाठी  आपले आयुष्य वेचले. खिशात पैसा नसतानाही ते स्वतःच्या खिशातून केवळ पैसाच काढायचे नाही तर फुटबॉलच्या दात्यांकडून, सामाजिक आणि कॉर्पोरेट कंपन्यांकडे झोळी पसरायचे.

फुटबॉलची नि:स्वार्थ सेवा करणाऱ्या या कार्यकर्त्याने आपल्या उभ्या आयुष्यात अनेक गरीब-गरजूंना हात पकडून फुटबॉलचे प्रशिक्षण दिले. त्यांना शिक्षण घेता यावं म्हणून रात्रशाळेत त्यांना दाखल केले. त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटावा म्हणून अनेकांना हॉटेल-कंपन्यांमध्ये नोकरीला लावले. यातून त्यांनी अनेक फुटबॉलपटू घडवले. फुटबॉलची सेवा केल्याबद्दल सुरेंद्र करकेरा यांचा नुकताच मुंबई जिल्हा फुटबॉल संघटनेने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

मुलाच्या स्मरणार्थ फुटबॉल प्रशिक्षणाचे आयोजनआपला मुलगा बिपीन करकेराला रोव्हर्स कपचा सामना पहायचा होता, पण तो सामना दाखवण्याआधी त्याचे अपघातात निधन झाले. बिपीनच्या निधनाचा करकेरांना खूप मोठा मानसिक धक्का बसला होता. आपण मुलाची इच्छा पूर्ण करू शकलो नाही, त्याचं प्रायश्चित म्हणून त्यांनी बिपीन मेमोरियल फुटबॉल स्पर्धा सुरू केली. या स्पर्धेनिमित्त ते पूर्ण मुंबई आणि आसपासच्या उपनगरात तज्ञ फुटबॉल प्रशिक्षकांच्या माध्यमातून प्रशिक्षणाचे केंद्र तयार करायचे आणि प्रत्येक केंद्रात खेळाडूंना फुटबॉलचे प्रशिक्षण दिले जायचे. तसेच प्रत्येक केंद्राचा एक संघ तयार करून त्यांची फुटबॉल स्पर्धा आयोजित करायचे.  

टॅग्स :FootballफुटबॉलMumbaiमुंबई