शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Fifa World Cup 2018 : सामन्याच्या मध्यांतराला मॅराडोना यांची प्रकृती बिघडली

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2018 18:19 IST

दिएगो मॅराडोना यांच्या चाहत्यांची चिंता वाढवणारा प्रसंग अर्जेंटिना आणि नायजेरिया यांच्यातील लढती दरम्यान घडला.

सेंट पिटर्सबर्ग- दिएगो मॅराडोना यांच्या चाहत्यांची चिंता वाढवणारा प्रसंग अर्जेंटिना आणि नायजेरिया यांच्यातील लढती दरम्यान घडला. अर्जेंटिना  संघासाठी फिफा विश्वचषक स्पर्धेत आव्हान टिकवण्याच्या दृष्टीने  महत्वाच्या असलेल्या लढतीत मध्यंतराला  मॅराडोना यांची प्रकृती अचानक बिघडली. त्यांना तातडीची वैद्यकिय सेवा पुरवण्यात आली. सुरक्षारक्षक त्यांना डॅाक्टरांकडे नेत असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने चाहते काऴजीत बुडाले.  लिओनेल मेसीच्या (14 मि.) गोलनंतर अर्जेंटिना संघाच्या पहिल्या सत्रातील खेळावर  मॅराडोना प्रचंड नाराज होते. त्यात त्यांनी मद्य सेवनही केले.. त्यामुऴे सामना सुरु असताना ते अधुन मधुन डुलकी देत होते. 45 मिनिटांचा खेऴ झाल्यानंतर त्यांना अचानक चक्कर आली आणि त्यानंतर  त्यांच्यावर लगेच उपचार करण्यात आले. या घटनेनंतर मॅराडोना यांच्या प्रकृतीसंर्दभात अनेक अफवा पसरल्या.मात्र,  मॅराडोना यांनी काही कालावधीनंतर आपल्या इंस्टाग्रामवर प्रकृती ठणठणीत असल्याची पोस्ट टाकली. त्यावर त्यांनी लिहिले की, " मी सर्वांना सांगु इच्छितो की, माझी प्रकृती उत्तम आहे. सामन्याच्या मध्यंतराला माझी मान प्रचंड दुखू लागली. त्यानंतर डॅाक्टरांनी उपचार केले. त्यांनी मला घरी जाण्याचा सल्ला दिला होता, परंतु संघ संकटात असताना मी कसा जाऊ शकत होतो ? ''

टॅग्स :Fifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८FootballफुटबॉलSportsक्रीडा