शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
2
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
3
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
4
"देशाला दिशा देण्याऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
5
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
6
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
7
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
8
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
9
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
10
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस
11
स्लिपमध्ये कॅच घेताना अंदाज चुकला! ब्रूकनं मारलेला चेंडू थेट शुबमन गिलच्या डोक्याला लागला (VIDEO)
12
सोमनाथ सूर्यवंशी कोठडीतील मृत्यू प्रकरण; पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे न्यायालयाचे आदेश
13
'देशांतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नका', भारताने दलाई लामांना पाठिंबा दिल्याने चीन संतापला
14
भारताचा बुद्धीबळपटू डी. गुकेशचा मोठा पराक्रम; वर्ल्ड नंबर वन कार्लसनची जिरवली!
15
मथुरा श्रीकृष्ण जन्मभूमी प्रकरण: हिंदू पक्षाला झटका, शाही ईदगाहला वादग्रस्त ढाचा घोषित करण्याची मागणी HC नं फेटाळली
16
ENG vs IND : जलद शतकी खेळीसह Jamie Smith चा पराक्रम! १४८ वर्षांत असं पहिल्यांदा घडलं
17
'रामायण'मध्ये दिग्गज कलाकारांची फौज रावणावर तुटून पडणार, अमिताभसह कोण साकारणार कोणती भूमिका?
18
'बिहार की बेटी', PM मोदींनी उल्लेख केलेल्या त्रिनिदादच्या पंतप्रधान कोण? बिहारशी काय संबंध?
19
एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीसांनी घेतले शरद पवारांचे नाव
20
Video: मोठी बातमी! एकनाथ शिंदेंकडून पुण्यात 'जय महाराष्ट्र' पाठोपाठ 'जय गुजरात'चा नारा; आधीच मराठी-हिंदी वाद...

मेस्सीमुळे मी उत्कृष्ट खेळाडू झालो - ख्रिस्तियानो रोनाल्डो

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2019 05:20 IST

पोर्तुगालमध्ये एका वृत्तवाहिनीसह चर्चा करताना रोनाल्डो म्हणाला की, ‘मेस्सीने मिळवलेल्या यशाचा आणि त्याने केलेल्या रेकॉर्डचा मला आदर आहे.

लिस्बन : लिओनेल मेस्सीसह गेल्या अनेक वर्षांपासून सिरु असलेल्या स्पर्धेमुळे मी उत्कृष्ट खेळाडू बनलो. अर्जेटिनाच्या या स्टार खेळाडूसह सुरु असलेल्या या स्पर्धेचा मी मनापासून आनंद घेत आहे,’ असे पोर्तुगालचा स्टार फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डो याने म्हटले. त्याचप्रमाणे, ‘मी आणि मेस्सी कधीही एकत्र फिरत नाही,’ असेही रोनाल्डोने म्हटले.पोर्तुगालमध्ये एका वृत्तवाहिनीसह चर्चा करताना रोनाल्डो म्हणाला की, ‘मेस्सीने मिळवलेल्या यशाचा आणि त्याने केलेल्या रेकॉर्डचा मला आदर आहे. मी स्पेन सोडल्याने त्याने आपली निराशा जाहीरपणे व्यक्त केली होती. कारण, या स्पर्धेचा त्यालाही आनंद होता. तो देखील आमच्या दोघांमधील स्पर्धेचा आनंद घेत होता. ही एक चांगली स्पर्धा आहे, पण शानदार नाही.’इतर खेळांमधील स्पर्धांचे उदारहण देताना रोनाल्डो म्हणाला की, ‘दिग्गज खेळाडू मायकल जॉर्डन याचेही बास्केटबॉलमध्ये अनेक प्रतिस्पर्धी होते. फॉर्म्युला वनमध्ये एर्टन सेना आणि अ‍ॅलेन प्रोस्ट यांच्यातील स्पर्धा जबरदस्त होती. या सर्व स्पर्धा खिलाडूवृत्तीच्या होत्या. आमच्यामध्येही अशीच चांगली स्पर्धा आहे. त्यामुळेच मेस्सीने मला आणि मी त्याला उत्कृष्ट खेळाडू बनविले.’ त्याचप्रमाणे, ‘आमच्यात चांगल्या प्रकारचे व्यावसायिक संबंध राहिले आहे. आम्ही कधीही एकत्रपणे जेवलो नाही, पण भविष्यात एकत्रितपणे जेवू शकतो. यामध्ये अडचण काय?,’ असेही रोनाल्डो म्हणाला. (वृत्तसंस्था)

टॅग्स :Cristiano Ronaldoख्रिस्तियानो रोनाल्डो