शहरं
Join us  
Trending Stories
1
कुणाची किती ताकद हे कळू द्या, एकटे लढून दाखवा; भाजपाचा स्वबळाचा नारा, शिंदेसेनेला आव्हान?
2
बाराबंकीच्या अवसानेश्वर महादेव मंदिरात चेंगराचेंगरी; दोघांचा मृत्यू, ४० जण जखमी
3
"योगीजी, या लोकांना सोडू नका"; कॉन्स्टेबलच्या पत्नीचा सासरच्यांकडून अमानुष छळ, संपवलं जीवन
4
बिग ब्रेकिंग! TCS कंपनी १२ हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना नोकरीवरून काढणार; कुटुंबावर मोठं संकट
5
शत्रूसाठी कोणतेच स्थान सुरक्षित नाही हे ‘ऑपरेशन सिंदूर’ने सिद्ध केले: पंतप्रधान नरेंद्र मोदी
6
ठाकरे बंधू पुन्हा भेटले, मनसे-उद्धवसेना युती चर्चांना उधाण; पक्षप्रवेशाचे इनकमिंग थंडावले
7
आजचे राशीभविष्य २८ जुलै २०२५ : प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल
8
राज ठाकरे 'मातोश्री'वर, पुन्हा मनोमिलनाची चर्चा; दोन्ही भावांची गळाभेट, वीस मिनिटे संवाद
9
वरळीतील  कार्यक्रमात अमित ठाकरे हजर; आदित्य ठाकरेंची पाठ, ज्युनियर ठाकरे एकत्र यायचा योग नाही
10
गोंधळानंतर संसदेत आजपासून पुन्हा चर्चा तापणार; ‘ऑपरेशन सिंदूर’वर सत्ताधारी-विरोधक आमने-सामने
11
महाराष्ट्रातील खासदारांना संसदरत्न; संसदीय कामकाज मंत्री किरीन रिजीजू यांच्या हस्ते पुरस्कार
12
पुण्यातील रेव्ह पार्टीवर कारवाई; एकनाथ खडसेंच्या जावयासह ७ अटकेत, दोन महिलांना रंगेहाथ पकडले
13
वीजप्रवाह उतरल्याच्या अफवेमुळे पळापळ; हरिद्वारच्या मनसा देवी मंदिरात चेंगराचेंगरी
14
११व्या शतकातील शिवमंदिरावरून उफाळला थायलंड-कंबोडिया संघर्ष; नेमके प्रकरण काय, वाद का वाढला?
15
थायलंड-कंबोडिया अखेर शस्त्रसंधीसाठी तयार; ट्रम्प यांची मध्यस्थी, सीमेवर अद्यापही तणाव कायम
16
अमेरिकेत बोइंग विमानाला आग, १७३ प्रवासी बालंबाल बचावले; लँडिंग गीअर बिघडले, उड्डाण रोखले
17
“रोख व्यवहार हा कायदेशीर वसूलपात्र कर्ज नाही”; केरळ हायकोर्टाचे निरीक्षण, प्रकरण काय?
18
खड्ड्यावरील दंडाला गणेश मंडळांचा विरोध; लहान मूर्तींनाही परवानगी देण्याची बैठकीत मागणी
19
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
20
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!

स्पेन,स्वीडन उपांत्य फेरीत, महिला विश्वचषक फुटबाॅल : नेदरलँड, जपानला धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2023 05:49 IST

युरोपातील दोन बलाढ्य संघांमधील सामन्यात पॅरालुएलोने १११ व्या मिनिटाला विजयी गोल केला.

वेलिंग्टन/ऑकलंड : सलमा पॅरालुएलो हिने अतिरिक्त वेळेत केलेल्या गोलच्या जोरावर जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावरील स्पेनने गत उपविजेत्या नेदरलँडला २-१ असे नमवत महिला विश्वचषक फुटबाॅल स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. दुसरीकडे, स्वीडनने जपानचे आव्हान २-१ असे परतावले.

युरोपातील दोन बलाढ्य संघांमधील सामन्यात पॅरालुएलोने १११ व्या मिनिटाला विजयी गोल केला. नेदरलँड्सचा चार वर्षांपूर्वी फ्रान्समध्ये अंतिम लढतीत अमेरिकेविरुद्ध पराभव झाला होता.

मारियोना कालडेंटीने ८१ व्या मिनिटाला गोल करत स्पेनला १-० असे आघाडीवर नेले. अखेरच्या दहा मिनिटांत नेदरलँडची बचावपटू स्टेफानी वान डर ग्राग्टने संघाला बरोबरी साधून दिली. तिच्या हाताला चेंडू लागल्याने स्पेनला ८१ व्या मिनिटाला पेनल्टी मिळाली होती. त्यावर मारियोनाने गोल केला. त्यानंतर पॅरालुएलोने विजयी गोल केला. अलमांडा इलेस्टेडने ३२व्या मिनिटाला गोल करत स्वीडनला आघाडीवर नेले. यानंतर फिलिपा एंजेल्डालने ५१व्या मिनिटाला पेनल्टी किकवर गोल करत संघाची आघाडी २-० अशी भक्कम केली. जपानकडून होनाका हयाशीने ८७व्या मिनिटाला गोल केला.

टॅग्स :Footballफुटबॉल