शहरं
Join us  
Trending Stories
1
आधी सिंधू करार मोडला, आता पाकिस्तानच्या वरिष्ठ राजदूताला बोलावले, आणखी एक मोठी कारवाई
2
भाच्यासोबतच अनैतिक संबंध अन् पतीची हत्या, दोन तुकडे करून मृतदेह ट्रॉली बॅगमध्ये टाकला; पण...
3
सिंधू पाणी करार मोडल्याने पाकिस्तानचं टेन्शन वाढलं! भारताला जोरदार प्रत्युत्तर देण्याच्या तयारीत
4
'माझ्या मुलाला कसं सांगू की त्याचे वडील आता परत येणार नाहीत', महिलेने विमानतळावर पोहोचताच फोडला टाहो
5
धर्म विचारून गोळी झाडण्याची ही काही पहिलीच वेळ नाही; याआधी कधी घडली होती घटना?
6
ना अदानी, ना अंबानी; 'या' भारतीय अब्जाधीशानं आतापर्यंत केली सर्वाधिक कमाई
7
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
8
Ather Energy चा IPO येणार, निश्चित झाला प्राईज बँड; 'या' तारखेपासून करता येणार गुंतवणूक, पाहा डिटेल्स
9
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
10
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
11
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
12
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
13
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
14
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
15
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
16
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
17
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
18
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
19
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
20
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली

INDvsPAK : सुनील छेत्रीने पाकिस्तानला धुतले; रोनाल्डो, मेस्सीशी बरोबरी, शेजारी भांडायला लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2023 21:39 IST

भारतीय संघाने SAFF चॅम्पियनशीपच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुतले.

भारतीय संघाने SAFF चॅम्पियनशीपच्या पहिल्याच सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानला धुतले. भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने ( Sunil Chhetri ) हॅटट्रिक नोंदवून पाकिस्तानला एकहाती धुतले. उदांता सिंगने निर्धारीत वेळेत आणखी एक गोल करून भारताचा ४-० असा दणदणीत विजय निश्चित केला. दरम्यान, या सामन्यात पाकिस्तानी खेळाडू अन् भारतीय खेळाडूंमध्ये वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले.

सॅफ स्पर्धा खेळण्यासाठी भारतात उशीराने दाखल झालेल्या पाकिस्तानकडून फार अपेक्षा नव्हतीच.. १०व्या मिनिटाला गोलरक्षकाकडून चूक झाली अन् सुनील छेत्रीने गोल करून भारताला आघाडी मिळवून दिली. त्यानंतर १६व्या मिनिटांला भारताला पेनल्टी मिळाली आणि छेत्रीने गोल करून आघाडी दुप्पट केली. पाकिस्तानकडून प्रयत्न होताना दिसले, परंतु भारताचा बचाव भेदणे त्यांच्यासाठी नाकी नऊ ठरले... पहिल्या हाफच्या भरपाई वेळेत भारतीय कोच इगोर स्टीमॅक यांनी पाकिस्तानच्या खेळाडूला थ्रो ईन घेण्यापासून रोखले अन् खेळाडू भडकले. भारतीय खेळाडू व त्यांच्यात वाद झाल्याचे सर्वांनी पाहिले. रेफरींनी स्टीमॅक यांना रेड कार्ड दाखवून मैदानाबाहेर जाण्यास सांगितले. पण, समोर आलेल्या व्हिडीओनुसार पाकिस्तानी खेळाडूची चूक होती.  दुसऱ्या हाफमध्ये छेत्रीने पेनल्टीवर आणखी एक गोल करून हॅटट्रिक पूर्ण केली. आंतरराष्ट्रीय कारकीर्दितील हा त्याचा ९०वा गोल ठरला आणि तो सध्या खेळत असलेल्या ख्रिस्तियानो रोनाल्डोलिओनेल मेस्सी यांच्या मागे आहे. आतापर्यंत केवळ चार खेलाडूंना आंतरराष्ट्रीय कारकीर्दित ९०+ गोल करता आले आहेत आणि त्यामधील एक छेत्री आहे. उदांता सिंगने भरपाई वेळेत गोल करून भारताचा विजय पक्का केला.  

सर्वाधिक गोलख्रिस्तियानो रोनाल्डो १२३अली दाईए १०९लिओनेल मेस्सी १०३सुनील छेत्री ९०  

टॅग्स :India vs Pakistanभारत विरुद्ध पाकिस्तानSunil Chhetriसुनील छेत्रीCristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डोLionel Messiलिओनेल मेस्सी