शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

पॉर्नला फुटबॉलची 'किक'; विश्वचषकादरम्यान आंबटशौकिनांचा पॉर्न साइट्सना 'कॉर्नर'

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 12:17 IST

फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेदरम्यान पॉर्न साइट्स पाहणा-या आंबटशौकिनांच्या संख्येत घट झाल्याचा अहवाल समोर आला आहे.

मुंबई - फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेदरम्यान पॉर्न साइट्स पाहणा-या आंबटशौकिनांच्या संख्येत घट झाल्याचा अहवाल समोर आला आहे. रशियात झालेल्या या स्पर्धेत फ्रान्सने अंतिम लढतीत क्रोएशियावर 4-2 असा विजय मिळवून जेतेपदाला गवसणी घातली. फुटबॉल विश्वचषकाच्या रंगात संपूर्ण जग रंगून गेले होते. या स्पर्धा कालावधीत पॉर्न साइटला भेट देणा-यांच्या संख्येत प्रचंड घट झाल्याचा अहवाल 'पॉर्नहब' या साइटने सादर केला आहे.स्पर्धेत खेळणा-या प्रत्येक संघांच्या सामन्यादरम्यान त्या त्या देशात पॉर्न साइट पाहणा-यांची संख्या घटली होती. त्यात सर्वाधिक घट ही फ्रान्स आणि क्रोएशिया यांच्यातील अंतिम लढतीत पाहायला मिळाली. जेतेपदाच्या लढतीला सुरूवात होण्यापूर्वी क्रोएशियातील पॉर्न साइट पाहणा-यांची संख्या 46 टक्क्यांनी, तर फ्रान्समध्ये 24 टक्क्यांनी कमी झाली होती. विशेष म्हणजे सामन्याच्या पहिल्या एका तासात क्रोएशियात पॉर्न साइटला भेट देणा-यांची संख्या सातत्याने घटून ती 68 टक्क्यांवर गेली होती. मात्र, सामन्याच्या अखेरच्या अर्ध्या तासात लोक पुन्हा पॉर्न साइटकडे वळली. फ्रान्समध्ये सामन्याच्या अखेरपर्यंत साइटला भेट देणारे घटले होते. जगभरात ही आकडेवारी 12 टक्क्याने कमी झाली होती. 

फ्रान्स आणि बेल्जियम यांच्यातील उपांत्य फेरीतील सामन्यात फ्रान्समध्ये पॉर्न साइट पाहणारे 52 टक्क्यांनी कमी झाले होते. व्हेनेझुएलातही प्रचंड प्रमाणात घट पाहायला मिळाली. बल्गेरिया आणि स्लोव्हाकिया या देशांमध्ये हे प्रमाण अनुक्रमे 45 व 40 टक्क्यांनी घटले होते. स्वित्झर्लंड आणि हाँगकाँग येथेही हे प्रमाण अनुक्रमे 33 व 32 टक्के होते. अमेरिकेत मात्र विश्वचषक स्पर्धेचा फार परिणाम जाणवला नाही. येथे केवळ 5 टक्केच घट झाली. 

 

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Franceफ्रान्सCroatiaक्रोएशियाSportsक्रीडा