शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

चर्चिल-आवेर्तानची प्रतिष्ठा पणाला!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 13:56 IST

जीएफएची आज निवडणूक : गोमंतकीय फुटबॉल चाहत्यांचे लक्ष

सचिन कोरडे : राज्यातील सर्वात मोठी संघटना असलेल्या गोवाफुटबॉल असोसिएशनच्या (जीएफए) निवडणुकीला पूर्णत: राजकीय वळण निर्माण झाले आहे. बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमाव, माजी मंत्री आवेर्तान फुर्तादो हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत आहेत. दोघांचेही राजकारण हे मुख्य मैदान असले तरी त्यांच्यात फुटबॉलची आवड ही एक समानता आहे. फुर्तादो हे स्वत: खेळाडू होते तर माजी मुख्यंमत्री चर्चिल आलेमाव यांचे गोवा फुटबॉलसाठी मोठे योगदान आहे. चार दशकांपासून ते फुटबॉलची सेवा करीत आहेत. त्यामुळे  फुटबॉलच्या निवडणुकीसाठी राजकीय शक्तीचा वापर होताना दिसला. त्यामुळे या दोघांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. उद्या (दि.२८) होणाºया या निवडणुकीकडे गोमंतकीय फुटबॉल चाहत्यांचे लक्ष लागले आहे. २०१२ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत नावेली मतदार संघात आवेर्तान आणि चर्चिल आलेमाव यांच्यात सामना झाला होता. यात आवेर्तान यांनी चर्चिलचा पराभव केला. बलाढ्य नेत्याचा झालेला पराभव चर्चेचा विषय ठरला होता. निश्चितच हा पराभव चर्चिल यांच्या जिव्हारी लागला होता. त्यामुळे चर्चिल आलेमाव आता ‘जीएफए’ अध्यक्षपदाची खुर्ची कशीच सोडणार नाहीत. आपणच ही निवडणूक जिंकणार, असा दावा त्यांनी केलेला आहे. लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम मशिनमुळे आपण पराभूत झालो होतो, असे ते सांगतात. आता बॅलेट पेपर मीच जिंकून येईल. फुटबॉलसाठी इतकी वर्षे सेवा दिल्यानंतर माझ्यावर क्लबचा विश्वास अधिक आहे. शंभरहून अधिक क्लब माझ्या पाठीशी आहेत. क्लबना खेळायला मैदानेच उपलब्ध नसतात. ती उपबल्ध करून देण्याची प्राथमिकता असेल. गोवा प्रोफेशनल लीगच्या बक्षिसांच्या रक्कमेत वाढ करण्याचा प्रयत्न असेल. याशिवाय इतरही विषय माझ्या डोक्यात आहेत. फुटबॉल खेळाची निगडीत समस्या सोडवण्याचा माझा प्रयत्न असेल,असे चर्चिल यांनी सांगितले आहे.  दुसरीकडे, आवेर्तान फुर्तादो यांनी सुद्धा मैदानाचा मुद्दा प्राथमिक ठरवला होता. गोव्यात बरेच क्लब आहेत. रोज स्पर्धा सुरू असतात, मात्र मैदाने उपलब्ध नसतात. मैदानांची संख्या वाढावी. आहे ती विकसित कशी करता येईल. याकडे लक्ष देण्याची गरज आहे. मी सुद्धा गेल्या अनेक वर्षांपासून फुटबॉल खेळतोय. त्यामुळे क्लब, खेळाडू, व्यवस्थापन यांच्या अडचणी समजू शकतो. चर्चिल आणि मी चांगले मित्र आहोत. दोघांमध्ये कुठलेही वैर नाही. मी ईव्हीएमद्वारे निवडून आलो असे ते सांगत असतील तर त्यांनी मला जादूगारही म्हणावे, कारण मी बॅलेट पेपरवर सुद्धा जिंकून येईल. क्लबचा मला चांगला पाठिंबा आहे. चर्चिल आलेमाव आता वयाची सत्तरी पार करीत आहेत. असे असताना ते का निवडणूक लढवत आहेत हेच मला कळत नाही. त्यांनी दुसºयांना संधी द्यावी, असे मला वाटते. मी मंत्री असताना माझ्या मतदारसंघात फुटबॉल विकासासाठी प्रयत्न केला. नावेली मैदान विकसित केले. त्यामुळे माझे या खेळाचे नाते जुळलेले आहे. तेच मी या निवडणुकीतून दाखवून देईल, असेही फुर्तादो म्हणाले. उपाध्यक्षपदासाठी उत्तर गोव्यातून लाविनो रिबेलो हे आग्नेलो अल्बकर्क यांना आव्हान देणार आहेत. आग्नेलो हे १९९५ पासून जीएफएच्या समितीत आहेत. गोव्यतील फुटबॉल क्षेत्रात हे नाव लोकप्रिय आहे. परंतु, लाविनो यांनी गेल्या काही वर्षात दिलेले योगदानही न विसरण्यारखे आहे. त्यामुळे ही लढतही रंगतदार होईल, असे दिसते. दरम्यान, गोव्यात एकूण १६० क्लब आहेत. त्यातील सर्वाधिक ७१ क्लब सालसेत (दक्षिण गोवा) मध्ये आहेत. निश्चितच, सालसेतमधील मते निर्णायक ठरतील.

टॅग्स :Footballफुटबॉलgoaगोवा