शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

बलाढ्य रियाल माद्रिदचे आव्हान संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2019 04:10 IST

यूरोपियन फुटबॉल लीगमधील बलाढ्य संघात गणना होत असलेल्या रियाल माद्रिद संघाला अयाक्स संघाकडून अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले.

माद्रिद : यूरोपियन फुटबॉल लीगमधील बलाढ्य संघात गणना होत असलेल्या रियाल माद्रिद संघाला अयाक्स संघाकडून अनपेक्षित पराभवास सामोरे जावे लागले. यासह रियाल माद्रिदचे चॅम्पियन्स लीग फुटबॉल स्पर्धेतील आव्हानही संपुष्टात आले आहे.सलग तीन यूरोपियन जेतेपद पटकावल्यानंतर पहिल्या जेतेपदापासून एक हजारहून अधिक दिनानंतर स्पेनच्या या दिग्गज रियाल माद्रिदला अयाक्स विरुद्ध पराभवाचा तोंड पहावे लागले. मंगळवारी सँटियागो बर्नब्यु स्टेडियममध्ये झालेल्या या सामन्यात अयाक्सने जबरदस्त आक्रमक खेळ करताना रियाल माद्रिदचा ४-१ असा धुव्वा उडवला. या निराशानजक पराभवासह चॅम्पियन्स लीगमधील रियाल माद्रिदचा दबदबाही संपुष्टात आला. एकूण ५-३ अशा पराभवासह रियाल माद्रिद स्पर्धेबाहेर पडला.दिग्गज ख्रिस्तियानो रोनाल्डोने रियाल माद्रिदला सोडचिठ्ठी देत यूवेंट्स संघासह खेळण्याचा निर्णय घेतल्यानंतर रियाल माद्रिद अडचणीत आला. रोनाल्डोच्या अनुपस्थितीत पहिल्याच वर्षी रियाल माद्रिदच्या जेतेपदाची झोळी रिकामी राहण्याची शक्यता आहे. रियाल माद्रिदचा बचावपटू नॅचो फर्नांडेज म्हणाला की, ‘आम्ही नेहमी चॅम्पियन्स लीगचे जेतेपद जिंकू शकत नाही. कधीतरी जेतेपदाची मालिका खंडित होणारच होती.’याआधी अयाक्स पहिल्या सत्रातील लढतीत रियाल माद्रिदविरुद्ध १-२ असे पराभूत झाले होते. मंगळवारी अयाक्सने हाकिम जियेच (७ वे मिनिट), डेव्हिस नेरेस (१८), दुसान तादिच (६२) व जेसी शोन (७२) यांच्या गोलच्या जोरावर शानदार विजय नोंदवला. रियाल माद्रिदकडून एकमेव गोल मार्को एन्सेसियो याने ७०व्या मिनिटाला केला. (वृत्तसंस्था)