शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
4
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
5
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
6
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
7
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
8
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
9
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
10
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
11
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
12
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
13
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
14
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
15
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
16
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
17
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
18
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
19
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
20
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
Daily Top 2Weekly Top 5

आईशप्पथ! सचिन तेंडुलकरचा इंग्लंडला 'फुल सपोर्ट'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2018 12:36 IST

इंग्लंडला पाठिंबा देण्यासाठी सचिनचं ट्विट

मुंबई: मास्टरब्लास्टर सचिन तेंडुलकर इंग्लंडला पाठिंबा देत असेल, तर तुम्हाला कसं वाटेल? सचिननं एक ट्विट करुन आपला पाठिंबा इंग्लंडला असल्याचं जाहीर केलं आहे. भारत आणि इंग्लंडच्या संघांमध्ये एकदिवसीय मालिका सुरू होत असताना सचिन इंग्लंडला कसा काय पाठिंबा देऊ शकतो, असा प्रश्न तुम्हाला पडू शकतो. मात्र सचिनचं ट्विट हे क्रिकेटबद्दल नाही, तर फुटबॉलबद्दल आहे. फिफा विश्वचषकाच्या उपांत्य फेरीतील दुसरा सामना आज होणार आहे. या सामन्यात इंग्लंडसमोर क्रोएशियाचं आव्हान असेल. या सामन्याआधी सचिननं एक व्हिडीओ ट्विट केला आहे. आपण इंग्लंडला पाठिंबा देत असल्याचं यामध्ये सचिननं म्हटलं आहे. या ट्विटमध्ये त्यानं इंग्लंडचा माजी गोलरक्षक डेव्हिड जेम्सला टॅग केलं आहे. या व्हिडिओत सुरुवातीला सचिनच्या हातात क्रिकेटचा बॉल दिसतो. 'यावेळी मी इंग्लंडला पाठिंबा देत आहे,' असं सचिननं व्हिडीओच्या सुरुवातीला म्हटलं आहे. त्यानंतर सचिननं एक छोटा पॉज घेत फुटबॉलला किक मारत 'फुटबॉलमध्ये' असं म्हणत वाक्य पूर्ण केलं. त्यामुळे आज होणाऱ्या सामन्यात सचिन इंग्लंडच्या बाजूनं असेल.

इंग्लंडच्या संघाला 1990 पासून फिफा विश्वचषक पटकावता आलेला नाही. त्यामुळे हॅरी केन आणि कंपनीसमोर विश्वविजेतेपद पटकावण्यासाठी चांगला खेळ करण्याचं मोठं दडपण असेल. स्वीडनचा 2-0 नं पराभव करत इंग्लंडनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. क्रोएशियानं बलाढ्य अर्जेंटिनाला पराभूत करत उपांत्य फेरी गाठली आहे. इंग्लंडनं आजचा सामना जिंकल्यास अंतिम फेरीत त्यांची लढत फ्रान्सविरुद्ध होईल. फ्रान्सनं बेल्जियमला धूळ चारत अंतिम फेरीचं तिकीट मिळवलं आहे. 

 

टॅग्स :Sachin Tendulkarसचिन तेंडूलकरCricketक्रिकेटFootballफुटबॉलEnglandइंग्लंडFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८