शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

FIFA World Cup 2022: कोण जिंकणार यावेळचा फुटबॉल वर्ल्डकप, मॉडर्न नास्त्रेदेमसने केली अशी भविष्यवाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2022 13:11 IST

FIFA World Cup 2022: मॉडर्न नास्त्रेदेमस या नावाने प्रसिद्ध झालेल्या एथोस सेलोम याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.  फिफा वर्ल्डकप २०२२चा अंतिम सामना कुठल्या दोन संघात खेळवला जाणार याबाबतची भविष्यवाणीही त्याने केली आहे. 

दोहा - सध्या कतारमध्ये फिफा फुटबॉल वर्ल्डकपचा थरार रंगला आहे. या स्पर्धेत आतापर्यंत अनेक धक्कादायक निकाल लागले आहेत. त्यामुळे स्पर्धेत पुढची फेरी कोण गाठणार याबाबत फुटबॉल प्रेमींमध्ये उत्सुकता आहे. दरम्यान, मॉडर्न नास्त्रेदेमस या नावाने प्रसिद्ध झालेल्या एथोस सेलोम याने एक मोठी भविष्यवाणी केली आहे.  फिफा वर्ल्डकप २०२२चा अंतिम सामना कुठल्या दोन संघात खेळवला जाणार याबाबतची भविष्यवाणीही त्याने केली आहे. 

एथोस सेलेम याने भविष्यवाणी करताना सांगितले की, २०२२ च्या फिफा वर्ल्डकपचा अंतिम सामना लियोनेल मेस्सीचा अर्जेंटिना आणि किलिएन एमबाप्पे याचा फ्रान्स या संघामध्ये खेळवला जाईल. फ्रान्स फिफा वर्ल्डकपमधील गतविजेता संघ आहे. फ्रान्सने २०१८ मध्ये रशियामध्ये खेळला गेलेल्या वर्ल्डकपचे विजेतेपद पटकावले होते. आता यंदाच्या वर्ल्डकपमध्ये विजेतेपद राखण्याचे आव्हान फ्रान्ससमोर आहे. 

थोस सोलेमने अर्जेंटिनाचा संघही फायनलमध्ये जाईल, असं भाकित वर्तवलं आहे. मात्र अर्जेंटिनाला पुढच्या फेरीत जाण्यासाठी पुढचे सामने जिंकावे लागतील. मात्र अर्जेंटिनाला सलामीच्या सामन्यात  सौदी अरेबियाकडून २-१ अशा फरकाने पराभव पत्करावा लागला होता.

दरम्यान, एथोस सेलोम याने त्याच्या भविष्यवाणीमध्ये फिफा वर्ल्डकपच्या सेमिफायनलसाठी दावेदार ठरणाऱ्या पाच संघांच्या नावांचाही उल्लेख केला आहे. फ्रान्स, बेल्जियम, अर्जेंटिना, ब्राझील आणि इंग्लंड हे उपांत्य फेरीत खेळण्याचे दावेदार असतील असे त्याने म्हटले आहे.

एथोस सेलोम याने हल्लीच केलेल्या अनेक भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. कोरोनाची साथ, रशिया युक्रेन युद्ध, ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ द्वितीय यांचं निधन, अशा भविष्यवाण्या खऱ्या ठरल्या आहेत. आता त्याने फिफा वर्ल्डकप २०२२ बाबत केलेल्या भविष्यवाणीमुळे खळबळ उडाली आहे.   

टॅग्स :Fifa Football World Cupफिफा फुटबॉल वर्ल्ड कप २०२२FootballफुटबॉलArgentinaअर्जेंटिनाFranceफ्रान्स